savitalote2021@bolgger.com

मराठी कविता प्रेम कविता दलित साहित्य आंबेडकर कविता मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता प्रेम कविता दलित साहित्य आंबेडकर कविता मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

अबोली मीच माझी

** अबोल मीच माझी **

 अबोल मीच माझी 
माझ्या शब्दांच्या शब्दांशी 
नयन त्याचे कठोर 
भास सावलीचा 
अबोल प्रेमाचा 
बोल प्रवास हा 

कधी शब्दांचा प्रवास 
निशब्द आता 
सर्वस्वाने रिकामा हा 
बोल - अबोल प्रेमाचा 
प्रवास हा रिकाम्या 

समोरील दारातल्या वाऱ्यासारखा 
बेभान काळोखाच्या साक्षीने 
अबोल प्रेम हे 
बोल शब्दाने निशब्द होत आहे
काळोखाच्या साक्षीने 

बोल प्रवास हा कधीचा 
आता अबोल प्रेमाचा

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...