*** अबोल तू ***
शब्द तुला समजत नाही म्हणून
आता नयनाची भाषा बोलू
चल उठ मग
बेडरूमच्या खिडकीतून दिसतच
असेल आकाश
आकाशातला चंद्र
तर मग
आकाशातला चंद्र बघत
तेजस्वी सूर्याची बातमी सांगू
थोडी वायफळ चर्चा
करून नंतर
दोघेही आकाशात टक
लावून बघून💕
तू सांग त्याला
तू कसा आहेस
मी सांगेल त्याला
मी कशी आहेस
या सगळ्यात एक मात्र होईल
शब्दाविना संवाद होईल
शब्दाविनाच प्रेमही
तुझ्या - माझ्या हृदयात
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================