*** ये ना ऑनलाईन ***
तुझ ऑनलाईन येन जरा कमी झाला आहे
म्हणून आता भेट कमीच होते
असो, तू कुठे माझ्यासारखा रिकामटेकडा आहेस
तू तर बिझी माणूस ...😀❤
मी काय बाबा फक्त मी मी मी मी मी करणारी
माझ्या वेळेला किंमत शून्य
तुझा वेळ तर काय important ...
मी काय म्हणते थोडा वेळ काढ ना
फक्त थोडावेळ
तुझ्या माझ्यासाठी नाही तर
प्रेमासाठी
आता तेही तुझ्या वेळेसारखी राखीव आहे
घ्यायची का तुझी भेटण्याची वेळ
ते पण करता येत नाही ना ....💔
कंटाळा आला आहे
तुझ्याबरोबर भांडायच आहे
तुझ्या खऱ्या खरा हसण्याबरोबर
काही वेळ जगायचे आहे
चंद्राच्या प्रकाशात काळोखाच्या
भीतीला न घाबरता
तुझ्याबरोबर त्या काळोखात
वेळ घालवायचा आहे
लॅपटॉप व्यतिरिक्त तुझा
वेळ मला हवा आहे
काल मिळालेले बक्षीस त्या मागच्या भावना
व्यक्त करायचा आहे
म्हणजे तुझ्या भाषेत वायफळ गप्पा
हे बघ ना किती सुंदर आहे
तुझ माझ पाण्यातल प्रतिबिंबाचे पेंटिंग
जाऊ दे तुला....
तर वेळच नाही करा कामे
Work is God.....
भाषण ऐकायच नाही
या पुढच तुझ ❤💔
ये ना ऑनलाईन थोडा वेळ काढ ना !!
बघ आज मी टिकली पण लावली आहे
तुझ्या आवडीची
विश्व आहे रे फक्त तूच माझा
माझ्या छोट्याशा आयुष्यातील स्वप्नांचा
हा हा हा हा चल मग वेळ मिळेल
तर ये ऑनलाईन
छान वाटते तुझ्याबरोबर वेळ घालवायला
without ऑनलाईन सुद्धा
तुझा आठवणीत
Love you more ❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================