*** एकांत एकटीच ***
तुझ्या माझ्या या वेळेला फक्त किंमत माझी आहे तुझ्याकडे तर फक्त ती वेळ राखीव आहे
काही वेळेसाठी तू जाशील काही क्षणानंतर मी या रंगीबेरंगी रंगांचा आस्वाद इथे एकटीच एकांतात
काही वेळानंतर घेणार मनसोक्त सागर लाटेसोबत
विसावा येथेच आहे आठवणींचा फुललेला मोगराचा
एकांताचा हा फुलोरा वाळूनेच वेगवेगळ्या आकृतीत स्वप्नातला घराला आता शिंपल्याने सजवणारा आहे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================