savitalote2021@bolgger.com

शनिवार, १९ जून, २०२१

सकारात्मकता

                  आजूबाजूची परिस्थिती इतकी नकारात्मक झाले आहे की अशा स्थितीमध्ये सकारात्मक भावना माणसाला शोधत आली तर काय होईल ही परिस्थिती शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे 'सकारात्मकता' ,या स्वलिखित कवितेत...


  ***  सकारात्मकता ***  

माणसाला शोधत आली 
सकारात्मकता तर काय होईल 
असे वाटून जाते 
सभोवताली फक्त नकार 
भय तणाव चिडचिड 
आणि मात स्वतः स्वतःवर 
करण्याची विचारांनी आपली 
सकारात्मकतेने शोधलेस आपल्यास 
या भयावह अंधार चांदनी रात्रेत
गोष्टी होतील सोप्या 
विचार सोबत देतील संघर्षात 
सकारात्मक... 
हरण्याची भीती नाही 
गमावण्याची चीड नाही 
प्रत्येक गोष्टीला संधी 
नवनिर्मितीची ...
जिद्द ध्येय एक नवीन 
संधी पुढील पाऊल 
पुढे जाण्याची 
मागील पाऊल सोबत 
येण्याची ....
येणा-जाण्याचा 
खेळ चालू सकारात्मक 
फक्त विचार सकारात्मकतेमुळे

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *सकारात्मकता *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------



/ मन माझ आता /

               "मन माझ आता, " ही कविता स्वलिखित आहे. प्रेम विरहानंतर मनामध्ये आठवणींचा बाजार असतो. मनातली चलबिचल आणि मन नाजूक आठवणी घेऊन जातात. जुन्या आठवणींसोबत नाजूक  भावनेवर ही कविता आहे .


         ///   मन माझ आता  /////

आठवांच्या गावात जाता 
मन भरून येत❤

तेव्हा कडेला 
पाणी दाटून येत 

तळरेषेकडे बघत हातातील 
मन उदास होत जाते 
💔💔💔
कधी हाच हात -हातात 
घेतला होता 

आणि आभाळाएवढे 
मन दाटून आले 

आठवांच्या गावात जाताना 
फाटून येते मन!!

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  / / मन माझ आता  //
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

---------@@@---------@@@------

शुक्रवार, १८ जून, २०२१

** मोकळा श्वास ***

       अजूनही समाजव्यवस्थेत स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. अशा समाजव्यवस्थेतील मानवी प्रवृत्तीला स्त्री ,"मोकळा श्वास" घेऊ द्या. मला ही या प्रगतीच्या पायवाटेवर स्त्री म्हणून जगू द्या!! माणूस म्हणून जगू द्या !!आपल्या अधिकार आहे  हा.  मोकळा श्वास या स्वलिखित कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेल्या आहे


***   मोकळा श्वास  ***

झाले गेले विसरून 
जाऊ आता द्या 
मज मनमोकळा 
श्वास जगण्याचा 

व्यापलेल्या यातनेचा
घरसंसार स्वप्नांची 
चाहूल लागण्याची   
मुभा द्या...मोकळा श्वासाला

प्रेम नाही गुलाबी 
त्यात फक्त आसवे 
केसातील अन् 
किळसवाणे शब्द 
नको आता ...

मोकळा श्वास घेऊ द्या; 
येऊ द्या माळलेल्या
स्वप्नअस्तित्वात 
कधी तरी वाटू द्या 
मी माणूस आहे स्त्री  

जन्माची न अबला 
परके करा, आता मला 
गालातल्या गालात तरी 
हसू द्या मोकळा श्वास 
होऊ द्या 

खळखळून हसण्यासाठी 
मोकळा श्वास जीवन 
आनंदाचा स्त्रीजन्माचा  
मी पणाचा!!

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **   मोकळा श्वास  ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



×*******×********×********×*******×

समजून

            आयुष्याच्या ताटावर सुखदुःखाचे गाणे कसे चालू आहे ही भावना मांडणारी ही कविता.... कविता स्वलिखित आहे.

//////   समजून ///////

दुःखाचे ताट सोबत आहे 
                 सुखानंतर 
नशीब तर चालू आहे 
           दुःखानंतर 
डोळस मांडणी सुखदुःखाची 
               चालूच आहे 
सारे शब्द वेदना आनंद 
            एकसुरी आहे 
फक्त सोबत नाही 
         आयुष्याचे स्वप्नतारा  
फाडून जात आहे त्यांना सर्व 
           भावनेचे ताट 
संवेदनाहीन करून गुंडाळली 
              जात आहे 
दुःखाचे सुखाचे ....
              ताट समजून.


           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- समजून 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

प्रेम

❤***  प्रेम ***❤

गारवा आज जास्तच 
नव्या जोशाने...
नव्या उमेदीने... 

प्रेम गारवा मनाला 
भिजून देतो 
बहरतोया मजसंग 

पुन्हा नव्या रुपात 
तहानलेल्या कुशीतील 
फुललेल्या श्वासांचा ❤

......गारवा आज जास्तच 

          ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- प्रेम ❤
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

गुरुवार, १७ जून, २०२१

शब्द



         शब्द ही कविता माझ्या मनातील शब्दांबद्दल असलेल्या प्रेमावर स्वलिखित लिहिलेली आहे शब्द माझ्यासाठी काय आहे हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.


*****  शब्द *****

माझ्या शब्दांना साद
देत चालत राहा 
माझ्यासोबत 
शब्दांची माळ गुंफेपर्यंत 

बोलत राहा माझ्याशी 
माझ्यातील भावस्वप्नांसोबत
तू माझी प्रीत आहे 
तू माझा भावरंग आहे 

प्रतिमा तुझीच मनाला 
प्रतिभा तुझीच विचारांना 
लेखणी माझे प्रेम आणि 
तू माझा आरशा

छंद तुझ्या सोबत भिजण्याचे 
गंध माझ्या मनाला तुझाच ...
नियती ...तू 
स्वाभिमान... तू 
कुंभमेळा... तू 
आशावाद ...तू 
संपत्ती ...तूच माझी!! 

शब्दमाळेत गुंफल्यानंतर 
मौनालाच अर्थ तुझ्याच
वाचतोया भिजतांना 
रुजावे शब्दरूपी जीवनाला 

सोबतशब्द असावे 
माझ्या शब्दांनाही शब्दांनी 
साथ देताना माझ्या जीवनाला!!!


             ✍️©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- शब्द 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

*अबोली हसली *

*****    अबोली हसली *****

अंगणात फुलता फुलता 
आज कुंडीतही फुलली 
हसली उगवता सूर्यसोबत 
हसली पानांवरील दवबिंदुसोबत 
मनाच्या आत अबोल झाली 
तरी स्वप्न रंगविली 
तेज सूर्यकिरण्यांसोबत 
झाली सांजवेळ... परत हसली 
गोड ...मावळतीच्या 
उधाणलेल्या रंगासोबत 
रुसून बसली अंधारात 
अबोल होऊनी रात्रकिडण्यांसोबत 
नव पहाटेच्या सप्तसुरांची 
रंग उधाळणीसोबत
बोल होतास 
परत फुलली अंगणात...
कुंडीत...
अबोल नजरेने सूर्यासोबत 
अबोल होऊन 
अबोल हसली !!


         ©️✍️सविता तुकाराम लोटे 



✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अबोली हसली 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

   

           ************************************

वेळ ( Coronavirus poem )

    
             जागतिक महामारी कोरोना व्हायरस Coronavirus)  कधीही कुणालाही गर्दीच्या ठिकाणी किंवा सोशल डिस्टंसिंगचा वापर न केल्यास होतो त्यावर सुचलेली कविता ,"वेळ".

       *** वेळ ***

कधीच कुणासाठी थांबत नाही 
वेळेचे चक्र आणि वेळ, वेळेनुसार 
चला. पण परिस्थिती समजून - उमजून 
काळ वैऱ्याची आहे 
दिवसाही ...रात्रीही...गर्दीचा 
कोणत्याही स्थितीत....
कधी घाव घालेल माहित नाही 
म्हणून जपून चला 
आत्ताच 
या क्षणाक्षणाला 
विचार करा नियतीघाव घालेल 
तर !!
आपआपली जपून पावले टाका 
आयुष्याच्या परिस्थितीनुसार 
वेळेनुसार जिंका वेळेला 
आत्ताच ...
श्वास चालू ठेवण्यासाठी...
सूर्योदय बघण्यासाठी....
आपली माणस आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी!!!


            ✍️©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वेळ (Coronavirus Poem)  
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





----------------------------------







बुधवार, १६ जून, २०२१

हायकू





                        1

                     2
                     3


                        4

         
                   5

         
                       6



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



-----------@@@@@@@-----------



फुंकार ****

***  फुंकार  ****

वाट बघता- बघता वाटत 
होते मनस्वी फुंकार मारावी 
पुन्हा कदाचित येईल 
सुखद जगायचे क्षण 

          गेलेले दिवस येणारी वाट 
         जखमांना फुंकर घालेल वाटत
         अर्धवट रस्त्याच्या कडेला 
        आयुष्याच्या ...

मिटून जाईल तो क्षण 
कोणत्याही क्षणी नव फुंकराने
जपले जाईल स्पर्श अलवार 
स्वर्गसुखाचा ...नवभेटीने !

             फुंकर बंधनाने 
            सुखद जगायचे क्षण 
           अर्थशून्य; वाटेल गेलेले 
          दिवस ...

सुखद क्षण पावलेने
फुंकार मनस्वी फुलो-याच्या
सुखद क्षणाने... 
सुखद क्षणाने...

                 ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  फुंकार
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

ती आली

 *** ती आली ***

तू आल्यावर 
मनात दाटे
सप्तसुरांची ज्योत 
वाऱ्यासंगे...
गवतफुले बोले 
निरागस गाणे 
ती आली...ती आली
हसूनच..!😃😃😃

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे **


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ती आली
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       


हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू सकारात्मक



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------


       

हायकू

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------


       

मंगळवार, १५ जून, २०२१

आपुलकीने


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आपुलकीने
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

आपुलकीने



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- एक  अनामिक ओढ आपुलकीने
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       


आत्मसन्मान

*****  आत्मसन्मान  *****

पायात अजूनही ताकत नाही 
या पुरुषी समाजव्यवस्थेला पायाखाली 
चिरडून टाकण्याची
मनात प्रश्न येतो खरंच आपण 
21 व्या शतकात  
प्रश्नालाही प्रश्न पडतो खरंच 
शून्यवत आहे का हे 
जग अजूनही त्याच समाजव्यवस्थेत? 
उत्तराची माळ गुंफत 
प्रश्नाच्या प्रश्नालाही उत्तर 
आहे ....!
बाबासाहेबांच्या संविधानाने 
दिली शक्ती, पायात... 
फुलांच्या शाळेने स्वाभिमान!! 
वेचीत आहो आम्ही स्वप्नाचेफुले 
अभिमानाने उच्चपदस्थ होऊनी...
सन्मानाची चाल चालती 
समाजव्यवस्थेच्या उंच झोका होऊनी 
हिरकणी कालची गुलामव्यवस्थेचे 
हिरकणी आजची...
मुक्त समाजव्यवस्थेची.... संविधानाने 
मानसन्मान उंचावती 
क्षणोक्षणी....
स्त्रीयांच्या आत्मसन्मानाची !!!


                      ✍️©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आत्मसन्मान
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       





माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...