*** अबोल ***
सर्वांनाच माहीत असते
सोयीनुसार
त्या लावल्या जातात सोयीनुसार
घागर पाण्याने भरली जाते
सोयीनुसारच
घाई गडबडीने का होईना
वेलीवरचा मोगरा फुलला जातो
प्राजक्ता हृदयात भरते
ओंजळीत रातराणी येते
जाई जुई येते
घेण्यासाठी खूप काही असते
देण्यासाठी खूप काही असते
होकार शब्दात असतो
नकार शब्दात असते
पण हळुवार तुटत चाललेल्या
नात्याला मात्र याची गरज नसते
अबोल खिडकीतून आलेला वारा
अक्षराविना सर्व काही सांगून जाते
जास्त काही नाही
स्त्रीजन्म ही तुझी कहाणी
म्हणून स्वतःला एकांतात भेट
पदराखाली सारा आभाळ असते
मायेच पण
पणत्या कितीही लावल्या तरी
उजेड मात्र संस्कारच देतो
जागरणाचा
रोज नव्याने...!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================