*** रिते ***
तुझ्या शब्दांचे उत्तर
तू पण काहीही बोलतोस
अस कधी होत नाही
अस कधी होणार नाही
अस कधी घडेल अस वाटत नाही
म्हणून ओझ रिक्त करावे
मनाचे
कधी हसऱ्या शब्दांनी
कधी वाहता नयनांनी
तर कधी
खळखळून ओल्या शब्दांनी
तुला काळजी आहे
कधी कधी शब्द असे येऊन जातात
पण काळजी करू नको
give up हा शब्द माहित आहे
move on मला हे माहित आहे
रितेपण कोणत्याही
खारट पाण्याने संपत नाही
हेही मला माहित आहे
म्हणून तू गोड पाण्याचा झरा हो
फक्त हसऱ्यांना नयनांनी ❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================