savitalote2021@bolgger.com

मराठी लेख सुविचार मराठी साहित्य दलित साहित्य विचार मंच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख सुविचार मराठी साहित्य दलित साहित्य विचार मंच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ मे, २०२५

तोंड उघडणे

*** तोंड उघडणे ***

आयुष्य ही नवीन आर्ट ऑफ लिविंग कडे जात आहे असे मी नेहमी म्हणते. हे क्षणाक्षणाला आलेल्या अनुभवावरून सिद्ध हे होत आहे तोंड उघडणे हा वाक्यप्रचार फक्त बोलणे हा होतो हे माहीत होतं पण आता तोंड उघडणे म्हणजे फक्त बोलणे होते असे नाही असे एक नवीन आर्ट ऑफ लिविंग आयुष्यात येऊन गेले तोंड उघडणे म्हणजे फक्त बोलणे नसून ते कधी नकारात्मक असू शकते कधी सकारात्मक असू शकते तर कधी बॉडी लँग्वेज वरून सुद्धा आता तोंड उघडणे हा वाक्यप्रचार समाजमान्य होत आहे माझ्यासाठी तोंड उघडणे हे फक्त दोनच वाक्यप्रचाराचा अर्थ निघतो एक म्हणजे तोंड उघडणे म्हणजे गटाराच तोंड उघडणे आणि दुसर म्हणजे स्वच्छ पाण्याने भरलेल्या टाकीचा. आपण कोणत्या वाक्यप्रचाराचा उपयोग करायचा आहे आपल्या आयुष्याच्या त्या वेळेवर ठरलेलं असत पण मला कधीच वाटत नाही तोंड उघडणे म्हणजे गटाराचे तोंड उघडणे असं कुणाच्याही बोलण्याला त्याचा अर्थ यावा कारण आयुष्यात सगळेच एकाच माळेचे म्हणी नसतात प्रत्येकांच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे अनुभव घेऊन आयुष्य कुठेतरी स्थिरावलेल असत पण प्रत्येक वेळी तोंड उघडणे हा वाक्यप्रचार फक्त गटाराचा तोंड उघडून असं होत असेल तर त्या व्यक्तींनी त्या सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तींनी यापुढेही जाऊन असे म्हणे माणसांमधली माणुसकी जिथे संपलेली आहे अशा मानसिकतेच्या नकारात्मक व्यक्तींनी कधीही सार्वजनिक स्तरावर स्वतःचं तोंड उडूननये कारण त्याला माहीत नसते समोरचा व्यक्ती तोंड उघडेल तर ते कुठपर्यंत जाईल कारण त्याला त्याचा अनुभव असतो तो ज्या परिस्थितीत जातो किंवा ज्या परिस्थितीतून जात असतो प्रत्येक वेळी सहनशीलता हा एकच शब्द त्यांच्या अनुभवावरून त्यांना माहीत असते समोरच्या व्यक्तीची पण असे काही नसते सहनशीलता या नावाचा कोणताही शब्द आयुष्यात कोणाच्याच नसते प्रत्येक व्यक्ती सामाजिक प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो पण वाक्यप्रचारानुसार घ्यावा तो शब्द आता आपल्याला घ्यावा लागेल कारण कोणीही गटाऱ्याचा झाकण उघडणार नाही याची सामाजिक स्तरावर आता नोंद घ्यावी लागेल कारण आज आपण सामाजिक प्रतिष्ठेच्या मागणीनुसार आपण आपले वागणे बोलणे ठेवावे लागते सामाजिक प्रतिष्ठा हा एक मानाचा मुद्दा आज  आहे आणि ज्यांना ही सामाजिक प्रतिष्ठान नको असते त्यांची चळवळ ही या समाजाच्या विरुद्ध दिशेने चालते त्यांना कितीही वाटत असेल आम्ही हुशार आहोत पण सामाजिक प्रतिष्ठा सांभाळणाऱ्या व्यक्तीला ते अति हुशार वाटतात कारण ती प्रतिष्ठा तयार करण्यासाठी आयुष्याचा कितीतरी वेळ त्यांनी खर्च केलेला असतो हे माहीतच नसते.
     नवीन आर्ट ऑफ लिविंग मध्ये असाही विषय कधीतरी असेल असे वाटत नव्हते पण कधी कधी कुणीतरी सांगून जाते असं काहीतरी लिहून दाखवा आणि आपण त्यावर लिहितो काही विचार करतो पण लिहिताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावे लागते ते म्हणजे हे विचार एका विशिष्ट विषयापुरते व्यक्ति पुरते किंवा विशिष्ट घटने पुरते नसते तर असे विषय हे त्या विषयाच्या अनुषंगाने लिहिले जाते कधीतरी हा वाक्यप्रचार लहानपणी खूप आवडीने व्याकरणाच्या तासाला यायचा त्यावेळी वाटायचं नाही पुढे जाऊन आपण या वाक्यप्रचाराचे वर असेही काही लिहू पेपर मध्ये दोन मार्क साठी कितीतरी वाक्यप्रचार पाठ करावे लागायचे पुढे एमपीएससी सारख्या एक्झाम च्या तयारीसाठी अशा कितीतरी वाक्यप्रचार म्हणी यांचा उपयोग वागण्या बोलण्यातही आणि लिखाणामध्ये हे येत राहिला अभ्यासाच्या निमित्ताने मराठी व्याकरण परत अभ्यास करताना त्याच्यापुढे काय उपयोग झाला माहित आहे एक्झाम तर राहूनच गेली पण या अपयशाचे खापर कधी मी कुणावर फोडले नाही कारण अभ्यासच कमी पडतं 0.01% चाललेला हा प्रयत्न कधी अपेक्षा कडे जाईल हे विद्यार्थ्यांना कळत नाही तरी आम्ही यशाच्या त्या मार्गावर बिनधास्तपणे चालत राहतो येणाऱ्या संकटांना समस्यांना आणि चॅलेंजेस ला पेलवत मराठीचा या अभ्यासाचा उपयोग मात्र मी लिखाण पुरेपूर करून घेतो कारण यामुळेच मला माझी संस्कृती त्या मागचे शब्द अपशब्द अपभ्र भ्रम यासारख्या गोष्टी माहीत होतात मराठी भाषेचे इतिहास माहीत होत पण अभ्यास करताना आणि सहज वाचन करताना यामध्ये खूप अंतर आहे हे आता माझ्या लक्षात येत आहे सहजता कधीच भाषेत नसते दरबारा किलोमीटर नंतर होणारे भाषेचा बदल आता खूप कमी अंतरावर आला आहे असे वाटते समाज मान्यता ही आता कोणत्याच भाषेवर टिकली नाही झालं जी भाषा वाटते ती भाषा बोलते ज्या वाक्यप्रचाराचा उपयोग जिथे करायला हवा तिथे न करता कुठेही कसाही वापरला जातो भाषेचा अपमान किंवा भाषेचा अभिमान हा त्या प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा वैयक्तिक विषय झालेला आहे भाषा ही आपली आहे तोंड उघडणे हा वाक्यप्रचार असाही कुणीतरी वापरला याचे नवलच पण तरीही छान वाटले 30 सेकंदाच्या रील साठी भाषेचा असाही वापर केला जातो कंटेंट क्रिएटर नावाच्या या माणसाला आता भाषेची ऐशी तैशी करायची आहे हसण्या हसण्यातून समाजाचे डोळे उघडणे हा त्या मागचा  उद्देश असावा कमी शब्दात जास्त असे सांगण्याचा हा प्रयत्न असावा पण भाषा मात्र बदलते  त्यातही असे वाक्यप्रचार अशा पद्धतीने वापरणे हा भाषेच्या भाषेच्या इतिहासाचा आणि भाषेच्या एकंदर प्रवासाचा हा सखोल ज्ञान प्रवास आहे आपण किती भाषेला महत्त्व देतो हे यावरून कळते नवीन पिढीला तोंड उघडणे म्हणजे नवीन वाक्यप्रचार त्यांच्या रजिस्टर ला लिहिला जाणार आहे प्रत्येक वेळी संस्कार समजते आपण जे देऊ ते त्यांना मिळत असते म्हणून कोणीही अशा प्रकारचे शब्द वापरताना थोडा विचार करावा नवीन आर्ट ऑफ लिविंग मध्ये नवीन वाक्यप्रचारांचा या प्रवासात आज इतकेच नवीन आर्ट ऑफ लिविंग शिकताना खूप नवीन नवीन शब्द कानावर पडतात पण प्रत्यक्ष शब्द लिहिता येत नाही तरीपण हा वाक्यप्रचार माझ्या मनाला थोडासा हळवं करून गेलं कारण तोंड उघडणे म्हणजे बोलणे आपल्याला अवगत असावी लागते त्याशिवाय आपण आपले अस्तित्व आपले मत आपले स्वातंत्र्य आपले अधिकार आपला स्वाभिमान आपला अभिमान आपला  आपला मान हे सांगू शकत नाही म्हणून अपशब्द अशा प्रकारचे वाक्यप्रचार उपयोगात आणू नये ही विनंती...!!💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================


 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...