**** मी एक स्त्री आहे ***
दिव्याची वात जळत राहते तेल संपेपर्यंत
तुझे प्रेम मनातला आकर्षण संपल की संपते
आकाशात तारे राहतात सकाळच्या आगमनापर्यंत
तसेच तुझे प्रेम राहते मन भरेपर्यंत
सूर्याची दाहकता काही क्षणासाठी असते
तुझा रागीट स्वभाव हा नेहमीसाठीच असतो
रातराणीचा सुगंध तुला डोकेदुखी वाटते
तर मला जगण्याची नवी आशा
मी रमते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
त्याच गोष्टी तुला निरर्थक वाटतात
तरी माझ तुझ्यावर प्रेम आहे
तुझे नसले तरी
तुझे प्रेम झाडाच्या मागे
माझे प्रेम खुले आकाश आहे
तुझे प्रेम त्या बंद खोलीच्या दारात
माझे प्रेम मुक्त
वैचारिक पातळी थोडी ढासळली आहे
तुझी पण आता उपयोग नाही
मी बांधली गेली आहे
सामाजिक बंधनाने सामाजिक नीतीने
तू एक पुरुष आहे
मी एक स्त्री आहे
म्हणून बांधले गेली आहे
तुझ्या विचारांनी
तुझ्या गुलामगिरीने
तुझ्या अहंकाराची
माझ्या चांगुलपणांनी
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================