savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता विचारमंच मराठी साहित्य दलित साहित्य मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता विचारमंच मराठी साहित्य दलित साहित्य मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ मे, २०२५

** जाऊ नकोस

*** जाऊ नकोस ***

परत तू जाऊ नकोस 
त्या समुद्रकिनाऱ्यावर 
तिथे तू आठवणींच्या महापूर 
डोळ्यात घेऊन विसावत असतो 
थंडपणे 
उगाच वाटल 
सूर्योदयाचा सूर्य माझ्यासोबत 
येत नाही 
पण तो काळोखात होता 
काही क्षणानंतर 
म्हणून म्हणतो 
उगाच जाऊ नको 
त्या पायवाटेवर जिथे पाऊलखुणा 
ओलावल्या असतील 
प्रेम हे आपल्या जागेवर 
जगणे हे आपल्या जागेवर 
यामध्ये सर्वस्व काय असेल 
तर जगणे आहे 
जगणे हाच आयुष्याचा शेवटचा 
सर्वोत्तम उपयोगी मार्ग 
म्हणून म्हणते 
परत तू जाऊ नकोस 
त्या समुद्रकिनाऱ्यावर!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


============================



मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...