*** मासिक बाईपण***
वेदनेच्या त्या दिवसात
आधार फक्त वेदनेचाच असतो
पूर्णत्वाच्या विचाराने
बाईपण जगत असते
वेदनेचा काय घेऊन बसले
मासिक धर्म तर हा
निसर्ग नियम आहे
स्त्री गर्भ आला की
तिच्या वेदना गर्भातूनच
चालू होतात
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत
बाईपण जगून घेत
असताना...असताना....!!❤
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे