एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...!💞
एक प्रियकर प्रियसीला त्या नात्यात काय मर्यादा आहे हे सांगत आहे शब्दांमध्ये आपल्या भावसंवेदना व्यक्त करतो. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित की स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद.
*****राहूनच गेले *****
राहूनच गेले
तुझ्याकडील शुभेच्छा चा मेसेज येणे
मला माहित आहे तू दौऱ्यावर आहे
खूप बिझी आहे
या सर्वात फक्त
मनातल्या भावना तेवढ्यासोबत
पण खरंच वाट बघत होते
असो तू म्हणशील
आता मी काय करू?
तू काय कराव यापेक्षा ...
मी काय करावे!!?
याला जास्त महत्त्व देणार 💕
तुझी चिडचिड तुझा राग राग
तुझे शब्द शब्द आणि तुझीच चिडचिड
पानावलेले डोळे तुझाच अबोला
💞आणि तुझच मिठीत येणे
सर्व काही तुझच
त्यात मी कुठे आहेच नाही...!🤣
म्हणून मी रागावले नाही
समजूतदारपणा कदाचित हा दोष आहे
माझा इतक म्हणून सोडून द्यायच
पण या सर्वांत एक गोष्ट मात्र
मनात येऊन गेली
ती म्हणजे मी आनंदात आहे का?
हे तुझ न विचारने
काल एक गिफ्ट आले पोस्टाने
मनाच्या
कदाचित तुझच असावे ते
त्यात लिहिले होते
माझा मी 😀💕
तुझी तू आहे 😂💞
पण तुझ्या डोळ्यातले अश्रु मात्र माझे आहे
तुझ्या ओठांवरचे हसू मात्र माझे आहे
तुझ्या सौंदर्याची परिभाषा .....🌹🌴😎
ती सुद्धा माझीच आहे
फक्त माझ्यासाठी
Happy birthday....
My dear sweet friend 💞🌴
भावनेत इतका पोहोचल्या पण
शब्द जरा वेगळे होते
नात्याची मर्यादा तुझ्या माझ्यात आहे
हे मात्र जरा वेळ मी विसरूनच गेले होते
पण ते तू विसरत नाही हे मात्र खरे
खऱ्या प्रेमासारखे💕🌴💞🌴🌴
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------