savitalote2021@bolgger.com

बुधवार, २ एप्रिल, २०२५

भावना नसलेला

      कविता प्रेमभंग न झालेल्या प्रेयसीची आहे ते फक्त एकमेकांना टाळतात पण प्रेम आहे याच भाव संवेदनेतून ही भावना, "भावना नसलेला,, ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..! धन्यवाद❤❤


*** भावना नसलेला ***

तुला आठवते का?
असाच पाऊस होता 
छत्री नसलेली मी  
छत्री नसलेला तू 

चिंब भिजलेल्या मनाने  शरीराने 
भावनेच्या फुललेल्या अप्रतिम 
भावनेवर अलगद मनात 
अबोल सुगंधित मोगरा फुलला 

पण एक सांगू 
आता तसाच पाऊस आहे
 पण भावना मोगऱ्याच्या नाही 
आडोशाला चिंब भिजलेल्या 
झाडाखाली न भिजण्यासाठी 

आणि तू न दिसावा यासाठी 
धडपड चालू आहे 
तू ही तसाच कोरडा 
छत्री मात्र हातात बंद आहे 
भावना नसलेल्या 
मनासारखा...!❤

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


सुकलेला गुलाब

*** सुकलेला गुलाब *** प्रत्येक सकाळ ही  घाई गडबडीचीच  असेल असे नाही  कधीतरी कंटाळा   कधीतरी आळस  हा असावाच आयुष्य जगताना  कधीतरी सहजतेने  तू...