savitalote2021@bolgger.com

मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता विद्रोही साहित्य दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता विद्रोही साहित्य दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

नवज्योत

*** नवज्योत *** 

बाबासाहेब नवा आरंभ नव युगाचा 
प्रभावी इथल्या 
जातीव्यवस्थेला माती करण्यास 
वर्षानुवर्ष घराघरात पाळली 
गेलेली परंपरा तू 
संविधानाने 
हद्दपार केली 
लढाई ही फक्त त्यासाठीच नव्हती 
जिंकणे हेच एक ध्येय होते 
लढाई फक्त त्यासाठीच नव्हती 
लढाई होती माणुसकीची 
लढाई आपल्या स्वप्नांची 
लढाई आपल्या हक्काची 
समानतेच्या एकात्मतेच्या बंधुत्वाच्या
 शब्दांना स्पर्श असणारी 
आणि पुढे जे झाले 
 धम्मक्रांतीचा उदय झाला 
नव्या आरंभ नवयुगाचा 
तो इतिहास झाला
 नव आरंभ नवयुगाच्या 
नवज्योती क्रांतीचा 
माणसातल्या माणसातला 
बाबासाहेब तुम्ही नवी ज्योत लावली
 अखंड ..... 
समानतेची ....!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
   

============================












त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...