savitalote2021@bolgger.com

रविवार, १३ एप्रिल, २०२५

आता मन रमत नाही

*** आता मन रमत नाही ***

आता मन रमत नाही पुस्तकात 
सतत अभ्यासाच्या नावाने पुस्तकात डोळे 
आता पुस्तकात रमत नाही 
आता रमते मोबाईलच्या स्क्रीनवर 
अवांतर वाचनासाठी 
आता मोबाईलच्या स्क्रीनवर म्हणून 
पुस्तक  घेऊन बसत नाही
आता लायब्ररीत  
कारण आता मन रमत नाही 

त्यात कधीतरी व्हाट्सअप फेसबुक 
इंस्टाग्राम याकडे जायचे एक छंद 
म्हणून व्हाट्सअपला त्याचे मेसेजेस असेल 
फेसबुकला त्यांनी काही पोस्ट असेल 
इंस्टाग्राम ला कोणती नवीन स्टोरी असेल 
यासाठी पण आता तेही होत नाही 
त्याचे माझे भांडण झाले आहे 
म्हणून आता मन रमत नाही त्यातही 

आता मन रमावे यासाठी काय करावे 
असा प्रश्न गुगलला केला तर 
उत्तर मिळाले ,"मी काय करू"...!
 काहीतरी सांग ना 
माझच मन रमत नाही इथे 
म्हणून आता डायरीचे पाने चाळत राहते 
मनसोक्त जुन्याच कवितेच्या शब्दांवर 
हसत राहते वेड्या भावनांच्या 
वेड्या शब्दांबरोबर चालू होता 
तो प्रवास आता हसते 
वाटत यातच काय मन रमलं थोडफार 
पण आता त्यातही मन रमत नाही 
आता त्यातही मन रमत नाही

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹




============================





मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...