savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य मराठी कविता प्रेम कविता विरह कविता स्त्री कविता दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य मराठी कविता प्रेम कविता विरह कविता स्त्री कविता दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

दिसलास म्हणून

*** दिसलास म्हणून ***

आज काय लिहावे 
संबोधन कळलेच नाही 
काल-परवापर्यंत My love म्हणून 
चालू होणारा मेसेज 
आज कोणत्या शब्दाने लिहावे 
कळलच नाही 💔

आज सर्व मेसेज डिलीट झाले 
save save as केलेल्या सगळ्याच 
files delete झाल्या 
mobile computer Tap gift ग्रीटिंग्स 
तू दिलेले सर्व गिफ्ट ..😀
जे माझ्या पैशाने घेऊन दिले होते
पण खरच 
आठवणी या प्रवासातल्या  delete झाल्या 
असतील ??मनात 

मनात माझ्याकडून तर हो उत्तर आहे 
पण खरंच मनाच्या आतल्या आत 
त्या कप्प्यात त्या आठवणी साचल्या नसेल 
पण हे सांगून तुला काही फायदा नाही
परत जुन्या आठवणींचा पसारा 
आता नको आहे 

तू दिसलास आज फेसबुक वर 
सहज चाळता चाळता 
तू तसाच आहे निरागस डोळ्याचा
 हसऱ्या ओठांचा पण आतल्या मनातल्या 
आत असलेला माणूस खरच असा आहे 
का ?हा प्रश्न पडला म्हणून 
लिहाव म्हटल एखादी मेसेज 

 तर संबोधनच नाही अधिकाऱ्याची भाषा 
आता त्या शब्दातच नाही
 म्हणून बरं झालं त्याच वळणावर 
सोडून दिले खोट्याच्या बाजारात 
सत्याची किंमत राहत नाही 
हे परत एकदा सांगून गेला 
जगाची एक तरी भाषा
मला समजून गेला एक 
अनुभव देऊन गेला 

समोरील सावरण्यासाठी 
सांभाळण्यासाठी त्यासाठी
Thank you ...!!❤
म्हणून तू एक चांगला माणूस आहेस 
हे मात्र ठरवू नको


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================
 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...