"तू विसरू नको माणसा", ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आंबेडकरवादी म्हणणारे आंबेडकरी चळवळीचे ध्येय आणि धोरण विसरत चालले आहे का..?? हा प्रश्नचिन्ह समोर आला आणि या कवितेची रचना झाली. कविता कुणावरही परखडपणे आरोप करत नाही. कवीला पडलेला या प्रश्नाचे उत्तर तो या कविते शोधतो आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!❤
*** तू विसरू नको माणसा ***
सहन होत नाही रे आता
झुंडशाहीची संघर्षाची भाषा
आपलेच आपल्याला डोळे मोठे करून दाखवितात अनुभवाची शिदोरी सोबत
असूनही सामर्थ्याचे प्रतीक आपल्याला दाखवितात
गावकुशाबाहेर आहे जीवन
आपल्याला माहित आहे वेदना
पण आता रडायचे कशासाठी
हे समजत नाही
तुझी डोळे किंवा माझे डोळे यात काय फरक मीही ती क्रांती पाहिली आहे
जी बाबासाहेबांनी पुस्तकात लिहून ठेवली आहे तू ही ती चळवळ पाहिली असेल
जी पुस्तकात लिहून ठेवली आहे
अनुभवाची शिदोरी तुझ्याजवळही
माझ्याजवळ पण लेकरा
बाबासाहेबांची क्रांतीची भाषा समानतेची होती हेही समजून नको
कारण समाजव्यवस्था ही कधीही कुणासाठी कोणत्याही क्रांतीची भाषा समजून घेत नाही
ती समजून घेते
फक्त आपलपोटी भाषा
रोज जगण्याच्या विलक्षण अनुभवाने
ती हलाखीच्या परिस्थितीत तशीच असते संघर्षाच्या वेलीवर सुद्धा
विद्रोह कुठे करायचा माहित नाही
जाणिवा कुठे मांडायच्या माहित नाही
आशावाद कुठे ठेवायचा माहित नाही
व्यथावेदना कुठे मांडायच्या माहित नाही अस्तित्वाची परिभाषा कोणती माहित नाही उपेक्षितांचे दुःखांच्या वेदनेचे जीवन कुठे मांडायचे माहित नाही
वास्तवाचे समीकरण कोणत्या समीकरणाने सोडवायचे माहित नाही
पण मी तिथेच आहे जिथे बाबासाहेबानी
मला असायला हवे असे सांगितले
मी तिथेच आहे मला जिथे राहायचे आहे
तिथेच पण तू बदलला तुझ्यातील वेदना
बदलला तू आता मांडीला मांडी लावून
दुसरीकडे कुठेतरी बसलेला आहे
तू संपूर्णपणे माणूस झाला आहे
त्यांच्या विचारांचा
बाभळीला फुले येईल पण काटेही येईलच संस्कृतीचे झाड लाव पण
आक्रोश करायला विसरू नको
तरच तू माझा आहेस
माझ्या माझ्यातील बाबासाहेबांचा आहे
नवीन आरंभ नवयुगाच्या नवक्रांतीच्या
त्या आरंभबिंदूपासून तुझा प्रवास चालू आहे
जग हसत असेल जग रडतही असते जागधिकारही करीत असे
तरी चालेल दुःखाची नवीन ओंजळ
तू देऊ नको
जुन्या जखमांच्या खपला काढू नको
तू विसरू नको
अज्ञानाचा पाढा
तू विसरू नको परखड शब्दांची भाषा
तू विसरू नको जगण्याची वाट
तू विसरू नको डोळ्यातील अपयश
तू विसरू नको दारिद्र्य
तू विसरू नको, व्यापक दृष्टिकोन
तो विसरु नको आधुनिकतेची जाणीव
तू विसरू नको अंधारातला दहशतवाद
तू विसरु नको सहनशीलता न जपणारी
तरीही सहनशील असण्याची
तू विसरू नको माणसातला
तेजाची नवदिशाची भाषा
तू विसरू नको बदलत्या दुःखाची भाषा
तू विसरू नको उगवलेला सूर्य पहाटेचा
तू विसरू नको अंधाराची भाषा
तू विसरु नको विचारांचा संघर्ष
तू विसरू नको पिंजऱ्यातला पोपट
भाकरीची किंमत सोसलेल्या वेदना
अश्रूंच्या संवेदना
संघर्षाची धकधकत असलेल्या क्रांतीची भाषा स्वाभिमानाची देणगी
माणसातल्या माणसा तुला कोणी शिकविले अरे ले का रे म्हणण्याची भाषा
तू विसरू नको त्या महामानवाला
नव आरंभ देणाऱ्या त्या महाज्योतीला...!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================