savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य बाबासाहेबांच्या कविता आंबेडकर कविता दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य बाबासाहेबांच्या कविता आंबेडकर कविता दलित साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

महामानवता

     बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आणि अध्यात्मिक चळवळ बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेमध्ये रुजली ही चळवळ पहिला पाऊल म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणे. नव  आरंभ नवयुगाचा हा काव्यसंग्रह याच पहिल्या आरंभबिंदूला समर्पित आहे.
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चुका आढळलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!!❤

**** महामानवता****

शून्यातून झालेला प्रवास आता 
इतिहासाचे सोनेरी पान आहे 
अस्पृश्यतेच्या नावाखाली 
व्यवस्थेच्या बाजाराला विचाराची 
सोबत दिली 
त्यांचे नाव बाबासाहेब आहे 

विकासाचा मानबिंदू बघता बघता 
महास्फोटात परिवर्तित झाला 
देशाला समानतेचे वादळात नेणारे 
बाबासाहेबांचे विचार आता पायवाट झाली  नवीन आरंभ झाला 
घराघरात संविधानाचा 

दीक्षांत समारंभानंतर 
वर्गाच्या बाहेर बसलेला महामानव 
संविधान निर्माता झाला 
आणि तडाच गेला 
सामाजिक बांधिलकीचा वर्णव्यवस्थेला वर्गाबाहेर बसलेले देव माणसामुळे
नवीन आरंभ करणाऱ्या 
नवीन समाजव्यवस्था रुजविणाऱ्या 
महामानवाने युगंधराने शिल्पकाराने 
नवाआरंभ नवी शक्ती जगाला दाखवून दिली अंधारातल्या प्रकाशाचा तेज 
नव आरंभ नवयुगाचा 
बोधिसत्व महामानवतेचा ❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================





मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...