savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

प्रेमात असल्यावर

प्रेम हे भावना मनाला आनंद  आणि जगण्याची नवीन परिभाषा शिकवत असते. आठवणींच्या उजेडात अंधाराची सावली कमी होत जाते. याच भाव संवेदनेतून...," प्रेमात असल्यावर ". ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत आणि स्वरचित आहे.

*प्रेमात असल्यावर*

खुळवलेल्या मनाला 
आनंदाचा फुलोरा 
कस्तुरीचा गंध 
हृदयाच्या मनातल्या 
शब्दांचा खुळावलेल्या मनाला 
स्वागत तुझ्या रंगाचा 

चाहूल तुझ्या अबोल स्पर्शाचा 
मनाला न्हावून टाकणाऱ्या 
चिंब मोकळा सुहास 
स्पर्शाच्या अबोल स्पर्शाने 
सुरुवात दिवसाची 
भान नसलेल्या नव्या स्वप्नांची 

गालावरच्या खळी सोबत 
ओठांच्या लालीसोबत 
वेडावते जागेपणी मन 
आनंदाची नवीनच परिभाषा 
पानगळीनंतरच्या इवल्याशा 
हिरवळीसारखी नाजूक हळुवार 

श्वासातला श्वासांसारखे 
प्रेमात असल्यावर 
मोहरलेल्या आंब्यासारखे 
अंगणातल्या प्राजक्ताच्या 
समर्पणासारखे ....
गुंतलेला शब्द शब्दात

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

तो माझाच

** तो माझाच **

उगाच रुसावे वाटते त्याच्यासाठी 
भावनांच्या गुंतांमध्ये आकाशात 
बेधुंद उडणाऱ्या पतंगासारखे 
आठवणींच्या उजेडात
 खुळावलेल्या मनात 

जाई जुई रातराणी प्राजक्ता  
आनंदाचा वसंत 
तो हसत खेळत 
हळुवार स्पर्शाचा हसत्या 
स्मित हास्यसोबत निवांत 
नयन निवांत कालचे आजचे 

सर्व काही  गुंतलेल्या भावनासारखे 
तो माझाच मखमली सुगंधासारखा 
चांदण्याच्या लख्ख प्रकाशात 
आशेचा धूर घेऊन निवांत 
नव्या जुन्या सर्वच आनंदाची 
उधळण 

उगाच वाटते आता 
उरलेसुरला सर्वच आठवणींच्या
 उजेडात घट्ट मिठीत 
तो माझाच होता ???
गुलाबाच्या टवटवीत फुलासारखा 💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

* संघर्षाच्या प्रवासात *( महिला दिनविशेष कविता)

स्त्री म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. स्त्री या शब्द सर्व विश्व सामावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता ......याच भाव संवेदनेतून ही कविता.   ...