"आंबेडकरवाद,"ही कविता बाबासाहेब अगदी थोडक्यात शब्दात लिहिण्याचा प्रयत्न. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल..!!❤
*** आंबेडकरवाद ***
आंबेडकरवाद म्हणजे विचारांची नवीन प्रेरणा आंबेडकरवाद म्हणजे विषम व्यवस्थेला समानतेची शिकवण
आंबेडकरवाद म्हणजे समता स्वातंत्र्य न्याय नीतिमत्ता
आंबेडकरवाद म्हणजे क्रांती परिवर्तनाची आंबेडकरवाद म्हणजे माणसाने माणसासारखे वागणे
आंबेडकरवाद म्हणजे नवीन मूल्य
आंबेडकरवाद म्हणजे शांतता विद्रोहाच्या स्वरूपात नवक्रांतीची
आंबेडकरवाद म्हणजे लोकशाही
आंबेडकरावाद म्हणजे चातुर्यवर्णव्यवस्थेच्या दगडाखाली फुललेले नाजूक वेल
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी
आंबेडकरवाद म्हणजे पाऊस नवविचारांचे
आंबेडकरवाद म्हणजे नवी नीतिमत्ता
आंबेडकरवाद म्हणजे विचारांच्या समानतेचे रोप आंबेडकरवाद म्हणजे खंबीरपणा मवाळवाद आंबेडकरवाद म्हणजे निर्भीड प्रखर तेजस्वी
पण शांत विद्रोहाचा ज्वलंत कोळसा
आंबेडकरवाद म्हणजे लोकशाहीची पहिल पान आंबेडकरवाद म्हणजे मूलभूत हक्क व्यक्ती विकास स्वातंत्र्य
आंबेडकरवाद म्हणजे अनीतीला नीतीने परिवर्तित करणाऱ्या शब्दांची सुंदर
मोत्यांची माळ
आंबेडकरवाद म्हणजे मेलेल्या समाजाला
जिवंत करणारी संजीवनी बुटी
आंबेडकरवाद म्हणजे तत्वज्ञान
आंबेडकरवाद म्हणजे इतिहासाच्या पानातील सुवर्णक्षण
आंबेडकरवाद म्हणजे जागृती विचारांची शिक्षणाची उन्नतीची मूल्यांची
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी मानवतेसाठी
आंबेडकरवाद म्हणजे नवे पंख न्यायाचे आंबेडकरवाद एका शब्दात लिहिता येत नाही मांडता येत नाही
आंबेडकरवाद म्हणजे नवीन आरंभ नवयुगाच
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================