savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी साहित्य मराठी शब्दकोश अहंकार ब्लॉग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी साहित्य मराठी शब्दकोश अहंकार ब्लॉग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जानेवारी, २०२५

भावना अहंकाराच्या

शब्दांसोबत शब्द कधी येत जातात माहित नाही पण ते येतात आपल्या भावनांना कागदावर उमटविण्यासाठी शब्द शाहीने लिहिले जातात आणि त्यामध्ये आपल्यातील माणुसकी आपल्यातील वेदना संवेदना यासारखे कितीतरी शब्द लिहिले जातात. भावना अश्रूंसोबतही वाहते. भावना अबोल प्रीतीतही वाहते.ज्यांना शब्द सापडतो तो जास्त ताकदवर असतो आणि ज्यांना शब्द सापडत नाही ते फक्त अहंकाराच्या त्या शब्दांवर भरडले जातात. भावना शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. अहंकाराच्या झाडा ला अहंकाराचेच फळ लागते एखादी निर्णय हा मनाच्या विरुद्ध घेणे हा एक भावनांचा बाजार असतो. नात्याचे भविष्य भावना वर आधारित नसते. मनातला भावना डोळ्यातले शब्द आणि हातातली ताकत हे अहंकारासमोर फिके पडते. नवीन रस्त्यावर नवीन भावना सोबत असते डोळ्यातले अश्रू कागदावरील शाहीवर पडले की सर्व निर्णय फेल होतात पण तशी नियतीचा खेळ असावा लागतो. वेळ प्रत्येक भावनांवरचं औषध आहे असं आपण म्हणू शकत नाही. भावना प्रेमाच्या असो की आपलेपणाच्या पण भावना या आपल्याच असते. त्या अश्रू सोबत असते हसू सोबतच की शब्दांसोबत त्या आपल्याच असतात.आपल्याच भाव विश्वातला भाव संवेदनेचा असतात. अहंकाराच्या झाडाचा रोपट आजूबाजूला असले की  तेपण वेळेत ओळखायला हव. वेळ निघून गेल्यावर ते झाड चांगले फळ देईल असे कधीही समजू नका. फक्त ते स्वतःवर वेगळी पद्धतीने संस्कार करून आपल्यासमोर येतात म्हणून गेलेली वेळ परत येत नाही हे आता त्यांचे त्यांचे असतात. फक्त आपण आपली भूमिका कधीच बदलायची नाही माणसाची सावली ही माणसाला शेवटच्या क्षणी सोडते माणुसकी की ही मानसाला शेवटचा क्षणिच सोडते.नवीन आर्ट ऑफ लिविंग चा हा नवीन अध्याय....!!
✍️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...