*** दहशत ***
शेवटी मरणारा तर माणूसच होता
मारणारही माणूसच होता
मग इथे जिंकलेल कोण आहे
मरणारा वापस येणार नाही
मारणार जिवंत राहणार नाही
इतक सर्व माहीत असताना सुद्धा
मारणारा मात्र आनंदाने जगत असतो
तो असुरी आनंदच
अशा हमलांना पाठबळ देत असते
शून्य करणारी ही घटना न घडावी
हीच इच्छा
कालपरवा आजूबाजूंनी घडली
आज सीमेवर घडली
उद्या परत कुठेतरी घडेल
परवा परत कुठेतरी घडेल
हे चक्र हेच हे वर्तुळ चालू राहील
याला पूर्णविराम म्हणजे मानवता
शांतीचा संदेश देणारे बुद्ध
बुद्धाची शिकवण या भूमीत आहे
त्या भूमीत वर्तुळ थांबत नाही
म्हणून आता आपल्याला
युद्ध नको बुद्ध हवे...❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================