savitalote2021@bolgger.com

रविवार, १४ एप्रिल, २०२४

थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done"

  थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह)
            " संपला आहे माझ्यातला" 
Drops of Rebellion (Anthology)
 "I'm done"

थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह )
         "संपला आहे माझ्यातला"


Drops of Rebellion (Anthology)
 "I'm done"



✍️©️®️ सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

काव्यसंग्रह शीर्षक :-थेंब विद्रोहाचा
            " संपला आहे माझ्यातला" 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया असतात. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

------------------------------------

  *** प्रस्तावना ***
        ** Preface ***

      काव्य किंवा कविता एका विशिष्ट भावनेवर आधारित असते .विशिष्ट विचारसरणीवर आधारित असते. आपल्या आजूबाजूची परिस्थिती निर्धारित करण्यासाठी कधी शब्दांच्या सोबतीने काव्य लिहिले जाते.आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या शब्दांच्या सोबतीने कवितेची रचना होते, हे नक्की...!!

         कविता ही कला नसून ती जन्माने प्रतिभा मिळत असते तिला कितीही आपल्यापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्यामध्ये इतकी रुजली जाते की तिच्याशिवाय आपण आणि आपल्या शिवाय ती ही संकल्पनाच वेगळी करत नाही.
       मनाला उत्तेजन देणारी कविता असते. आत्मविश्वास देणारी कविता असते. शक्ती मिळवून देणारी कविता असते. अलौकिक आनंदाची परिकल्पना म्हणजे कविता. सर्जनशील शक्तीचा नवीन उगम म्हणजे कविता.

( A poem that stimulates the mind.  It is a poem that gives confidence.  Poetry is empowering.  A vision of supernatural bliss is poetry.  A new source of creative power is poetry.)

         आपल्यातील प्रेम इर्शाद्वेष भक्ती शक्ती आत्मविश्वास आत्मसन्मान सकारात्मक विचारसरणी मनातील विद्रोह इत्यादी मांडत असते. कवितेमध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक अशा विविध विषयावर भाष्य करीत आहे. कविता म्हणजे विशिष्ट यमकानी आणि विशिष्ट सुंदर शब्दांनी सजलेले कविता म्हणजे कविता नसून त्यामध्ये त्या वेळेच्या वेळोवेळी इतिहास लिहिला जातो .
         कविताचे विश्वव्यापक आहे. कविता लिहिताना / शब्दात मांडताना नेहमी लक्षात ठेवावे लागते. शब्द हे तलवारी सारखे आहे .लेखणी सोबत आल्यास एक नवीन इतिहास घडवू शकतो .कारण आज लिहिलेले शब्द उद्याचा इतिहास होतो.
(    Poetry is universal.  Always keep in mind while writing / putting into words a poem.  Words are like swords .A pen can make a new history if it comes with it .Because the words written today become the history of tomorrow.)

          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित दलित साहित्य विकसित झालेला आहे. बाबासाहेबांच्या विचारसरणीवर मनापासून जोपासणारी," मी एक रोपट आहे. ते जमिनीत अजूनही रुजलेले नाही तरी रुजण्याचा प्रयत्न भाषाशैली मार्फत केला जात आहे."                      
      काव्यसंग्रह ढोंगी स्वार्थी समाजव्यवस्थेवर भाष्य करणारे आहे. आपला समाजातील लोकांच्या मनातला विद्रोह संपला आहे. इतिहास विसरला जात आहे. असे सांगणारी भाषाशैली या काव्यसंग्रहात आहे .शब्दांच्या झंझावातातून कवयित्री आक्रोश प्रखर व्यक्त करते.

        "थेंब विद्रोहाचा", संपला आहे माझ्यातला...!! हा काव्यसंग्रह विद्रोही साहित्य यावर आधारित आहे. दलित साहित्य किंवा विद्रोही साहित्य वाङ्मयाचा एक प्रकार आहे. माणसाच्या प्रतिष्ठेचे व माणुसकीचे साहित्य आहे. विद्रोह प्रामुख्याने वेदना व यातना या भावनांचे चित्रण करते. दलितांची अस्मिता जागविणारे त्यांचे स्वप्न अंकुरित करणारे प्रगतिशील विचारसरणी भावना संवेदना हुंकार स्वप्नांची जोपासलेली माळ यासाठी सत्यात उतरवण्यासाठी विद्रोही साहित्य आत्मसन्मान देते.

   ( "Thempa muthurbacha", Sampala hai mere taala...!! This collection of poems is based on mutiny literature. Dalit literature or mutiny literature is a form of literature. It is a literature of human dignity and humanity. Mutiny mainly portrays the feelings of pain and suffering. It evokes the identity of Dalits.  The revolutionary literature gives self-respect to realize the cultivated seedbed of dreams, the progressive ideology that sprouts their dreams.)


        काट्याकुटात रानावनात कुंपणात उगवलेले काव्य म्हणजे दलित कविता. दलित साहित्य विद्रोही साहित्य होय, आणि हे सर्व या काव्यसंग्रहात मांडण्याचा प्रयत्न एक बंडखोरी भाषाशैलीतून प्रयत्न केला आहे. विषमता चव्हाट्यावर मांडणारी भाषा येते आहे.

         मराठी कविता परंपरेला विद्रोही साहित्य/ दलित साहित्य यांनी मोठे योगदान दिले आहे. कोणत्याही भाषेत असो ही त्या काळातील इतिहास सांगतो .मोजक्या भाषेत भाषेची मांडणी करत असते. हीच प्रतिभा त्याच्या साहित्यामध्ये उमटते.                 दलित साहित्य 'विद्रोही साहित्य हे सत्यावर आधारित आहे. संघर्षावर आधारित आहे. साहित्य हे दिशाहीन होणार नाही. साहित्याला एक पार्श्वभूमी आहे .तो म्हणजे विद्रोह...!!
           विद्रोह विशिष्ट बंडखोरी भाषेमध्ये येतात. एका विशिष्ट अर्थाने येतात .विद्रोह शब्दात मांडताना किंवा कवितेत मांडताना शब्दांची लढाई लढावी लागते. शब्दांना शब्दाशी संघर्ष करावा लागतो. आभाळातल्या माणसाला कधीही जमिनीवर आणता येत नाही आणि जमिनीवरचा माणूस आभाळात पंखा शिवाय उडू शकत नाही हे जितके सत्य आहे तितकेच विद्रोही भाषा जळजळत्या निखार्‍यासारखी आहे. विद्रोही साहित्य अस्पृश्य समाज व्यवस्थेतील व्यथा आणि त्यांच्या संघर्ष सांगत आहे. परिस्थिती बदलली तशी विद्रोहाची भाषा ही बदलली. 

(     Rebellions come in a specific rebellion language.  comes in a specific sense. When expressing rebellion in words or in poetry, one has to fight a battle of words.  Words have to fight with words.  As true as it is that a man in the sky can never be brought down to earth, and a man on the ground cannot fly in the sky without a fan, rebellious language is like a burning coal.  Insurgent literature tells the agonies of the untouchables and their struggles in the social order.  As the situation changed, so did the language of rebellion.)


        विद्रोही भाषा ही कधीही शांत संयमी समजूतदार नव्हती ती रानटी समजल्या जायची !!पण विद्रोही साहित्याने आपल्या शब्दातून जे शब्द त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगाचे होते त्या भाषेत दलित साहित्य विद्रोही भाषेत लिहून त्यांना त्यांच्या प्रश्नांचे जाणीव करून दिली.                            
        काव्यसंग्रहातील अशा प्रकारची भाषाशैली  येते. भाषा बदललेली असली तरी बदलता परिस्थितीनुसार समजूतदारपणा भाषेत आलेला आहे. जगण्याचे वास्तव बदलले, कान्या कोपऱ्यात अस्पृश्यतेची बंडखोरी अजूनही चालूच आहे. आम्हाला दगडावर कोरलेल्या सुंदर आकृतींची आवश्यकता नाही. दगडाच्या फुलांना कितीही सजवले तरी ते दगडाचेच फुल असते वेळ पडल्यावर ते फुल सुगंधी होत नाही म्हणून विद्रोह समाज व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये अजूनही धगधगत आहे.
           वैचारिक बांधिलकीमुळे त्या वाटा दुसरीकडे वळतच नाही. कारण विद्रोह आमच्या रक्तात आहे. विद्रोह आमच्या बापाच्या रक्तात होता. विद्रोहा आमच्या साध्या सरळ बोली भाषेत आहे.
        कधी कधी विशिष्ट विचारसरणीवर विचारधारेवर कविता लिहिताना त्या विचारधारेचा अभ्यास करावा लागतो पण विद्रोही साहित्य हे आपल्या रक्तात आहे. इतिहासातील जखमा अजूनही आपल्या रक्तात ताज्या आहे." डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ,"केलेला विद्रोह हा जगजाहीर आहे .यांच्या विद्रोहामुळे आज ही समाज व्यवस्था दिसत आहे .गावकुशाबाहेरील व्यवस्था आज विकास प्रवाहात आणले जात आहे. जळत्या निखार्‍यावरची समाजव्यवस्था आज मुख्य प्रवाहात आली आहे. तरी आपल्यातला विद्रोह अजूनही संपला नाही. दलित समाजव्यवस्थेत संघर्षाची पावले चालूच आहे. कारण विद्रोह हा दडपणाखाली नाही..... तो विद्रोह आहे, बाबासाहेबांच्या शब्दात ...!!
     तो विद्रोह  आहे बाबासाहेबांच्या संघर्षाच्या यशोगाथेत....  तो विद्रोह आहे श्रीमंत गरीब चाकोरीबद्ध व्यवस्थेत ......तो विद्रोह आहे बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये.....!! म्हणून "थेंब विद्रोहाचा ,संपला आहे माझ्यातला", या काव्यसंग्रहात बाबासाहेबांना अभिप्रेत नसलेली समाज व्यवस्थेवर भाष्य केले आहे.
        विद्रोह शांत आहे. संयमी आहे .समजूतदार आहे.... पण तो विद्रोह आहे. कारण विद्रोहा कोणत्याही विशिष्ट भाषाशैलीला बंदिस्त करून ठेवत नाही. (Rebellion is quiet.  It is moderate .sensible.... but it is revolting.  Because rebellion does not confine itself to any particular style of language) बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या भाषेनुसार बदललेल्या सामाजिक परिस्थितीनुसार हा विद्रोह कवितेमध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.
        हंबरडा फुटला आहे ;समाजव्यवस्थेत पण तो हंबरडा दबक्या पावलाने आहे. दबक्या आवाजांनी आहे आणि हाच हंबरडा ,'थेंब विद्रोहाचा ,संपला आहे माझ्यातला "या काव्यसंग्रहात मांडण्याचा प्रयत्न आहे .

(   Humbarda has broken; in the social system, but that humbarda is with a subdued step.  It is with subdued voices and this is the humbarda, 'drop of rebellion, has ended in me' is an attempt to present in this anthology.)

          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारसरणीला अनुसरून आहे. आपला प्रवास आपला विकास हा आपला आहे. त्यासाठी आम्हाला अधिकार दिले आहे. संविधानाच्या पाने  पानोपानी आमच्या अधिकाऱ्यांनी भरले आहे .तरी या अधिकारापासून समाजातला काही भाग दुर्लक्षित होत आहे. जो समोर गेला आहे ,तो श्रीमंत आहे .....जो मागे राहिला तो गरीब आहे .
               आताचा विद्रोह श्रीमंत गरिबाचा आहे. आताचा विद्रोह प्रगती अप्रगतीचा आहे .आताचा विद्रोह यश आणि अपयशावर आहे. काव्यसंग्रह समाजव्यवस्थेच्या प्रवासाला कवितेत मांडण्याचा थोडाफार प्रयत्न केला गेला आहे. अनुभवाचा अभाव तुमच्या लक्षात येईल; कविता वाचताना पण हा विद्रोह माझ्या अनुभवावर आधारित आहे. 
        माझ्या विचारसरणीवर आधारित आहे जी विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कारातून माझ्यात रुजला आहे. कारण माझा  DAN हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. " थेंब विद्रोहाचा, संपला आहे माझ्यातला." हा काव्यसंग्रह बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित नसलेल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करीत आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था आज प्रत्यक्षात दिसून येत नाही आक्रोश अजूनही जन मनात आहे.

( Based on my ideology which is ingrained in me from Dr. Babasaheb Ambedkar's Sanskar.  Because my DAN belongs to Dr. Babasaheb Ambedkar.  "The drop of rebellion is over in me.  This collection of poems is commenting on the social system which is not based on Babasaheb's ideology.  The social system intended by Babasaheb is not seen in reality today, the outrage is still in the minds of the people.)

           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त हा काव्यसंग्रह ऑनलाइन प्रकाशित करीत आहे. बाबासाहेब यांचे विचार समानतेवर आधारित आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार बाबासाहेबांनी मिळून दिले. त्यांच्या या कार्याला माझा हा छोटासा काव्यसंग्रह समर्पित आहे." थेंब विद्रोहाचा, संपला आहे माझ्यातला".
       हा काव्यसंग्रह बाबासाहेबांना अभिप्रेत नसलेल्या विचारसरणीवर आधारित आहे...!!


============1================


****  दोन शब्द काव्यसंग्रहाबद्दल  ****
( About the Anthology Two Words )

       थेंब विद्रोहाचा संपला आहे माझ्यातला
 ( A drop of rebellion is over in me )


             मराठी साहित्यात 1960 नंतर विविध प्रवाह साहित्यात उदयास आले,याच काळात दलित साहित्य, ग्रामीण साहित्य ,आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य. असे अनेक विविध प्रकार  साहित्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. दलित साहित्य प्रवाह 1960 नंतरच्या मराठी साहित्यात विकसित झालेला एक साहित्यप्रकार आहे. दलित साहित्य /विद्रोही साहित्य या नावाने ओळखला जातो. सर्वांना समान संधी या तत्त्वावर आधारित विद्रोही साहित्य आहे.
           दलित साहित्य प्रकार हा विश्वस्तरावर चर्चिला जातो. दलितांच्या मुक्तीचे हत्यार आहे. दलित साहित्य समकालीन वास्तवावर सामाजिक विषमतेवर अत्याचाराचे परखड भाषा विषमतेविरुद्ध आक्रोश करते. दुःख दारिद्र्य गुलामगिरी यासारख्या बंधनांना उगाळत बसून काहीही उपयोग होणार नाही त्यावर उपाय म्हणून विद्रोही साहित्य आपले मत मांडताना दिसतात.
      त्यासाठी दलित साहित्य नकार दुःख लाचारी बेकारी गुलामगिरी शोषण वेदना सहन करून हा वर्ग जगत आहे. दलित /विद्रोही साहित्य वर्ण आणि वर्णवादाच्या विरुद्ध आवाज उठवतो आणि हेच काव्यसंग्रहात  सांगण्याचा प्रयत्न आहे.
        विद्रोही साहित्य समता बंधुत्वा न्याय प्रज्ञा  स्वातंत्र्य या मानवी मूल्यांना पुरस्कृत करते. विद्रोही साहित्य आत्मशोध घेणारी पायरी आहे. नवे पंख देणारी पायरी आहे .विद्रोही समाजाला बंधन मुक्त करण्याची पायरी आहे. कवितासंग्रहात हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दलित कवितेच्या माध्यमातून मराठी साहित्याला व्यापक स्वरूपात माणसाचे सुखदुःख त्यांची वैचारिक पार्श्वभूमी व्यापकता सर्वच कवितेमधून दिसून येते .
         भाषाशैली  विशिष्ट पांढरपेशी समाजाला ती न आवडणारी आहे पण विद्रोही साहित्यातील सामाजिक बांधिलकी या काव्यसंग्रहाची आस्था समाजाबद्दल आहे. समाजाच्या विषयाबद्दल संस्कृतीबद्दल आहे. कविता दुःखाला वाचा फोडते. कविता वाटचालीची इतिहास सांगते. वर्तमानाची परिस्थिती सांगते. जीवनाचे वास्तव सत्य ते सांगते. वास्तविक जगात आणि भविष्यात काय परिणाम होऊ शकतो ही सांगणारी कविता आहे.
        कवितेत लाचारी नाही, कवितेत आपलेपणा आहे. कविता कुणाला कुणाच्याही धर्माबद्दल भाष्य करत नाही. कविता कुणाच्याही राजकारणावर समाजकारणावर सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अर्थकारणावर या कोणत्याही विशिष्ट धर्म संस्कृतीवर भाष्य करत नाही तर कविता समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या त्या मानसिक व्यवस्थेविरुद्ध बोलत आहे. बदलता क्रांतीचा संदर्भ घेऊन नवीन झरा उगवला पाहिजे. नवतेजाची नवीन पहाट उगवली पाहिजे. 
        समकालीन वास्तव आणि सामाजिक विषमता सरळ साध्या भाषेत नव्या जाणीव निर्माण करणारी भाषा वापरून केली आहे. संघर्षाचा प्रवास आहे पण तो प्रवास आता आपण बदलत चाललो आहोत का? हाही प्रश्न  उपस्थित होते. 

(    Rebel literature upholds the human values ​​of equality, fraternity, justice, wisdom, and freedom.  Rebel literature is a step towards self-discovery.  It is a step to give new wings. It is a step to free the shackles of a rebellious society.  An attempt has been made to convey this in the collection of poems.  Through Dalit poetry, Marathi literature in a broad form shows the happiness of people, their ideological background and breadth in all the poems.
 The style of language is distasteful to the particular white-skinned society but the social commitment in rebel literature is the anthology of the poem's interest in society.  The subject of society is about culture.  Poetry breaks through grief.  The poem tells the history of the movement.  Tells the current situation.  It tells the real truth of life.  It is a poem that tells about what can happen in the real world and in the future.
 There is no helplessness in poetry, there is belonging in poetry.  Kavita does not comment on anyone's religion.  The poem does not comment on anyone's politics, social cause, cultural background, economy, any particular religion, culture...)

          कविता आधुनिक काळात काही नवे बदल घडविता आहे. आपले दिवस परत बदलत चालले आहे का???  जाणीवा सामाजिक विचार नव्या जाणिवा स्वीकारून आत्मजाणीव हादरे बेरोजगारांबद्दल बोलत आहे. इथं बदलत्या सामाजिक मानसिक ते विरुद्ध बोलत आहे. इथल्या दुःख व्यथा वेदना शब्दबद्ध करण्याचा कवितेत प्रयत्न आहे. समाज तुटलेला आहे त्यांना एकत्र यावं लागेल कारण गावकुशाबाहेरील अजूनही स्मशान  वाट खुलीच आहे. आपण तिकडे चालायचे का? ती संघर्षाला आपल्या असंतोषाला उपेक्षित जीवनाला आधुनिक काळातील नवे वारे थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करायचा का? हा आक्रोश हा संदेश या काव्यसंग्रहात मांडण्याचा हा प्रयत्न. 
             समाज वेगवेगळ्या झाला आहे समाजातील लोकांचे विचार वेगवेगळ्या आहे वृत्ती प्रवृत्ती वेगवेगळी आहे पण दुःख तेच आहे दुःखाची परिशिमा तीच आहे दुःखाचे मूळ अजूनही तिथेच आहे स्त्रियांचे जीवन पराकोटीला जाण्याच्या मार्गावर आहे. स्त्री जीवन ही विशिष्ट एका समाजापुरते मर्यादित नाही तर समाजातील त्या बुरशी मानसिक ते विरुद्ध लढा देत आहे.

(   The society has become different, the thoughts of the people in the society are different, the attitudes are different, but the suffering is the same, the limit of suffering is the same, the root of the suffering is still there, the life of women is on the way to the end.  A woman's life is not limited to a particular society but she is mentally fighting against the mold of that society.)

         कवितासंग्रह जुन्या पिढीला नवीन पिढीची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रगतीच्या पटांगणावर अजूनही अविकासाचे झाड लावले जात आहे. सोयीसुविधा मिळाल्या तर आपण त्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ पण सोयीसुविधा मिळालेली लोक आपल्यापासून तुटत आहे .जीवन संघर्ष त्यांचा सोपा झाला आहे म्हणून आता संघर्षाची वाट त्यांनी सोडली आहे हे सांगणारा काव्यसंग्रह आहे.
        संकुचित विचारसरणी या काव्यसंग्रहात कवितेचा मार्फत सांगण्याचा प्रयत्न आहे. प्रेमाची भाषा कितीही आपली असली तरी विद्रोहा संपलेला आहे, तरीपण विद्रोह कुठेतरी शब्दांमार्फत लपून छपून येत आहे. शब्दांच्या भिंती कितीही बांधल्या तरी दुःख मात्र तिथेच आहे. मनाच्या प्रतिक्रिया तिथेच आहे कारण मी मानसिकतेच्या विचारसरणीतून विचार करते आहे हे सांगणाऱ्या हा काव्यसंग्रह आहे.
         " थेंब विद्रोहाचा ,संपला आहे माझ्यातला," काव्यसंग्रह हे आशावादाचे स्वरूप आहे. नवे सामर्थ्य आणि विचाराची जाणीव नवीन दृष्टिकोन  काव्यसंग्रहात मांडण्याचा प्रयत्न आहे .कविता एका वळणावर आपली वाटते .....कवितेत नकार आहे..... कवितेत विद्रोह आहे .....कवितेत  भाषिक सौंदर्य आहे .......शब्दरचना वेगवेगळी आहे ......रूपक प्रतिमा यमक या भानगडीत न पडता विशिष्ट एका भावनेला शब्दबद्ध करण्याचा काव्यसंग्रहात प्रयत्न आहे.

( "Thempala hai Mereta" of Themba rebellion is an anthology of optimism. It is an attempt to present a new power and consciousness of thought, a new perspective in the anthology.  ..There is linguistic beauty in the poem....The wording is different....Anthology is an attempt to articulate a specific feeling without falling into the metaphorical image rhyme.)

            बाबासाहेबांना प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध अभिप्रेत असणारी ही कविता आहे. शोषण या कवितेत आहे ....विषमता हा या काव्यसंग्रहाचा गाभा आहे. समानतेचा उद्रेक या कवितेचा आत्मा आहे .स्वातंत्र्य न्याय बंधुत्व समानता सामाजिक न्याय लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारा हा काव्यसंग्रह आहे. समाज वास्तवाला अनुभवाला आलेले जग हेच या काव्यसंग्रहाचा विषय आहे.
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेत  पिळल्या गेलेल्या भरडल्या गेलेल्या दलित समाजाला जागृती निर्माण करण्याचे काम केले याकरिता शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले. संघटित होऊन संघर्ष साठी आणि स्व हक्कासाठी त्यांनी तयार केले. अस्पृश्यांच्या हक्कांची चळवळ अस्पृश्य मुक्तीसाठी लढ्यामध्ये उभारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गाला गुलामीची जाणीव करून दिली .
      गाव कुशापासून ते गोलमेज परिषदेपर्यंत अस्पृश्यांचे प्रश्न मांडले. सभा आंदोलने परिषदेत सत्याग्रह पक्ष संघटना पत्रकारिता इत्यादी माध्यमातून प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभा केला. आपल्या हक्कासाठी झगडावे लागेल ही जाणीव निर्माण केली. दलित समाजाला समाजातील लेखकांना अस्मिता मिळाली बाबासाहेबांच्या विचारसरणीतूनच दलित साहित्याचा जन्म झाला.               क्रांतीची लाट उसळली आणि संकुचित विचारसरणी, मर्यादित जीवनशैली खुल्या जीवनशैलीमध्ये परिवर्तित झाली. शिक्षणाचे महत्त्व आणि आग्रह त्यांनी धरला.शिका संघटित व्हा संघर्ष करा हा विचार दलित वर्गात दिला. दलित साहित्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे. विचार आणि प्रेरणा तेच आहे. दलित साहित्याचे खरे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा आहे. आधुनिक शिक्षण हेच वैयक्तिक व सामूहिक विकासाचे एकमेव साधन आहे.      
       जातीभेद धर्मभेद चातुर्य वर्णभेद हे जर मुळापासून नष्ट करायचे असेल तर बंडखोरी ही रक्तात असावी लागते. तो ज्वालामुखी रक्तात असावा लागतो. आधुनिक युगात मानवाच्या उद्धारासाठी बंडखोरीचे पावले  काव्यसंग्रहात आलेले आहे.
         काव्यसंग्रहाच्या कवितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब बदलता काळानुसार बदलता समाज व्यवस्थेनुसार स्वरूपानुसार बदलत आहे. दलित साहित्य विशिष्ट काळात विशिष्ट सामाजिक राजकीय सांस्कृतिक पार्श्वभूमीवर भाष्य करीत आली आहे. अजूनही करीत आहे.कायदा राजकारण यांचा समग्र सामाजिक आग्रह धरला जात आहे. बदलत्या जीवनाचे साहित्य अविष्कार असते. बदलणार तर कोणत्या अंगाने त्यातील विद्रोह बदलणार का विद्रोही दलित साहित्याची मूळ प्रेरणा मानले जाते ती कोणती विशिष्ट वळणावर आकार घेऊ लागली आहे.   
        दलित साहित्य माणुसकीच्या हक्कासाठी असलेले साहित्य आहे. सामाजिक बांधिलकी मानवतावादी आहे. माणुसकीच्या मुक्तीचा आवाज दलित साहित्य आहे.

      थेंब विद्रोहाचा संपला आहे माझ्यातला हा कवितासंग्रह त्या दलित समाजाच्या प्रतिनिधित्व करते .....त्या उपेक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करते परिस्थितीनुसार आम्ही बदललो पण आमच्या जाणिवा मात्र तशाच असायला हव्या होत्या पण त्या तशा नाही. बाबासाहेबांची शिकवण गावकुशावर आयुष्य रानटी समजल्या जाणाऱ्या समाज व्यवस्थेचे प्रतीक आणि माणसाला माणूस पण जगविणारा विचार बदलला. त्या व्यथा वेदना या काव्यसंग्रहात मांडण्याचा माझा प्रयत्न .

(      Themba Mutiny is over. This collection of poems in me represents that Dalit society ..... it represents that marginalized society.  Babasaheb's teaching changed the idea of ​​village life as a symbol of the social system which was considered to be barbaric, and the idea of ​​making man a human being.  My attempt to present that pain in this collection of poems. ) 

       माझा कवितासंग्रह कोणत्याही सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक किंवा विशिष्ट व्यक्ती विषयक विचारांवर आधारित नाही ,तर माझा काव्यसंग्रहा बदलत्या माझ्या समाजाच्या बदलत्या व्यवस्थेविरुद्ध आहे. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला आणि ओंजळीभर पाण्याने इतिहास घडविला. जगण्याचे आवाहन खूप होते. त्या प्रत्येक आवाहना बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. त्या उत्तराची प्रतिक्रिया म्हणजे आपण आणि आपण आताची परिस्थिती स्वार्थी पद्धतीने जगताना घेत आहोत.
        म्हणून संपला आहे माझ्यातला विद्रोह कदाचित असे वाटून जाते पण तो संपलेला नाही कारण माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात विद्रोह आहे. म्हणून या काव्यसंग्रहाचे नाव "थेंब विद्रोहाचा, संपला आहे माझ्यातला ,"असे ठेवण्यात आले आहे.
(  So the rebellion in me is over it may seem but it is not over because there is rebellion in every drop of my blood.  Hence the name of this collection of poems is "Them muthurachacha, Sampala hoe mere taala".)

        उज्वल भविष्याचा आशावाद या काव्यसंग्रहात मांडण्याचा थोडाफार प्रयत्न. भाषा परखड सौम्य लवचिक नवीन जाणिवेने पेटून उठणारी विद्रोहाचे भाषा बोलणारी स्त्री विद्रोहाला पुरस्कृत न करणारा पुरुष आणि आपली परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एकच पाऊल आपल्याजवळ आहे ते म्हणजे शिक्षण... हे सांगणारा हा काव्यसंग्रह..!
          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या सुधारणा केल्या जातील. संशोधन केल्या जाईल कारण बदल हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण तो बदल स्वीकारून आपल्यामध्ये परिवर्तन घडविणे ही काळाची गरज आहे म्हणून माझा विद्रोह  हा फक्त थेंब आहे; तो पाऊस होऊ शकत नाही. कारण त्याला मर्यादा आहे. सामाजिक न्यायव्यवस्थेची, भारतीय संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची...!!❤ धन्यवाद...!!

------------------ 2 ----------------

*******  अनुक्रमाणिका ********
              *** index ***
1. पिंजरा
2. भूक
3. माणुसकीचे वारे
4. जबरदस्ती
5. अर्ध्या रस्त्यावरून चालताना
6. हिशोब
7. तुझ्या माझ्या प्रेमाला
8. मेंढरासारखे जगण्यापेक्षा
9. अशांत वाटेवरची वाटाघाटी
10. एक नजर विद्रोही
11. चिखल
12. मी शिकतो आहे
13. संपला आहे विद्रोह माझ्यातला
14. लिहू शकत नाही विद्रोह
15. अस्तित्वाचा विद्रोह
16. वसाहत
17. अस्पृश्यतेचे चटके
18. टोपलीतील भाकरी
19. अभिमान
20. चळवळ होत आहे
21. चला रे
22. आशावाद
23. परिवर्तन
24. अमान्य करू नये
25. कवटाळून माणुसकीला
26. आय एम बुद्धिस्ट 
27. ललकारी
28. फुंकार 
29. अजूनही ती उच्चवर्णीयच 
30.अजूनही जिवंत आहे
31.अंगण 
32.आधी त्यांनी जात विचारले 
33.झाड 
34.प्रवाह 
35.जंजाळ 
36.भाकर


------------------ 3 ----------------


       समकालीन वास्तविकतेवर ही कविता आधारित आहे. हातात धागेदोरे बांधून काही होत नाही,तर स्वातंत्र्य पिंजरा विचारांचा असावा.
     शाहू फुले आंबेडकर यांच्या चळवळीमुळे आम्ही मुक्त झाला आहोत. विकल्या गेलेल्या फालतू मानसिकते मुळे पिंजरा परत आपल्या वाटेला येईल का...?
          याच भाव संवेदनेतून या कवितेचा जन्म झाला आहे. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!
       धन्यवाद.....!!💕

**** पिंजरा ****

गगन भरारीला पिंजरात कैद 
कसे करू पाहता 
समानतेच्या गगनात 
असंतोषाचे वारे का वाहतात 

अंधश्रद्धेच्या माणसाला 
खुल्या बाजाराची पायवाट का 
दाखविता आधुनिकतेच्या युगात का 
रुजविता नवीन पिंजऱ्याची संस्कृती 

फुंकर लढण्यासाठी द्यावी 
पिंजऱ्यातील कैदेसाठी नाही 
धागा दोरांच्या बंधनासाठी नाही 
तर मानवतेच्या संरक्षणासाठी द्यावी 
सुटा बुटातला माणूस 
फाटक्या मानसिकतेच्या पिंजरात का 
कैद करावे 

जुन्या रूढी परंपरेतील पिंजरापेक्षा 
नक्की तू ज्ञानाच्या उजेडाचा 
आक्रोश घेत स्वाभिमानाच्या 
पिंजरात विणावे, 
नवीन पिंजरांच्या विणा 

स्वातंत्र्याच्या लाटेवर 
उबदार स्वप्नाचे भविष्य 
गगन भरारीला 
स्वकवेत घेण्यासाठी 
विशाल बाहुबलीत 

पिंजरा नको आहे विद्रोहाला 
पिंजऱ्यातला विद्रोह 
शांत झाला आहे 
शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीने 
कारण कालचा गुलाम 
आज स्वातंत्र्य झाला आहे 
उजेडातील प्रकाशाने....!!💕
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- पिंजरा
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

          समानतेच्या भुकेसाठी आसुसलेला हा समाज विद्रोह करायचा नाही कारण प्रत्येकांची भुक  वेगवेगळी आहे. अन्न वस्त्र निवारा शिक्षण सुरक्षा रोजगार ही या भूक कवितेची संकल्पना आहे. 
      भूक प्रत्येकांची वेगवेगळे आहे पण देशाची भूक "समानता"आहे. गल्लीबोळात ही सांगणारी कविता. कवितेत विद्रोह हा हळुवारपणे येतो तो समजून घ्यावा लागतो.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्यातला विद्रोह यापैकी कोणता आहे हे ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा...!!💕

 *** भूक ***

कोरड्या पापणीतून अश्रू ही 
येत नाही कारण रडायचे का?
हे ही माहित नाही 
जगणारा जगत राहतो 
अस्मितेबरोबर पण ते चेहरे 
ओळखता येत नाही 

समानतेच्या विचारांचे आता 
तुकडे होत आहे 
अश्रू गालांवरच्या माणसाला 
भुकेची वेदना देत आहे 
भूक अनेक प्रकारची 

कुणाला पोटाची 
कुणाला सत्तेची 
कुणाला अहंकाराची 
कुणाला स्वाभिमानाची 
कुणाला देशाची 
कुणाला समाजाची 
कुणाला विचारांची 
कुणाला शिक्षणाची 
कुणाला स्वार्थीपणाची 
कुणाला समानतेची 
कुणाला स्वातंत्र्यतेची 
.....भूक वेगवेगळी  

भुकेचे तुकडे झाले  
तरीही आशा एकच आहे 
या विद्रोहाला संघर्षात घेऊन 
न जाता आपुलकीच्या मायेने 
एकत्र ठेवावे 
भूक असली तरी 
देशाची आहे 

समाजव्यवस्था विषमतेवर 
चालत नाही निसर्गही त्याला 
मान्य करीत नाही म्हणून 
उगवत्या स्वातंत्र्याला 
घट्ट बांधून गल्लीबोळात 
डोक्यावर घेऊन फिरावी 
ही भूक 
समानतेची...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- भुक
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
         

       भावनांचा झरा खळखळ करून वाहतो आहे. भाषेतील परिवर्तन सांगणारी ही कविता. प्रेम पाणी फुले समूह कातरवेळ समुद्र गुलाब मोगरा यामध्येच कविता अडकून पडली आहे का? असे वाटत असताना आपण दुर्लक्षित केले आहे का? 
       कुंपण तोडून प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विकास प्रवाहात आणलेले कदाचित याचे उत्तर हो ...!!येते.
        म्हणून आता शब्द विद्रोहाकडे वळले आहे. ती जाणीवच या कवितेचे मांडलेली आहे. सामाजिक विषमता आजूबाजूची परिस्थिती किती बदलत चालली आहे ही सांगणारी कविता, "माणुसकीचे वारे"...!!
     आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..!! धन्यवाद...!!💕💕💕


*** माणुसकीचे वारे ***

पानाफुलावर लिहिता लिहिता 
आता विद्रोह लिहायला लागले  
मनातला विद्रोह ज्वालामुखी 
शांत करण्यासाठी 
अत्याचाराच्या परखड भाषा 
आता शब्दशैलीत उतरवायला 
लागले इकडे तिकडे पाहता 
पाहता माझेच शब्द 
लाजायला लागले 
उपेक्षितांच्या जीवनाचा संघर्ष 
आता शब्दात मांडला  
मनात पेटला आहे असंतोषाचा 
ज्वालशब्दमुखी 
पावसाचे थेंब आता 
कहाणी सांगतो आहे 
ओंजळभर पाण्याची हळहळ 
असलेल्या जखमेची 
बहरलेल्या आणि न बहरू दिलेल्या 
....स्वाभिमानाची कथाकाहणी  
निभवायचे असते शब्दाबरोबर 
आपलेपण निभवायचे असते 
वेगवेगळ्या वाटांवर 
वेगवेगळ्या भाषाशैलीवर 
वेगवेगळे समानतेची भाषा 
इकडे तिकडे पहात पहात 
लिहीत आहे समानतेचे वारे 
विद्रोहाचे वारे 
वंचितांचे वारे  
माझ्या तुमच्या माणुसकीचे वारे 
आपल्या माणुसकीचे वारे


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-माणुसकीचे वारे 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

        कविता स्त्री आक्रोश स्त्रियांना विद्रोहाकडे धावपळ करावी लागेल जबरदस्तीने  कारण आजूबाजूची परिस्थिती आधुनिक असली तरी ती विशिष्ट मानसिकते मधून निघालेली नाही.
       येणाऱ्या रोजच्या बातम्या आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा यातून कळते. विद्रोहाची ललकारी स्त्रियांना स्वतःच्या हातात घ्यावी लागेल आणि लढावी लागेल.
        कारण मनुचा कायदा हा काही निसर्गाचा कायदा नव्हता म्हणून अन्याय पुरुषी समाजाविरुद्ध आता निर्भीडपणे लढावी लागेल.... ही सांगणारी कविता.
       सामाजिक मानसिकतेवर भाष्य करणारी ही कविता. त्या पार्श्वभूमीवरून भावसंवेदनेतून या कवितेचा जन्म झाला आहे.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कविता स्वलिखित की स्वरचित आहे...!! धन्यवाद..!💕

*** जबरदस्ती ***

तुमचे स्वागत नाही 
समानतेमध्ये 
तुमचे स्वागत नाही 
माझ्या पानवट्यामध्ये 
तुमचे स्वागत नाही 
ओघळणाऱ्या अश्रूमध्ये 
तुमचे स्वागत नाही 
निळ्या माणुसकीच्या वाऱ्यामध्ये

काल परवा स्त्री अर्धनग्न फिरत होती 
दारोदारी दोन शब्द तर सोडा पण 
साधा एक चिंधीचा तुकडा ही 
तिला मिळाला नाही ही संस्कृती
माणसाचा भाकरीला किंमत असते 
हे माहीत होते पण आता 
अन्याय अत्याचाराला किंमतच नाही 
हे माहीत झाले एकदाचे  
वळून पहावे तेव्हा तुमची कालची 
परिस्थिती आणि त्या आधीची परिस्थिती 
स्त्री म्हणून....
तुम्हाला कोणते जीवन होते ?? 
रूढीवादीव्यवस्थेमध्ये...!

विद्रोहाचा नाव निशाणीही तुमच्यात नाही 
हे जग जाहीर झाले 
अंगात देवी येते म्हणून 
साडी लुगडी कपडे बांगडी घेऊन जातात
पावणाऱ्या देवीला सौंदर्याचे सामान घेऊन जातात
न आलेल्या देवीसाठी इतक काही असते 
तर माणुसकीच्या देवीसाठी 
फाटका तुटका कपडा ही नसतो 
हे ही आज कळले 

अन्यायाला स्त्रीस स्त्रियांना 
सोबत करू शकते 
कालची ती स्त्री कुणाची तरी 
मुलगी असते तुझ्यासारखीच 
कुणाची तरी 
आई असू शकते तुझ्यासारखीच
तुझ्यासारखे सर्व नाते तिच्याही 
आजूबाजूला असू शकते 
मग तिच्यासाठी वेगळा न्याय का?
ती उपेक्षित आहे म्हणून
ती हतबल आहे म्हणून 
त्या क्षणाला 

तुझ्यातला विद्रोह ज्वालामुखी 
होऊन आता पेटवावा लागेल 
वेळ समजून घ्यावी लागते 
माणूस व्हावे लागते 
जगण्यासाठी 
काळा मनूचा कायदा 
काही जगू देत नाही 
आंधळी लढाई आंधळे शिपाई 
एकटीच भिजत आहे 
दिशाहीन संस्कृती 
चौकट नसलेली ... त्यांची थकलेली
तुला सोसावे लागेल त्यासर्व 
यातना लैंगिकतेच्या भोगवस्तूच्या
तू शिपाई झाली तर त्या 
आंधळा लढाईची..! 
पावले उचलावी लागेल 
त्या आक्रोशातील शब्दांसोबत 
स्वातंत्र्य स्त्री म्हणून जगण्यासाठी 
जबरदस्तीने...!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
कवितेचे शीर्षक :- जबरदस्ती
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

         कविता जगण्याच्या वाटा बदलत चालले आहे ही सांगणारी आहे. जगण्याच्या वाटा का बदलला हा विद्रोह कुठेतरी संपत चालला आहे का ??जग आपत्तीत असताना बदललेले स्वरूप आणि अस्तित्वात असलेलं वास्तविक जग यामध्ये फरक आहे तरी समानतेची वाट अजूनही कुंपणापलीकडेच आहे.
        देऊळ सोन्याने सजली माणसे कर्जबाजारी झाली शाळा पडकी झाली जनता बेरोजगार झाली तरी आम्ही त्या समाज व्यवस्थेवर अजूनही विश्वास ठेवतो आहे हे सगळ बदलेल हे सगळं ठीक होईल विषमतेची दरी नष्ट होईल पण ते होताना दिसत नाही.
        म्हणून कवितेमधला विद्रोह सांगतो आहे, सोन्याच्या कळसाला श्रद्धेने हात जोड हे काही गैर नाही गुन्हा नाही पण समानतेच्या वाटेसाठी तुम्ही स्वतः स्वतः क्रांतीचे पाऊल उचलावे लागेल आत्मविश्वासाने....!! 
           कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यांना सुधारला जाईल योग्य न्याय दिला जाईल.धन्यवाद❤

**** अर्ध्या रस्त्यावरून जाताना *****

अर्ध्या रस्त्यावर मध्येच देऊळ आले 
सुंदर सुरेख,पाय थांबले पाय मंदावले 
मन धावले आवेगाने त्याच्या पायाशी 
घुसमट श्वासात चालू  
ओळखीयाड नजरेला चुकवत दर्शनही घेऊन
......कळलच नाही कधी आलो इथे 
विकल्या गेलेल्या मनाला 
शून्य झालेल्या मनाला 
अजूनही देवळाची आस आहे 

उगवत्या विचारांच्या विचारात अजूनही 
देवळाचा रुबाबदार महत्त्व मनात 
सर्व जग बंद झाले होते 
तेव्हा तोही बंद झाला होता 
एकही शब्द न बोलता 
जीवन दिशाहीन झाले होते 
भुकेला अधिकच भुकेला होता 
तरी लढला आनंदाने कारण वाऱ्यालाही 
जखमा होत्या ......सोहळा होता 

मनस्वीपण रंग उधळणारा 
कोणी दुसराच होता 
पुजारी कधीच घरी आला नाही 
दान दक्षिणेसाठी सगळं ऑनलाईनच  
तेव्हा कुठे होतास 
फेकून दिलेल्या कुंपणाकडे 
आम्ही होतो तू कुठे होतास 
खड्ड्यात पडलेल्या चाकरमान्याची 
जेव्हा मान दगडाखाली होती 
तेव्हा तू कुठे होतास 
लाटांचा हुंदका उगाच गिळत 

मग आता का मान झुकवली 
आता का तुला त्याच्या पायाशी यावे लागले 
मंदिर बघ; ती मूर्ती बघ... कशी सोन्याने 

सजलेली सोन्याने मडवली 
देवा तुझेच दिवस हे 
....ते आमचे 

आम्ही कुंपणाच्या बाहेर अगदी अगदी सहज 
निळा निळावेलींमध्ये सजलेलो  
क्रांतीचे पाऊले घेऊन जाऊन आलो
तांत्रिक -मांत्रिका कडेही  
पण मन कुठे शांत होत नाही 
पुजाराला विचारले काय करावे 
तो म्हणाला हवन कुंड करा 
हे करा ते करा सर्व करायची इच्छा झाली 
पांगळे मन माझे नाही खेळले 

ज्योतिषाचाही सल्ला विचारून घेतला 
सोन्याने सजलेला कळसाला बघून 
मन श्रद्धेने दानपेटी कडे गेले 
वेचलेल्या फुलांना आता ठेवावे म्हणून 
पण आठवले माझी दलित वस्ती 
भुकेने आक्रोश करणारे चेहरे
शृंगारलेल्या स्त्रिया मुळापासून 
जमीनदोस्त झालेले संसार 

उधारीच्या झेंड्यावर आंधळी उजाळलेली पहाट 
 पाय थांबले मन आंधळे झाले 
चिंध्या झालेल्या बेरोजगाराला 
आता प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या झेंड्याची 
गरज नाही तांत्रिकाची गरज नाही 
मांत्रिकाची गरज नाही ज्योतिष्याची गरज नाही 
पुजाऱ्याची गरज नाही सोन्याने सजलेल्या देवळांची गरज नाही 
ग्रहांची दिशा उपास तपास व्रतवैकल्य 
सर्व काही येथे फेल झाली 

उगवणाऱ्या श्रद्धेला अंधश्रद्धेने मात केली
या भडव्या मनाला समजत नाही 
ही फालतुगिरी विकला जाऊ नकोस 
म्हटलं तर तो विकला जातो 
मंदिराच्या दानपेटीकडे तरीही हात जातो 
तरी खिडकीतून येणारा जाळ मात्र 
आपल्याकडेच येतो 

आम्ही वळवळणारे किडे आहोत 
किडे कधी शांत बसत नाही 
विचारात एक विद्रोह पेरला 
विचाराला सुहासिक वासापेक्षा 
तिकटाची फोडणी दिली विचाराला 
परत शेवटच्या क्षणी नेऊन ठेवले 

बिन्डोकाच्या भडव्या माणसा 
तू स्वतः घुसमटतो तुझा श्वास कोंडलेला  
ओढून ओढून अंधारात नेल्या जात आहे  
तुझ्या समोर पर्याय ठेवले जात आहे 
वनवा केशरी असला तरी त्याला 
पाठबळ मात्र तुझ्यासारखा भडव्यांचाच...!!

अजूनही स्मशान वाट उघडीच  
अजूनही दलित वस्त्या गावाबाहेरच 
अजूनही तिथपर्यंत विकास गेला नाही 
नव्या रंगाने नव्या विचाराने नव्या चेहऱ्याने 
काहीच होत नाही म्हणून मातीला आकार  
 मनाच्या झरातूनच द्यावा लागेल  
तळहातावरच्या रेषा मोकळा नाही 
रेघाटा मात्र तिथेच 
सोन्याच्या कळसाला नमस्कार कर 
बाबासाहेबांच्या संविधानाला मनात ठेव 
डोक्यात ठेव जखमी वाघ 
हा कधी शिकार करू शकत नाही 

हातांच्या रेघाट्या आपल्या मालकीच्या
नदीच्या काठावर बसून 
स्वप्नांची माळ गुंफू नको
देवळात जाताना मनात 
प्रबोधन पेटवून जा 
देवळातल्या श्रद्धेला श्रद्धेने हात जोड 
विश्वासाने हात जोड 
पण मनात बाळगू नको 
तुझ्या स्वप्नातील ते सत्य सत्यात 
उतरवून देणार आहे 

दुःख गोठले आहे  सुख गोठले आहे 
प्रबोधन गोठले आहे प्रस्थापितव्यवस्था 
अजून कोमेजलेल्या पानावर 
पाण्याचा शिव्यांचा ग्रह जातींचा 
वर्षाव करीत आहे 
वर्षाव करीत आहे 
अर्ध रस्त्यावरून जाताना...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे


कवितेचे शीर्षक :- अर्ध्या रस्त्यावरून जाताना
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


   बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेविरुद्ध ही कविता आहे, पण तो बदल फक्त भ्रमिष्ट पद्धतीने समाजामध्ये पेरला जात आहे असे वाटते. त्याच भावसंवेदनेतून ही कविता ,"हिशोब".
       हिशोबाची वही कितीही जुनी झाली असली तरी हिशोब मांडावाच लागतो.... कारण आमचा इतिहास शूरवीरांचा आहे...! या शब्दात विद्रोह हिशोब कवितेमध्ये मांडला आहे.
       कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या सुधारल्या जातील.....!! 
धन्यवाद...❤❤💕💕💕

**** हिशोब ****

शतकानुशतके संघर्षाच्या वाटेवर चालताना
आता कुठेतरी गर्दीतला माणूस 
मोकळा होत होता 
बंद वहीच्या हिशोबात 
नवीन गणिताचे हिशोब मांडीत होता 

ऊर्जा स्त्रोत नवीन निर्माण करीत होता 
ठेच लागलेल्या सर्व जखमांना 
मलमपट्टी करीत होता 
पण वनवा पेटला जंगलात 
आता ठसठशीत रंगांचा 
फुललेला बागेला ओसाड 
करण्याची भाषा ऐकू येत आहे 

वनवा संपला असे वाटता वाटता 
अवघड हिशोबाची वही पुन्हा 
हिशोबाकडे जात आहे  
रंग रूपात आलेल्या नितांत 
कष्टाचा ज्वालामुखी आता
बरबाद होत आहे 
प्रस्थापित समाजव्यवस्था वनवासाचे 
नवे संविधान लिहत आहे 
प्रखर तेज असलेल्या 
माणसाच्या पंखांना आता 
परत आतल्या आत जाळणार आहे 
असा भ्रम तयार केला जात आहे 

पण समाजव्यवस्था बदलेल 
असे काही चिन्ह दिसत नाही 
आपल्यात भळभळती असलेली जखम 
काही रक्ताळ होणार नाही 
सळसळत्या पाण्यावर नागाचे मनी 
चालणार नाही 
धडधडणाऱ्या श्वासाला गर्दी 
अमानुषता मिळणार नाही 
फडफडणाऱ्या विचारांना 
तुफान्याचा सामना करावा लागेल 
किंचाळतील बो-बो बोंबलतील 
पण या प्रस्थापित समाज व्यवस्थेला 
ते कधी जमणार नाही 

जुन्याच संस्कृतीचा उगम आता 
परत येणार नाही कारण 
इतिहास साक्षीदार आहे 
आमच्या विजयाचा ....
आमच्या बंडखोरीचा ....
आमच्या विद्रोहाच्या रंगाचा.....  
इतिहासातील शूरवीरांचा मुरदा पडलेला आहे 

कोपऱ्यातल्या तलवारीला जंग लागला 
आहे असे वाटू देऊ नका  
तलवार अजूनही धगधगतीच आहे अडवून 
 जंगले पेटवून तुफान नसलेल्या 
तुफानाला निर्माण करून काही होत नाही 
कारण ही समाजव्यवस्था हरलेली आहे 
कारण आम्ही जगतो आहे 
नवीन संस्कृती संकटाशी लढण्यासाठी 
अजूनही रक्ता ताकद आहे 
मेंदूत शिक्षण आहे 
भांडवलशाहीचे गणित कुठे मांडावे 
हे आम्हाला माहित आहे 
तेजस्वी सूर्याला सौम्य करण्याची ताकद 
आमच्या रक्तात आहे   
इतिहास हिशोब मागतो  
आमचा इतिहास हा शूरवीरांचा 
आमचा इतिहास हा शूरवीरांचा आहे ...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- हिशोब
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================


             विषमतेच्या लढाईमध्ये एक नाजूक भावना जळून खाक झाली आहे. मनात गर्जना प्रेमाची पण जगण्याची लढाई इतकी कठीण आहे की तो त्या प्रेमाला स्वीकारू शकत नाही. कारण माझ्या अंगाला अजूनही कष्टाच्या घामाचा वास येतो आहे.
       तू जगली आहे या मुक्त स्वातंत्र्याच्या रानात. मी रुजलो आहे, एका वादळात...!! मी कितीही प्रेमाचे बीज लावले तरी तू तेथे राहू शकत नाही. ही सांगणारी ही कविता!!                           समानतेच्या लढाईमध्ये आम्ही लढत आहोत त्यामुळे तू लावलेले रोपटे हे चुकीचे आहे. अजूनही आपल्यावर वस्तीच्या लोकांची नजर आहे.'प्रेम',  नावाचा पवित्र शब्द त्यांच्यासाठी गढूळ आहे. या भाषेत एक तरुण युवक विद्रोह मांडत आहे.
         कारण जगण्याची लढाई अजून चालू आहे.  या लढाईत  प्रेमाला कुठेच स्थान नाही. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...! कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....!! धन्यवाद💕💕💕🌴❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

      ***** तुझ्या - माझ्या प्रेमाला ***

मी च ....!!!
माझ्या प्रेमाला समजून सांगतो 
माझ्या जगण्याची लढाई हा वारा सांगतो 
तू जवळ येऊ नकोस 
मी स्पर्श करू शकत नाही 
माझ्याच मनातील प्रेमाचा जगण्याच्या 
 खिडकीवर वळणा वळणावर 
ज्वलंत जाळ पेटला आहे 

इथल्या जळत्या वर्तमानात 
फुला फुलांचा बाजार फक्त 
फुले सजली जातात 
अंधाराच्या जगात भ्रमिष्ट बुद्धी 
याचा मनाच्या कोलाटावर दुरावते 

उमटलेल्या भावना वेदना सांगत नाही 
नको देऊ प्रेम भाषाशैली 
नको देऊ स्पर्श प्रेमळ शैलीचा 
नको देऊ मोगराचा सुगंध 
अत्तराच्या शरीराचा 

तुझ्या माझ्या प्रेमाला 
नजर हजारो नयनांची 
अनवाणी पायाला सोन्याच्या मुकुटाची 
गरज नाही
तुझ्या माझ्या प्रेमाला नजर 
माझ्या तुझ्या वस्तीची 
स्वच्छ आणि गढूळ वासनांची 

मी राहतो आहे अजूनही त्याच डोहात
जिथे...., जिथे विषमतेचे झाड 
अजून जिवंत आहे 
विषमतेचे झाड अजून जिवंत आहे...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- तुझ्या - माझ्या प्रेमाला
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला


       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

         
     कविता अशा मानसिक ते विरुद्ध विद्रोह करते आहे, जिथे त्याला सांगू पाहताय की तुम्ही सारखे आयुष्य जगू नको कारण एकटा काही करू शकत नाही.
       कारण आजही प्रस्थापित समाज व्यवस्था त्याच व्यवस्थेवर जगत आहे जी व्यवस्था संपवण्यासाठी समाजव्यवस्था बदलण्यासाठी हजारो वर्षापासून लढा दिला आहे. त्या समाज व्यवस्थेचा भाग हो पण हे विसरू नको की आजही ती समाज व्यवस्था त्याच नियमांवर चालली आहे.
       अस्मिता आपली कुठे असावी. जगण्याच्या लढाई प्रथम प्राधान्य कुणाला द्यावे.  वार कसेही होतात हे सत्य इतिहास आहे. 
        कविता याच मानसिक भावसंदर्भातून पार्श्वभूमीवरून घेतली आहे. कविता स्वलिखीत  आणि  स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.                  काही चुका आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या सुधारल्या जाईल आणि संशोधन केलं जाईल....!!❤❤❤❤😂🌴

****  मेंढरासारखे जगण्यापेक्षा ****

व्यवहारवादी जगात व्यवहार खूप आहे  
माणूस म्हणून कुठेतरी व्यवहारी हो
का चढत राहिला तू 
देवळाच्या पायऱ्या
फुल फळांनी सजलेल्या 
सुवासिक प्रसादाच्या वासाने 
अनवाणी नवसाला पाऊन घेतले 
नारळाच्या दोन टोकरात 
भिकाऱ्याच्या हातात देत ऐटीत 

तेव्हा तुला लाज वाटली नाही 
स्वतःच्या उणीवांची 
तेव्हा तुला लाज वाटली नाही 
झिजलेल्या समाजव्यवस्थेची 
तेव्हा लाज वाटली नाही 
निजलेल्या व्यवस्थेची 
तेव्हा लाज वाटली नाही  
पेटलेल्या वस्त्यांची 
तेव्हा लाज वाटली नाही  
वेशीवर टांगणाऱ्या स्त्री अब्रूची 
तेव्हा लाज वाटली नाही 
रुजविलेल्या अंधश्रद्धेची 
तेव्हा लाज वाटली नाही 
दिखाव्याच्या गाभाऱ्याची 

सावलीचा ही विटाळ होता
मर्यादेचे मडके होते 
पाण्याच्या दुष्काळ होता 
जळजळ वण - वण 
भिकाऱ्यापेक्षाही जीवन 
प्राण्यांपेक्षाही जगणे

आता झगडत आहे 
त्या समाजव्यवस्थेसाठी 
आता झगडत आहे 
त्याच व्यवस्थेच्या प्रतिष्ठेसाठी 
जिथे मंदिर सजली आहे 
जिथे दानपेटी सजली आहे 
सोन्याने 

तिथे श्रद्धेने जा 
तिथे अंधविश्वासाने जा 
कोणतीही लढाई लढून नको 
पण तू हे विसरू नको 
तुझी सावली आजही विटाळ आहे 
तू हे विसरू नको की 
प्रस्थापित समाजव्यवस्था 
दगडात कोरलेल्या विश्वासावरच
जगते आहे 
अजूनही दुरूनच नमस्कार आहे 
तरी तुझ्यासारख्या समाजद्रोही समाजविधातक
 झुंजार मनाला ते शिवत नाही 
पण गाफील राहू नको 
कारण वार कसे होईल  
कधी होईल सांगता येत नाही 

मनाच्या गाभाऱ्यात देव 
बाबासाहेब जिवंत ठेव 
झगडता येत नाही
मेंढरासारखे आयुष्याला  
उधारीच्या ज्ञानावर आत्मीयतेने
विझलेल्या वास्तविक 
जगात...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- मेंढरासारखे जगण्यापेक्षा
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


=============================

         एक स्त्री म्हणून आलेला वाईट अनुभव तिच्यासोबत आहे पण तिचा प्रियकर त्या अनुभवातून तिला शांत करण्यासाठी आपल्या पद्धतीने तिला समजावून सांगण्याच्या सर्वस्वी प्रयत्न करतो. 
       तो विद्रोही नाही तो शांत आहे त्यावेळी तिला तो कसा दिसला की एक विद्रोही स्त्री विद्रोही भाषा बोलणारी हमरी तुमरी वर जाणारी  एक प्रियसी या कवितेत सांगत आहे.                      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत आणि स्वरचित आहे.
        काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या सुधारल्या जातील. धन्यवाद.....!!💕

     *** अशांत वाटेवरची वाटाघाटी ***

मी शांत होते 
त्याच्या भाषेची लय बघून 
डाळिंबासारखे लाल झालेले डोळे 
रंग बदलत चाललेला चेहरा 

तरी मी शांत होते 
भाषेची अनोळखी पद्धती 
तोडमोड करत होता 
हाताने हातवारे करीत होता 
संपूर्ण चेहराच बदललेला 
पांढराशुभ्र आता पिवळाभर 
दिसत होता 

मी शांतच होते 
त्यांनी माझा हात हाताने घट्ट पकडत 
हात माझ्या चेहऱ्याकडे नेत 
भाडीत गेला तुझा स्वभावातला 
विद्रोह... स्त्री आहे ..!?
एवढाच का तो शब्द 

तरी ही शांत होते 
मनातला आक्रोश 
शब्दात येत राहिला 
चळवळीची दिशा सांगत राहिला 
शांततेचे महत्व पटवत राहिला 
अशांत होऊन....
प्रेमाने मिठीत घेत 
जाऊ दे ना 
त्याला माहीत नाही 
ही समाजव्यवस्था 
इथल्या पद्धती इथली संस्कृती 
त्याला फक्त माहित आहे 
स्त्री .....
जन्माने भोगवस्तू असलेली 

मी शांतच 
त्याचा हात घट्ट पकडून 
तो ( व्यक्ती)जाऊ नये म्हणून 
आणि तो मला मिठीत घेऊन 
मी अशांत होऊ नये म्हणून 
पण ती घट्ट मिठी शांत करू 
शकली नाही 
मनातील आक्रोशाचा 
विद्रोह स्त्री...
म्हणणाऱ्याच्या तोंडावर 
मात्र विद्रोहाचे निशाण होते 
शांत होऊन 
शांततेच्या वाटाघाटीत...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अशांत वाटेवरची वाटाघाटी 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------


        ' एक नजर विद्रोही', ही कविता प्रियकर प्रेयसीची आहे. प्रियसी ही थोडी विद्रोही स्वभावाकडे जाणारी आहे.  जहाल मतवादी विचारसरणीची ती प्रियसी आहे. ती आपल्या भाषेतून व्यक्त करते उलट  तो तितका शांत असणारा.
            तिचा प्रियकर तिला प्रत्येक वेळी समजून घेण्याच्या भूमिकेत असतो पण त्याच्या मनातला विद्रोह अजून संपलेला नाही. वेळ पडेल तेव्हा त्याची एकच नजर विद्रोहाला जाळून टाकणारी आहे.
          ही सांगणारी ही कविता, प्रेयसी आपल्या प्रियकराच्या स्वभावादर्शन येथे सांगते आहे. 
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडलास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चुका. आढळल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .....!
धन्यवाद....!!❤💕❤💕💕❤❤💕❤❤❤❤❤❤❤❤💕❤❤❤❤❤❤❤

**** एक नजर विद्रोही ****

माझ्या प्रेमाची गोष्ट माझी आहे 
त्याच्या प्रेमाची गोष्ट त्याची आहे 
मी ज्वालामुखी विद्रोही शब्दांची 
तो मात्र समजूतदारपणाचा कळस  
मी विद्रोहाच्या पेरणीची आग 
तो त्या आगीला पाणी देणारी वाट आहे 
तो असतो शांत पाणीदार डोळ्यांनी 
माझ्यातला विद्रोह निजविण्यासाठी 
तो उणिवा कमी करतो झुंजार शब्दांचा 
मी मात्र त्याला बायकीपणाच्या 
गाभाऱ्यात ठेवते तरी तो 
कंटाळत नाही भांडत नाही ओरडत नाही 
दोन वेगवेगळ्या विचारांचा वनवा 
मात्र प्रेमाच्या सुगंधित वाऱ्याबरोबर 
सोबतच असतो 
विद्रोहाने जळते मी 
विद्रोहाने न जळणारा तो 
वाट मात्र एकच आहे 
प्रेमाची 
विद्रोहाला जाळणारी 
तो तरी अनवाणी चालत नाही 
विद्रोहाच्या भाषेत 
कारण त्याची एक नजरच 
विद्रोही असते 
शांत गर्जनेची....!!!💕

     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
 
कवितेचे शीर्षक :- एक नजर विद्रोही
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला


           ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

     "चिखल", कविता परिस्थिती बदलल्यानंतर बदलणाऱ्या मानसिकतेवर आहे. दलित साहित्य/ विद्रोही साहित्य कविता ह्या अन्याय अत्याचार शोषित अस्पृश्य ......या प्रवाहात चालणाऱ्या आहे.
           पण आम्ही ते कुंपण तोडत आहोत पण तोडलेले कुंपण आमचेच असावी अशी अपेक्षा असते;तसे होत नाही त्याच भावविश्वातून ही कविता....!!
           परिवर्तनाच्या गणितावर संघर्षाच्या वाटा बंद होतात.  ही सांगणारी कवितात्...!!                 कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद......!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤   


 **** चिखल ****

शतकानुशतके उपेक्षित समाजाची 
आज गडबड चालू आहे 
कारण वस्तीत लाल दिव्याची गाडी आली आहे 
विषमतेच्या जंगलात वनवा होऊन जळलो
वाऱ्यालाही स्पर्श जाण्याची 
मुभा नसतानाही नाचत गाजत 
लाल दिव्याची गाडी आली 

पोरग ऐटीत पोरी झाला फॅशनेबल 
लढण्याची ताकद त्यांच्यात 
आली तेव्हाच कुठेतरी 
किंकाळी ऐकू आली 
तुफान साचलेल्या मनाला घेऊन  
लाल दिव्याच्या गाडी पण 
तेथे मिळाले झाड किडलेले 
धुक्यात नष्ट झालेले 

आता तो देशमुखाचा जवाई होता 
आता ती देशपांडेची सून होती 
ती आता रामटेके वानखेडे कांबळे
 ...... अशा कोणत्याही नावाचे 
जातीविषयक विशेषण नसलेली 
तिला किंकाळी ऐकू आली नाही
त्यालाही किंकाळी ऐकू आली नाही 

हात बांधले गेले आहे देशमुखांनी
हात बांधले गेले आहे देशपांडेनी 
आम्ही अजूनही उपेक्षितच 
वस्त्यांमध्येच अजूनही गलिच्छ 

नारळ प्रसादाच्या कोरलेल्या मनात 
आता निळा आवडीनुसार झाला आहे 
आम्ही आपलेच पाय ओढतो 
असे म्हणतात, पण त्याला कोणी सांगावे 
एक लाल दिव्याची गाडी 
अनेकांची महत्त्वकांक्षा असते जगण्याची 

ती झोपडी पूर्ण करतो आणि केल्यानंतर 
अपेक्षेचे डोंगर जमीन दोस्त होते 
संथ इथल्या व्यवस्थेची पायवाट 
आमच्याकडे येतच नाही अनादी अनंत
  काळापासून असे चालले आहे 
अस्पृश्यतेचा जन्म फक्त गावकुसाबाहेर  
आता विषमतेची - समानतेची लढाई नाही 

आता लढाई आहे विचारांची 
पांढऱ्या शुभ्र कपड्यांची 
चिंध्या झालेल्या कपड्यांची 
जीर्ण झालेल्या विचारांची 
आता लढाई आहे घरांची -बंगल्यांची 
आता लढाई आहे विश्वासाची

कितीही माणुसकीचे वारे उलट्या दिशेने 
वाहत असले तरी....
चार दिव्याच्या गाडीने विद्रोह संपला नाही
झोपडीत जुनीच मेणबत्ती चालूच आहे 
वस्तीत अजूनही लाल दिव्याच्या गाड्या 
येतच आहे समानतेचे बीज 
अजूनही पेरले जातच आहे 
चिखल कितीही दाखवला तरी 
समानतेचे रोपटे वटवृक्षात  
बहरलाच आहे... 
विद्रोहाचे शब्द तितके बदलले आहे 
विद्रोहाचे शब्द तितके त्या 
चिखलात बदलले आहे....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- चिखल
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================
 
              "मी शिकतो आहे", ही कविता अस्मिता जागविणारी कविता आहे. मोकळी संवेदना आणि मोकळा भावना सांगणारी आहे. इथे कुठेही विद्रोह सांगत नाही तर विद्रोहावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
         तेवढा संयम इथे ठेवावा लागत आहे. दलित साहित्य /विद्रोही साहित्याचा प्रवाह हा फक्त विद्रोहासाठी नाही तर इथल्या समाज व्यवस्थेने जे कुंपण परिस्थितीनुसार घातलेल्या आहे त्या कुंपणात राहून त्याला तोडून तो आपला भविष्य घडवणार आहे ही सांगणारे कविता...!!
      मी शिकतो आहे तरी या ढोंगी स्वार्थी प्रवृत्तीच्या समाजव्यवस्थेविरुद्ध आत्मसन्मानाने भविष्याचे गणित आणि त्यासाठी बळ ही शाळा देत आहे. 
        शांत संयमी समजूतदार जाणीव आक्रोश शांत विद्रोह या कवितेत दिसतो. 
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन करून योग्य तो न्याय दिला जाईल...!!

*** मी शिकतो आहे***


सर्व काही पुसले गेले असले तरी  
सुंदर खडूंच्या अक्षरांची आता 
शाळा पडकी झाली आहे 
माझ्या स्वप्नांची प्रत्येक वाट तिथूनच निघणारी
 आता शाळा हरवली आहे 

भली मोठी इमारत आता तुंबली आहे 
काय सांगू, माझ्या शाळेची कहाणी 
माझ्या शाळेची छत हरवली आहे 
सूर्य तळपतो त्या छतातून वारे वाहतात ओरडून 
 ओरडून तरी मी जाते शाळेत 
कारण ती शाळा समानता पेरते  

आयुष्याच्या चढउताराची माहिती देते 
सांगते समानतेचे गणित पाखरांच्या थव्यांना बंधन नसते शाळेत 
छाटलेल्या पंखांना तुमचे अधिकार 
थरथरणाऱ्या ओठांना आत्मसन्मान देते  
मोडकी छत सांगते महागाईच्या सरणावर
चालत असलेला भारत बाजी मारलेल्या सर्व 
त्या लाटांना गिळंकूत करीत आहे 

जहाल प्रस्थापित समाजव्यवस्था  
मला जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा मोकळ्या करून गेलेल्या 
ती पेटून उठविते प्रबोधनासाठी चालण्यासाठी
विकल्या गेलेल्या त्या प्रत्येक बाप माणसासाठी तिथे लढा हा बंदिस्त झाला आहे 
तिथे लढा हा थकलेला आहे 
ग्रहांची दिशा वारांची हिंमत 

सावलीचा विटाळ खेळ याच खेळासाठी
बाबासाहेब वर्गाबाहेर शिकला 
आणि मी ....??छत नसलेल्या मोडक्या 
शाळेत तरी पण मी शिकतो आहे...!!
उगवत्या सूर्या सोबत मला पेटविते 
रोज स्वप्नांची चिंद्या होताना भक्तांची 

पेटून उठण्यासाठी आत्मसन्मान देते 
वास्तविक विचारावर चालण्याचे बळ देते 
या अती हुशार समाजव्यवस्थेविरुद्ध
लढण्यासाठी हातात बळ देते 
क्रांतीचे रोपटे लावून तुटलेल्या मनाला 
पालवी देते ती मोडकी तोडकी असली तरी 

ती माझी असते, व्यवस्थेविरुद्ध प्रस्थापित
समाजाविरुद्ध शिक्षणाचे भ्रष्टाचारीकरण 
करणाऱ्या विरुद्ध मी एकही शब्द काढत नाही
कारण मला माहित आहे 
ती छत फक्त गरिबांच्या वाटेला आली आहे 
फाटक्या तुटक्या गणवेशातला हा विद्यार्थी 
बाजी मारणार आहे भविष्यात  
तो वर्तमान जगतोया विषमतेत 
तो सांगणार आहे या समाजाला 
या समाजव्यवस्थेच्या त्या प्रत्येक काळोखाला
कोमेजलेल्या वाऱ्याला आणि दगडाची मूर्ती
.......ठेवलेल्या त्या सोनेरी व्यवस्थेला 

मी हरणार नाही मावळणार नाही 
शब्द विद्रोहाचे पेरणार नाही 
भेटते रोजच पावसात भिजलेली शाळा 
थंडीत कुडकुडणारी शाळा 
उन्हात माझ्या स्वप्नांना अंकुर देणारी शाळा
मोडक्या - तोडक्या छताची माझी शाळा 
माझा अभिमान आहे
अजूनही अस्पृश्यतेच्या त्या प्रस्थापित 
व्यवस्थेविरुद्ध लढत आहे 
जिथे मला सुविधा नाही 
मी वंचित आहे अजूनही 
पेटता निवडुंगावर 
गोठलेल्या दुःखासोबत 
समानतेच्या वाऱ्याचा पाऊस 
त्या छतातून टपकत आहे 
कारण मी शिकतो आहे 
वर्गात बसून...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- मी शिकतो आहे
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. "संपला आहे विद्रोह माझ्यातला",या शब्दात अक्षरबद्ध केलेला आहे. उपेक्षांचे जाणीव कवीला आहे. तिच्या मर्यादा आहे. ती समाजाचे बंधने झुगारून शकत आहे कारण आज समानतेचा विचार हा विचार राहिला नाही तर ते तो एक गुन्हा झाला आहे. पण ती महत्त्वकांक्षी आहे. तिला क्रांतीचे चक्र फिरवायचे आहे.
       ही समाजव्यवस्था सुद्धा झुगारायची नाही आणि नवीन काही अस्तित्वही निर्माण करायचे आहे.  ते कुठेतरी सुरक्षित सुद्धा ठेवायचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी म्हणून ती सांगते आहे, उत्कटतेने ...!
        तिची वैचारिक परंपरा थोडीफार समज हाच तिचा विद्रोह आहे. या संघर्षाच्या विद्रोहाच्या संवेदनेमधून भाव विश्वातून ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.💕💕
 धन्यवाद...!!💕💕

**** संपला आहे विद्रोह माझ्यातला ****

मुक्त मोकळ्या जगण्याच्या वाटेवर 
अस्तित्वाची राख झाली 
अमानुष वस्ती किड्या मुंग्यांची रास झाली
उगवतो सूर्य रोजच दबलेल्या आवाजाने मावळतो सूर्य रोजच भयान शांततेने 

अंधाराच्या आडोशाला अडगडीत पडलेला
रूढीचा नवीन शृंगार चढलेली 
उबदार सावली तेव्हा वाटते 
संपला आहे विद्रोह माझ्यातला 
माझ्या श्वासांचा 
मी पेरलेल्या निखाऱ्यांचा 
समजूतदारपणा आता 

निखाऱ्याच्या पेरणीवर आहे 
अन्याय अत्याचार फुललेल्या बाहुबलीवर
निखाराहून पेटवायची आहे 
ती सकाळ ती दुपार ती संध्याकाळ 
उगवत्या सर्व विषमतेच्या लढाईवर 
पेटवायचे आहे निखारे 
पण पण संपला आहे विद्रोह माझ्यातला 
हळूच .....

क्रांतीचे पावले काळोखात उभे  
बंडखोरीच्या विचारांवर 
आक्रमक प्रहार करायचे आहे 
निखार्‍याला अंतिम श्वास नसतो 
दबलेला आवाज आता 
बोलते हिरवळ 
अंधारात भेटत नाही 
आसवांन मध्ये भेटत नाही 
त्यासाठी जागी करावी लागेल तीव्र 
भाषा समानतेची प्रचंड राग द्वेष मत्सर 
आक्रोश जागी करावी लागणार आहे 
नवीन अस्मिता 
संपला आहे विद्रोह माझ्यातला
माझ्यातला भ्याडपणामुळे 

तरी मी लिहून ठेवणार आहे 
ते शब्द त्या पिढीसाठी 
त्यांनी स्वतःला कुंपण घालू नये 
मा......माझ्यासारखे हिरवळीचे 
संपला असला विद्रोह तरी
माझ्यातला....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- संपला आहे विद्रोह माझ्यातला  
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

           कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आजूबाजूच्या परिस्थितीत नवीन सांस्कृतिक ओळख होत असली तरी अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद माझ्यात नाही.
           माझे शब्द वाट चुकतात विद्रोहाकडे पण ते शब्द कागदावर उमटत नाही. कारण सामाजिक व्यवहाररचनेविरुद्ध जाताना ती ताकत... ती शक्ती.... माझ्यात नाही ..!!
       माझ्या दुबळ्या मनात नाही. म्हणून मी विद्रोह लिहू शकत नाही.
        याच पार्श्वभूमीवर याच भावविश्वावर ही कविता. ते मी का लिहू शकत नाही हे सांगण्याचा हा प्रयत्न.
      कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
        विद्रोह हा मुक्तिसंग्राम आहे. तरीही त्या मुक्तिसंग्रामावर चालताना माझ्या एकटीमध्ये ताकत नाही. कारण माझा समाज  विखुरलेला आहे म्हणून मी विद्रोही शब्द लिहू शकत नाही.              ही सांगणारी ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद....!!💕💕💕❤😂

**** लिहू शकत नाही विद्रोह ****

कधी कधी करते शब्दांशी 
विद्रोह अहंकाराच्या पायवाटेसोबत 

नजर नसेल माझी अनुभवी रंगीन
पण शब्द करू पाहतात विद्रोह 

कळते आता तो विद्रोह माझाच 
माझ्याशी शब्दात खूप लिहायचे असतेच 

पण विद्रोह पेलविता येणार नाही म्हणून
अनोळखी शब्दाबरोबर लिहिते लपूनच 

माझा विद्रोह, भेटलाच मध्ये कुठेतरी 
थांबविते आग्रही भूमिका मनाची तरी 

करू शकत नाही विद्रोही शब्दांचा प्रहार 
अजूनही जागा आहे मनात .... विध्वंस

मिझोराम चा नरसंहार युद्धाची ललकारी 
नग्नतेच्या विरोधात हतबल समाजव्यवस्था

अजूनही स्त्री जन्माचे महाभारत
म्हणून विद्रोह लिहित नाही माझ्यातला वेदना 


हंबरडा फुटलेला सुकलेल्या ओठांच्या ज्वाला 
मधून अनोळख्या शब्दाबरोबर भारावून जाताना

कधी कधी करते शब्दांशी 
विद्रोह अहंकाराच्या पायवाटेसोबत.......!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

कवितेचे शीर्षक : - लिहू शकत नाही विद्रोह
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

          बदलत्या समाज व्यवस्थेची बदलती परिस्थिती स्थलांतरित गरीब समाज व्यवस्थेवर ही कविता आहे. गरीबी ही शाप आहे. तिला मुळापासून कोणीही उध्वस्त करू शकत नाही.       उद्ध्वस्त करण्याची पूर्वतयारी हे शिक्षण करते. याच पार्श्वभूमीवर भावविश्वातून ही कविता. विद्रोह हा भुकेसाठी आहे. ओढ ही शिक्षणाची आहे  विद्रोह शिक्षणाचा आहे. बदल घडविण्यासाठी...!!
       भला पहाटे विद्रोहाची ठिणगी आसमंतांमध्ये पेटविली जाते. हा विद्रोह अस्तित्वाचा आहे.
        कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण कविता ही अस्तित्वाच्या विद्रोहासाठी आहे.
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.


****** अस्तित्वाचा विद्रोह*****

वस्ती पासून जाताना विचारांची गर्दी 
पायाला क्षणभराची विश्रांती देते 
झोपडीतील त्या आवाजाने 
उलट तपासणी करते 
बिछान्यात पडून राहावे वाटते 
त्यावेळी कुणीतरी वाचत असते 
पुस्तकातील A, B, C, D..... 

समोरची व्यक्ती कोण...?? पण उत्तर 
मात्र बोलके असते 
वाचाल तर वाचाल या नेमक्या 
अर्थाने घेतलेली 
दारिद्र्याची 
ती कहाणी संपविण्यासाठी 
प्रस्थापित समाजाला 
दिलेले ते उत्तर असते 

स्वप्नातला भारताचा तो अधिकार असतो 
भुकेल्या वनव्यात जळत निखाराही 
ठेवत नाही 
अन्नाच्या आतड्यांना आता 
शिक्षणाची ओढ असते 
समाजव्यवस्थेच्या चिंध्या करण्यासाठी 
कडेकोट बंदोबस्त असतो 

जातवाल्यांना आग लावण्यासाठी 
मुजरा करणाऱ्या झुकता त्या मानेसाठी
जंग लागलेल्या त्या हरामखोर विचारांसाठी
शरम हरवलेल्या माणुसकीसाठी 
भुकेला भुकेच्या आगीत न जळता 
जळत राहतो 
अस्तित्वाच्या विद्रोहासाठी 
जळत राहतो 
अस्तित्वाच्या विद्रोहासाठी

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अस्तित्वाचा विद्रोह 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------------------------------------------

           कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. उपेक्षित जीवन जगणाऱ्या समाजाला ज्यावेळी मुख्य प्रवाहात आणले गेले त्यावेळी त्या प्रवाहाचा एक सत्य असेही समोर आले.
         श्रीमंत समृद्ध असलेली स्त्री वैचारिक दृष्ट्या किती मागास आहे सांगणारी ही कविता. आम्ही मुक्तीसाठी मुख्य प्रवाहात राहण्यासाठी आत्मसन्मानासाठी हे चक्र तोडण्याचे प्रयत्न करीत आहोत आणि जो मुख्य प्रवाह आहे तिथल्या स्त्रियांच्या व्यथा वेदना ह्या त्या स्वतः सुद्धा मांडू शकत नाही तिथे एक घुसमट आहे ही सांगणारी ही कविता ...!!
       त्या भावविश्वातून सांगणारी कविता विद्रोह शब्दात आहे. पण वेगळ्या पद्धतीचा विद्रोह तिथे दिसतो. संघर्ष नसलेल्या समाजाला अक्षरशा अंतरिक्ष करावा लागतो आहे. ही सांगणारी ही कविता.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!! धन्यवाद...!!😂💕😂💕

     **** वसाहत ****
 
उच्चभ्रू समाजाचा एक भाग झाल्यानंतर 
गलिच्छ वस्तीचे दुःख कळत गेले 
डोळे मिटवित रक्ताळलेल्या मनाने 
शोधत राहिले त्या उच्चभ्रू समाजात 
माणुसकीचे वारे 
पण ते सापडलेच नाही तिथे 

सापडले चिखल्याने माखलेले 
अध्यात्माचे रंग 
चढविलेले चेहरे एकमेकावर 
हसत एकमेकांच्या पायात - पाय टाकीत 
रक्ताळलेल्या भावनेला 
कधी शब्दबद्ध केले नाही 

आभाळाला कधी कवेत घेतले नाही 
पंख छाटलेल्या पंखांना 
कधी पंख दिले नाही 
शब्दांना सबुरी दिली तरी 
डोळे मिटावे तसे भावनांचा खेळ होत राहिला
स्त्री असल्याचे दुःख वाटेला येत राहिले 
कधी नयनाने कधी शारीरिक हावभावने 

सोन्याच्या पिंजऱ्यात कैद असलेली 
रूढी परंपरा जपलेली 
अनैतिकतेच्या वळणावर जाणारी स्त्री 
तिला संघर्ष माहित नाही 
तिला विद्रोह माहित नाही 
तिला परंपरेच्या चिखलाआड 
गुलामगिरीची जाणीव नाही 
असा उच्चभ्रू स्त्री  समाज व्यवस्थेला 
माहित करून द्यावा वाटतो 

बाबासाहेबांचा विद्रोह, विद्रोहाचा आवेग
विद्रोहाचा बुलंद आवाज 
दबलेल्या आवाजाला शब्द द्यावेसे वाटते 
रूढीच्या अन्याय  अत्याचाराचे 
त्यांच्यात पेरावा वाटतो 
विद्रोह विस्फोटक शब्दांचा 
या गुलामगिरी परंपरेची वाट
लावावी वाटते क्रांती करून
सुगंधित मुक्तीच्या फुलासाठी
अंतर्बाह्य रिकाम्या झालेल्या 
मनाला...!!💕😂

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- वसाहत 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

          कवितेत विद्रोह हा मूक स्वरूपात आहे. अस्तित्व विषयक प्रश्न निर्माण झाल्यानंतर जगण्याचे एक जाणीव नवीन वाटेला आशावाद निर्माण करणारी कविता. अस्पृश्यतेचे चटके, जुगारणाऱ्या एका वडिलांची एका बापाची गोष्ट...!!
    ( माझे बाबा एम एस सी बी मध्ये होते. ते काम त्याकाळी इतके जीवघेणे होते ही कल्पनाही करू शकत नाही. अशा कामाला माझ्या बाबांनी जीव लावला फक्त अस्पृश्यतेचे चट्टे सहन न करण्यासाठी...!!💕)
         हा बाप दलित समाजामध्ये पावलोपावली दिसून येतो. कारण वेदनेचे वर्तुळ अजूनही पूर्ण झाले नाही. दुःखाचे काटेरी कुंपण अजूनही दूर झाले नाही आणि हे कुंपण तोडण्यासाठी आपल्याला शहराकडले वाट धरावी लागते.
        कालबाह्य व्यवहार अजूनही अस्तित्वाच्या व्यवहारांमध्ये एकमेकांशी हात घट्ट धरून आहे.ते हात तोडण्यासाठी हे दुष्टचक्र तोडण्यासाठी एका बापाला त्या गलिच्छ वस्तीचा सामना करावा लागतो पण तिथे व्यक्तीचे शोषण नाही.
       शारीरिक शोषण नाही. भावनिक शोषण नाही तिथे आहे फक्त मानवता. मानव मुक्तीच्या चळवळीसाठी शहराकडे वळलेली ही पिढी आम्ही इकडे का वळलो हे शब्दबद्ध करण्याचा माझा छोटासा प्रयत्न....!!
        कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुख असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .....!!
             धन्यवाद💕💕💕😂!!

 *****  अस्पृश्यतेचे चटके *****

माझ्या बापाला माहित होते 
अस्पृश्यतेचे चटके
म्हणून चढत राहिला खंबे 
वेदना शमविण्यासाठी पित राहिला दारू 
पण गावाकडली वाट धरली नाही त्याने 
पंख छाटले जाईल या भीतीने 
शिव्याशापाचे ग्रहण नसलेला समाजव्यवस्थेपुढे 

हतबल होईल माझ्या मुली म्हणून 
कष्ट करीत राहिला गलिच्छ वस्तीत 
त्याने सहन केले होते अस्पृश्यतेचे चटके 
यशाच्या शिखरावर असतानाही 
तुक्याचा कधी तुकाराम झाला नाही 
या हरामखोर परंपरेने 

पावलोपावली जळणाऱ्या या विध्वंसक प्रवृत्तीने 
म्हणून बाप गेला नाही गावात 
तिथल्या सुख-समृद्धी वर नांगर फिरविले 
तो राहिला गलिच्छ वस्तीत 
पण तुकाराम होऊन 
तुकारामाचा कधी भाऊ झाला 
कधी साहेब झाला कळलेच नाही 

संघर्षाच्या प्रत्येक विद्रोहाला आयुष्याची
माणुसकीचे गणित लावत गेला 
कारण त्याने पाहिले होते स्वतःच्या बापाला
नारायण हरिजन होता 
हरिजनाचा महार झाला 
महारचा बौद्ध झाला तरी 
पाठीमागचा नाऱ्या सुटला नाही 
ती शिवीगाळ सुटली नाही 

तो विद्रोह संपला कायद्याने तरी 
तो कधी नारायण झाला नाही 
नाऱ्याचा बाप कशाच राहिला 
तो कधीच बौद्ध झाला नाही 
त्याने दीक्षा घेतली असली तरी 
कशाचा काशिनाथ झाला नाही 
गावात काशिनाथ चा बाप 
कधी अनंता झाला नाही 
तो अंतू  माहऱ्याच राहिला 

परंपरेची ही माळ कुठेतरी तुटायला हवी 
म्हणून बापाने पेरले शब्दात विद्रोह 
आपल्या भाषाशैलीत 
शिक्षणाची वाजवली तुतारी 
स्वातंत्र्याचे मुक्त रान मोकळे करत 
स्वतःच्या पिल्ल्यांना मुक्त भरारी घेण्यासाठी
पण त्यांनी शिकविले त्यांनाही विद्रोहाची भाषा 
क्रांतीची भाषा संघर्षाची भाषा 
समजूतदारपणाची भाषा 
आपुलकीची भाषा मावळलेल्या सूर्याची भाषा उभी केली एक परंपरा 

बाबासाहेबांची गौतम बुद्धांची शाहू फुले यांची
सावित्री माहित करून दिली भिंतीच्या फोटो आणि विद्रोह पेरला संस्कारात 
आता तो विद्रोह शांत होत नाही 
ही पावले गावाकडे जात नाही 
गावाकडली संस्कृती आता आम्हाला माहीत नाही पण .....!!
माणुसकीची भाषा मात्र माहीत आहे 

अजूनही, कारण माझ्या बापाने पाहिले आणि 
सहन केले होते अस्पृश्याचे चटके 
तीन पिढ्यांचे दुःख म्हणून बाप गावाकडे गेला 
नाही त्या सुख समृद्धीकडे गेला नाही 
फक्त शिक्षणाच्या क्रांतीसाठी 
स्वतःच्या स्वाभिमानासाठी 
स्वतःच्या अभिमानासाठी 
स्वतःच्या स्वप्नासाठी
समाजाच्या अस्मितेसाठी 
बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी...!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अस्पृश्यतेचे चटके
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. कविता ही अशा आशय संदर्भातील आहे. आपली प्रगती झाली ज्यांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि इथे एकत्रित असलेला समाज वेगवेगळ्या होत गेला.
      एकीचे साम्राज्य आता एका व्यक्ती पुरते मर्यादित राहिले आहे. अहंकाराच्या पायवाटेवर जखमा कधी दिसलाच नाही. म्हणून भाकरीची टोपली आता रिकामी झाली आहे...!
 या आशाय संदर्भातील ही कविता.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास नक्की कळवा,सूचनेचे पालन केले जाईल. धन्यवाद...!!💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕❤

 **** टोपलीतील भाकरी ****

भाकरीच्या टोपलीतील भाकरी 
रिकामी झाली आहे 
असे वाटून जाते 
घासातून घास देऊन 
जागेपणी मुक्तपणे वावरताना 
भाकरीची टोपली मात्र रिकामी 

कळकळ मनात 
सर्कशीच्या रिंगणात 
गगन भरारी आसमंतात 
भाकरी रिकामी करणारेही 
आपण भाकरी देणारे ही 
तर प्रस्थापित समाज गुन्हेगार का?
करायचे...!!

टोपली आपली भाकरी आपली 
तळतळ आपली 
लढाई आपली 
सन्मान आपला 
अभिमान आपला 
माणुसकी आपली 
योद्धा आपला 
जखमांची डरकाळी आपली 
तर दोष बदलत्या समाज व्यवस्थेला का..?

टोपली आपली तरी रिकाम्या हाताला 
रिकाम्या विचारांना 
माणसे बदलण्याची ललकारी का 
अहोभाग्य आमचे 
भाकरीची टोपी भरली होती 
पण सांभाळलेली आता वर्तनाने 
खाली होत आहे 
खच्चीकरणाच्या व्यवस्थेमध्ये जहर तितके आपलेच आहे 

विद्रोह करायचा कसा 
या प्रश्नासोबत 
भिजलेल्या विचार मनोधैर्य सोबत 
भाकरीच्या टोपली मधली 
भाकरी रिकामी झाली आहे 
रिकामी झाली आहे

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- टोपलीतली भाकरी
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

        कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. विद्रोहा या व्यवस्थेविरुद्ध असला तरी मला अभिमान आहे अस्पृश्य असल्याचा कारण या अस्पृश्यता निर्मूलनासाठी बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध केले.
       तो बंड अखेरच्या श्वासापर्यंत चालले पण बाबासाहेबांनी कधीही तोडण्याची भाषा केली नाही. त्यांनी नेहमी जोडण्याची भाषा केली. त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये माणसाला माणूस म्हणून अभिमानाने जगता यावे यासाठी कार्य केले.
        विद्रोह कधीच मरत नाही तो जिवंत असतो कुठेतरी मनाच्या आत आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही विद्रोही असल्याचा.
        याच पार्श्वभूमीवर ही कविता आम्ही विद्रोही का आहो हे सांगणारी ही कविता.....!!!          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद......!!!!!💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

     *** अभिमान *****

अभिमान आहे विद्रोही असण्याचा 
या भंगार संस्कृतीचा भाग होण्यापेक्षा
अस्पृश्याचे दान श्रेष्ठ आहे 
परमार्थ माहित नाही 
माणूसपण माहित आहे 
जोडणारी बंधने माहित आहे 
तोडणारी भाषा  नाही 

तात्पुरती सांभाळणारी तुझी अवस्था 
आता फसवी झाली आहे 
हरिजनाचा आता बौद्ध झाला आहे 
सारखे मूक होण्यापेक्षा मूकनायक होणे 
हे जगणे आहे
झिंझ(कुजलेले ) झालेल्या जन्माला 
आता पूर्णत्वाचे दान आहे 

गळ्यातले मडके पाण्याने भरले 
तरी शस्त्र अजूनही 
पेन - लेखणीच आहे 
सावल्यांचा प्रकाश आता 
सूर्यप्रकाशात आला 
भटकंती आता स्वस्पर्शाची आहे 

लाचार होत नाही 
चमचमणाऱ्या या समाजव्यवस्थेपुढे 
अभिमान आहे 
माझ्या विद्रोहावर 
उजळलेल्या सोनेरी पहाटेवर 
ताट मानेवर...!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अभिमान
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================
=============================

         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. विद्रोह अंतरंगात आहे. प्रहार हा शब्दात आहे. मन उद्रेकांच्या पराकोटीला गेला आहे कारण इथे शांत संयमी राहून अन्याय सहन करावा लागतो.        अन्यायाची  भाषा सहन करावी लागते. म्हणून मनाचे खच्चीकरण न करता उठावाची आता चळवळ करायची आहे. मोकळा श्वास घ्यायचा आहे.
      या पार्श्वभूमीवर ही कविता....!! आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सूचनेचे पालन केल्या जाईल किंवा सूचनेवर विचार केल्या जाईल.
       कविता ही मनातून आलेली असते. आलेल्या अनुभवातून आलेली असते. त्या अनुभवाला शब्दात थोडेफार मांडण्याचे काम मी करीत आहे. चुका आढळल्यास नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद...💕😂🌴

*** चळवळ होत आहे ***

जन्माने जात सोबत आली 
आणि अजूनही सोबत आहे 
बंडखोरी मागे ठेवून जगत राहिले 
माणूस म्हणून 
पण .....??????
ते माणूस पण गुडघ्यावर 
बाशिंग बांधत बसले 

कुठल्यातरी भीती आड 
असे वाहत बसले 
मनात उसळलेल्या आगीवर 
पाणी मारत बसले 
पोटातली आतडी पिळेपर्यंत 
शांत विचारांना 
जागा दिली 

तरी जळत राहिलो 
आत खाक होईपर्यंत 
मनातल्या दगडाला 
आशावादेचे सिंदूर फासत राहिलो 
तरी...!! तरी फारसे काही 
फरक पडले नाही 

शपथेवर सांगते मी, 
मनाचा शवागार झाला होता 
आणि तिथेच आंबेडकर मिळाले 
पुस्तकात 
विचारांना विद्रोहाची 
आग पेरण्यासाठी मनात 
व्यवस्थेच्या काळात बांधलेले दोरे 
आता खिळखिळे होत आहे 
भडव्यांच्या बाजारात 
थडग्यांचा हिशोब होत आहे 

सगळं हिसकावल्यावर सुद्धा 
आयुष्याची जन्माने जात होत आहे 
शांतपणे उठावाची 
......चळवळ होत आहे !!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

कवितेचे शीर्षक :- चळवळ होत आहे
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. "चला रे,"..... ही कविता स्वतः स्वतःच्या समाजातल्या त्या ढोंगी लोकांविरुद्ध भाष्य करते ती फक्त चिडवण्याची आणि पेटून उठण्याची भाषा करते.
           त्यासाठी ज्यावेळी पावले उचलायची वेळ येते तेव्हा ती मानसिकता बंध बेधडकपणे आपले वक्तव्य सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून मांडत असतात अशा या लोकांना आपल्या सोबत नेण्याचा इशारा प्रत्यक्षपणे लढाई लढताना  व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे.
         कारण हा समाज अत्याधुनिक साधन समृद्धीने परिपूर्ण आहे म्हणून या लोकांना या चळवळीचा प्रत्यक्षपणे व्हावे यासाठी ही विनवणी आहे.
        कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास काही मत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

**** चला रे ***

चला रे दारोदारी अजूनही 
संदेश समानतेचे वाहायचे आहे 
दार बंद झालेल्या मेंदूला 
जागे करायचे आहे 

दृष्ट प्रहारावर एकच उपाय आहे 
घरातील दारातून हाकलून लावले 
तरी प्रत्येक दार वाजवायचे आहे 
प्रत्येक दार वाजवायचे आहे 
चला रे दारोदारी अजूनही.... 

एकटे वादळ ( बाबासाहेब) पेलवले नाही 
धर्म संस्कृती विकलेल्या 
मनुस्मृतीला 
आता तर आपण सर्व आहोत 

वादळाला सुरुवात होण्याआधीच 
प्रहार करू या 
पळता विचारांना 
रूढीवादी समाजव्यवस्थेचा
विघातक प्रवृत्तीला 

शिवीगाळ फक्त उध्वस्त करण्यासाठी 
त्या वादळाला ....!!❤

  ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

कवितेचे शीर्षक :- चला रे
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला
 
       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. कविता विद्रोहाला समर्पित त्या भाव विश्वातील आहे तिथे अजूनही आशावाद आहे.
        विचाराने संघर्षाला उत्तर ती स्वतः व्यक्ती देत आहे. ती सांगते आहे, "मी किड्या मुंग्यांच्या विश्वातली नाही, मी जन्माने विद्रोही.... आहे".          त्या मानसिक संवेदनेमधून या कवितेचा जन्म झाला. 
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सूचनांचे विचार केल्या जाईल...!! धन्यवाद....❤😂

  **** आशावाद ***

विद्रोहाच्या रणभूमीवर 
खुळे वेडे व्हायचे आहे 
चकवा नसलेल्या मनातील 
विचार स्वातंत्रपणे ठाम 
लिहायचे आहे 

मी शाश्वत आहे की अशाश्वत 
माहित नाही पण अस्तित्वाच्या 
लढाईत मात्र मी खंबीर आहे 

मी बंधक नाही 
मी स्वातंत्र आहे 
मी किनारा नाही 
मी प्रलय आहे 
चार खांद्यावरील ठिणगीची 
ही आग नाही 
आशा जागविणारी ही तलवार आहे 

विद्रोहाच्या सुंदर सौंदर्याची ही 
बोलती तलवार आहे 
किड्या मुंग्यांचे हे गणित नाही 
बर .....एवढेच 
श्रेष्ठत्व विद्रोहाच्या लेखणीत 
असावे ...!
तात्पुरते नाही 

समर्पित आहे मी विद्रोहाला 
जन्मानेच ....
विद्रोहाचा रणभूमीवर 
विजयाची मशाल होऊन 
एक विद्रोही म्हणून 
आशावाद अजूनही कायम आहे 
मृत होत चाललेल्या प्रस्थापित 
समाजाकडून 
एक विद्रोही म्हणून 
सुंदर स्वप्नाच्या एका अनोळखी 
वाटेवर ...!!❤🌴

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- आशावाद
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================
=============================
  
          कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. वास्तवाचे भान ठेवून कवितेत आलेले शब्द हे त्या विद्रोहाला समर्पित आहे, जो विद्रोह विशिष्ट समाज व्यवस्थेने कुठलाही दोष,कुठलीही चुकी नसताना सहन केलेला आहे.
       म्हणून परिवर्तन आता बदलत चाललेले आहे. ते परिवर्तन कोणत्या भावविश्वात बदलले आहे सांगणारी ही कविता...!!
      कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!❤

**** परिवर्तन ****

जाता जाता आता जात परत आली 
परिवर्तनाच्या लाटेवर आता गोंधळ फार 
आर्तता मनात भीती तनात 
गाव कूशाबाहेरील समाज परत 
स्मशानात ....????

चेहरा हसरा ठेवावा की 
विमान प्रवासाच्या गोष्टी सांगाव्या 
जीवापाड जपलेली समानता 
आता निरागस हास्य बरोबर 
पेटवित आहे 
अगणित स्वप्नांची वाट 

परिवर्तनाची लाट आता 
गावात शहरात नसून मंजूळ स्वप्नात 
पिढीपिढी जपलेल्या समाज व्यवस्थेला 
आणू पहाणारा शिक्षित समाज 
डोळ्यांच्या ढगाआळ बेरंग 
पसरवीत आहे 

परिवर्तन साहेबांचे 
परिवर्तन विचारांचे 
परिवर्तन समानतेचे 
परिवर्तन मनातील गढूळतेचे 
परिवर्तन निळाआभाळातील 
माणूसपणाचे ...;
परिवर्तन विद्रोही शब्दांचे....!!❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- परिवर्तन
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤

--------------------------------------------------------------------------

        कविता विशिष्ट एका उद्देश पूर्तीने लिहिले गेलेली आहे. कविता आस्तिक किंवा नास्तिक या दोन्ही गोष्टींमध्ये आपले मत मांडत नाही तर निसर्गाच्या रूपाला त्याच्या अस्तित्वाला मान्य करा.
        त्याला वाचवा हा सांगण्याचा हा प्रयत्न. डोळ्यांनी जे जे दिसेल ते सर्व काही मानवी प्रयत्नाने निर्माण झाले म्हणून आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना ज्या अहंकारातून निर्माण होते त्या अहंकाराच्या भाव विश्वातली आणि संवेदनेतून एक छोटा विद्रोहरुपी थेंब या कवितेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद....!!❤


**** अमान्य करू नये ****

देव देवळात दिसला म्हणून 
निसर्गाचे अस्तित्व अमान्य करू नये 
कारण या वाऱ्यात अजून शक्ती आहे 
हजारो वर्षापासून जमिनीत असलेल्या 
वटवृक्षाला जमीन दोस्त करण्याचे 

भूकंपरुपी ज्वालामुखी जाळून 
टाकू शकतो तुम्ही निर्माण केलेल्या 
त्या सर्व वस्तू जिथे मानवता नष्ट करते 
मायेचे घरटे नष्ट करते 

अजूनही जन्म - मृत्यूचा 
फेरा चालूच आहे 
देव देवळात असला तरी 

देव देवळात दिसला 
म्हणून निसर्गाचे अस्तित्व 
अमान्य करू नये

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अमान्य करू नये
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

          कविता विद्रोही भाषेकडे जाणारी आहे. बंडखोरी भाषेत येत आहे, शब्दांचे प्रकार बदलत आहे पण ते बदलण्यामागचे अर्थ मात्र सरळ साध्य आहे.
          आपण ज्या समाज व्यवस्थेचा भाग आहोत ती समाजव्यवस्था एका विशिष्ट विचारसरणीने आणि संस्कृतीने जपलेली आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शब्दांना आता कुठेतरी जेल बंद करण्याचा प्रकार चालू आहे. त्या मानसिकतेला त्यांच्या त्या भाव विश्वातील त्या विचारांवर ही कविता आहे.
         कुठल्याही विशिष्ट समाजावर किंवा व्यक्तीवर ही कविता नाही. कवितेतले संदर्भ फक्त इतिहासातून घेतलेले आहे. कारण इतिहास सांगतो आहे....., त्या गुलामगिरीचे आपल्या प्रगतीमध्ये किती अडथळे निर्माण झाले म्हणून ही बंडखोरीची भाषा...!!❤
         " त्या मानसिकते विरुद्ध ती जिवंत करू पाहत आहे जुना इतिहास...." आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या सूचनांचा विचार केला जाईल. धन्यवाद...😂❤


*** कवटाळून माणुसकीला ***

किरकिरी झाली आता 
संपलेल्या व्यवस्थेची तरी 
जंगलेल्या तलवारीला 
नवीन धार देत आहे 

नवीन ब्राम्हणवाद 
नवीन क्षत्रियवाद 
नवीन प्रांतवाद
नवीन भाषावाद
नवीन विकासवाद
नवीन समाज व्यवस्थेतील 
नवीन आधुनिकवाद 

संपलेल्या नीच व्यवस्थेची इथे 
लिलावही होत आहे 
तरी अहंकाराचा झेंडा मात्र 
अजूनही नसानसात वाहतो आहे 

तीनहजार वर्षाच्या गुलामगिरीला 
सतरीने बेचिराख केले आहे 
विसरू नको पेनाची ताकत 
शब्दाने लिहिलेली 
स्वातंत्र्याची व्याख्या 

समानतेचे गणिते 
विसरू नको 
तुझ्या मेंदूतला त्या थोड्याफार 
'संविधानाला,' 

इथे भडव्यांची (फालतू लोक) 
जात अजूनही 
जेलबंद करण्याची मुभा 
जागी आहे 
कवटाळून माणुसकीला...!!❤

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- कवटाळून माणुसकी
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

        नव्या संस्कृतीचा सूर्य म्हणजे बौद्ध समाज...!!  सांस्कृतिक मूल्य जोपासणारा समाज म्हणजे बौद्ध समाज .....!! 
       माणूस आहोत म्हणून माणसाचे सारे हक्क आपल्याला मिळायला हवेत या जाणिवेतून विद्रोह जन्माला आला आणि या विद्रोहाचे स्वरूप म्हणजे बौद्धधम्म.
       म्हणून आम्हाला मान्य नाही अध्यात्माचा तो रंग. म्हणून आम्हाला मान्य नाही त्या रंगाची संस्कृती रुढीवादी परंपरा.याच भावविश्वातून  ही कविता.
         कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!

*** आय एम बुद्धिस्ट ***

काल कुणीतरी विचारले 
माझी जात मी ही अभिमानाने 
सांगितली माझीच जात  

Ooooo... "बौद्ध "
Hmm.... "बौद्ध "
म्हणजे महार 
म्हणजे हिंदूच ना..! 
नाही आताचा बौद्ध 

पेटलेल्या विचारांचा ज्वालामुखी 
शांत करत 
मला मान्य नाही  
नावासमोर हा शब्द लावणे 
मी जन्माने बौध्द आहे 
दलितच ना 
वंचित घटकच ना 

नाही आम्ही आंबेडकरवादी 
विद्रोह पेरणारे हक्कासाठी  
आम्ही बाबासाहेब मान्य करणारे  
संघर्षासाठी 
संघर्ष करण्यासाठी 
रान पेटवणार आहे विचाराने 
निर्माण केले आहे शिवार 
निळा पाखरांचे 

दारी किल्ला माणुसकीचा
हृदयात झरा जगण्याचा 
आम्ही बौद्ध शांतीच्या मार्गाचे 
आम्ही बौद्ध आहो मध्यम मार्गाचे
कुंपणापलीकडील जगण्याचे 
बदलत चाललेल्या समाजव्यवस्थेचे 

आम्ही बौद्ध आहोत 
कधीकाळी अतिशुद्र शूद्र 
वेदना जीवाच्या आकांताने 
सहन करणारे 
आम्ही आता बौद्ध 
काल कुणीतरी विचारली 
माझी जात 
मी अभिमानाने सांगितली 
माझी जात 
"आय एम बुद्धिस्ट",...!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- "आय एम बुद्धिस्ट"
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

          ललकारी कविता स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व या विचारांची जाणीव करून देणारी आहे. अस्पृश्यतेची चटके आता जरी कमी प्रमाणात जाणवत असले तरी अजूनही समाज व्यवस्था विषमतेकडेच जात आहे ते अपवादात्मक परिस्थितीनुसार ती बदलत आहे.
        म्हणून ललकारी असू दे....!! तुझ्या ती जाणीव असू दे. अशा परखड भाषेत 
विषमतेविरुद्ध विचार या कवितेत मांडले आहे. विद्रोह या कवितेत मांडला आहे.
       वेळ आंधळी असते. परिस्थिती आंधळी असते. डोळे बंद करून त्या परिस्थितीकडे विश्वास ठेवू नको. ही सांगणारी कविता...!               आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. धन्यवाद....!!💕

*** ललकारी ***

धोतंड सोडून ललकारी दे 
जग हसेल जग रडवेल  
हाजी हाजी करण्यासाठी 
ही व्यवस्था पळवेल 
जखमेवर अस्पृश्यतेचे लेप लावेल 
पण तू हरू नकोस 
असमानतेच्या वाऱ्यावर 
असंतोषाच्या गावावर 
विद्रोहाच्या ठिणग्यासोबत 
असू दे 

विद्रोहाची ललकारी 
भडव्या समाजव्यवस्थेसमोर 
समानतेने ठेव 
आम्ही लेकरे आहोत 
विद्रोही बाणाचे 
विद्रोही पिंजरातल्या समानतेचे 
झिडकारलेल्या माणूसपणाचे 
दुःखाच्या बाजारातले 
खळखळणाऱ्या झऱ्याचे 
स्वातंत्र्य ....
समता ....
बंधुत्व .....
न्याय .....
निर्भीड काळजाचे....!!💕
 
शब्दात ललकारी असू दे 
नव्या विचाराच्या पेरणीची 
बंधूभावाची 
उपेक्षित जीवनाच्या संघर्षमय 
प्रवासाची बहरलेल्या विचारांची 
बदललेल्या क्रांतीची 
ललकारी असू दे 
गावकुशाबाहेर पहाटेच्या 
उगवलेल्या सूर्याची 
उज्वल भविष्याची 
आशावादी...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-" ललकारी"
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

              कविता व्यर्थ शब्दांमध्ये गुरफडत नाही. कविता नोंद घेत आहे, त्या वनव्याची जो वनवा विद्रोहने पेटला आहे. बंडखोरीने पेटला आहे. त्यामुळे फुकांर होणार नाही.
            चातुर्यवर्णवादाची ....!! मी नव्या संस्कृतीवर नांगर फिरवणार नाही. मी पिंजऱ्यातली समानता होणार नाही. संकटाशी लढण्याची ताकद आहे. ही सुचविणारे ही कविता.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केल्या जातील. त्यावर संशोधन केला जाईल...!!💕
...!! धन्यवाद...!!


     **** फुंकार ****

दुःखांच्या बाजारात नवीन काही उगवेल
असे वाटले नव्हते पण गर्दीत 
प्रबोधनाची लाट आली 
माणूस लोभ अहंकार एका फुंकरणे 
उडून गेला न..... 
पुन्हा नव्याने जगण्यासाठी 
विषमतेच्या रानात 
समानतेचे नांगर 
पेरले 

प्रस्थापितंच्या काळजावर नवीन बियाणे
उगवले झाडू खराट्याचे आयुष्य आता 
उगवत्या शिवारांनी घेतले म्हणून 
तुझ्यातला विद्रोह 
एका फुंकरिने विजू देऊ नको 

विद्यापीठाला पिठाची गिरणी 
होऊ देऊ नको 
नदीच्या काठाच्या वाळूला 
स्मशानाचे स्वरूप येऊ देऊ नको  
राजाचे  साम्राज्य होऊ देऊ नको 
नजर दुर्लक्षित होऊ देऊ नको 
पिंजरात अक्की समानता गोळा होईल 

सोसलेल्या वेदना तुडविताना 
जो आक्रोश झाला 
तो आता करता येणार नाही 
एका फुंकरीने 
जग बदलणारा आता नाही 
निर्भीड मायेची उब देणारा आता नाही 
अस्मितेची लढाई आपली आहे 
आता लढायचे ठेच लागलेल्या 
जखमेसारखी
प्रस्थापित विचारधारेच्या वादळापूर्वी 

मी भ्याड नाही 
मी तो आवाज नाही 
जो शांत बसणार आहे 
मी तो आवाज आहे 
जी अत्याचाराची परखड भाषा आहे 
विषमतेविरुद्ध आक्रोश आहे 

मी ती फुंकर नाही 
ती नव्या जाणीवने शांत बसेल 
स्वार्थी विचाराने शांत बसेल 
मी तो भ्याड आवाज नाही 
जिथे उगवत्या संघर्षाला 
स्वतःभोवती नवीन फुकांर घालून 
घेईल 

मी जगण्याची आवाज आहे 
मी विलक्षण विद्रोहाच्या 
पावसाची एक हलकी धार आहे 
मी फुंकर नाही चातुर्यवर्णवादाची
मी आक्रोश आहे 
शूद्र यांच्या जीवन कार्याची 
मी फुंकर आहे माणसाला माणूस 
म्हणून जगण्याची 
मी फुंकर आहे 
शतकानुशतके बंद टोचलेला 
वेदनेची ओसाड बागेतील 
मी फुंकर आहे 
विद्रोहाच्या सर्वोच्च बिंदूची

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-" फुकांर "
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

                       दलितांची अस्मिता जागवणारी त्यांची स्वप्न पालवीत करणारी प्रगतिशील विचार भावना संवेदना हुंकार ललकारी पिंजरा कुंपण वास्तव उजेड्यातील प्रकाश अनादी अनंतापासून आहे. 
        त्याच परिस्थितीत न राहण्यासाठी परंपरेचा विध्वंस करणारी विद्रोही भाषा कवितेमध्ये येते पण आता ही कविता विशिष्ट वळणावर येऊन पोहोचली आहे. तिथे आपल्या आजूबाजूची परिस्थिती नुसार वागत चाललेले जग दिसत आहे.
       अजूनही अस्पृश्यतेचे देण तुमचे कर्मकांड आहे. तुमच्या कर्माचा हिशोब आहे ही भाषा बोलणारे अध्यात्म्याचे रंग स्त्री पुरुष आपल्या आजूबाजूला दिसते. 
       त्याच व्यक्तींच्या विचारावर आधारित ही कविता. भावनांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न नाही तर विचारांची चीड आल्यामुळे लिहिले गेलेला हा विद्रोह आहे. कारण विद्रोह लिहिण्यापर्यंतचा प्रवास रानकाटातून आलेला आहे. गावकुशाबाहेरील परिस्थितीतून आलेला आहे.
       ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा त्या गावातील आजूबाजूंच्या समाजमनामध्ये त्या घटनेबद्दल असलेली ही भावना. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलताना शब्द सांभाळून वापरत नाही. कारण ती उच्चवर्णीय असते.
            त्या स्त्रीसाठी हे शब्द आहे..... ही घटना मानवी समाजाला माणसाला आंतरबाह्य विचार  करायला भाग पाडणारी आहे. तरीही भावना शून्य स्त्रीच्या विचारांची ही कथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न.... चुका आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.
       म्हणून त्या भावसंवेदनेतून त्या स्वार्थी विचार शून्य लोकांच्या भावविश्वाला समर्पित ही कविता. या कवितेतला विद्रोह...!!
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.  चुका आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे विचारच माझ्या कवितेची प्रेरणा आहे. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

**** अजूनही ती उच्चवर्णीयच  ****

ती अजूनही उच्चवर्णीय स्त्रीच आहे 
ती अजूनही स्त्री झालीच नाही 
ती गुलामच आहे दुहेरी विचारांची 
तिला माहीत नाही स्वातंत्र्य भारताच्या 
स्त्रीचे दुःख 
तिला माहित नाही स्वातंत्र्य स्त्रीची 
यशोगाथा 
कारण ती अजूनही उच्चवर्णीयच  

प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या सर्व 
प्रथा तिला मान्य आहे म्हणून 
ती जाणार आहे 
शांत संयमी सतीप्रथेला समोर
संपवणार आहे आयुष्याची प्राणज्योत 
कारण तिला मान्य आहे ती समाजव्यवस्था

इथल्या समाजव्यवस्थेचा विद्रोहाचा 
ज्वाला माहित नाही 
खैरलांजी घटना ही त्या स्त्रीमुळे घडली 
ती बंडखोर होती म्हणून 
ती चरित्रहीन होती म्हणून 
ती अनैतिकतेच्या बाजारात उभी होती 
म्हणून ती वाया गेली होती म्हणून 

ती स्वातंत्र स्त्री होती म्हणून 
ती घटना घडली नाही 
तर तिने समाज नासवीला होता म्हणून 
तिच्यावर बलात्कार अत्याचार मारपीठ 
त्यावेळी उपस्थित मानवी समाजाने केला 
नव्हता तर त्या स्त्रीने 
स्वतःला गावकऱ्यांच्या स्वाधीन केले होते म्हणून  

ती दलित स्त्री होती 
तिला माहीत होते तिचे सत्य  
ती उपेक्षित होती 
शूद्रांची लेक होती 
दलितांची लेक होती 
दलित स्त्री असल्याच्या कर्माचे भोग 
भोगत होती लैंगिकतेची मूर्ती होती 
म्हणून तिने मान्य करायला हवी होती 
ती संस्कृती बाजारातली म्हणून

ती अजूनही उच्चवर्णीयच आहे 
विचाराने तिला मान्य नाही 
तो विद्रोह जगण्यासाठीचा 
तिला मान्य नाही तो विद्रोह 
स्त्री म्हणून स्वातंत्र्य जगण्याचा 
तिला मान्य नाही तो विद्रोह 
जो प्रस्थापित समाजाच्या गर्दीत
मूकबधिर झालेल्या 

त्या रानातील तिला मान्य आहे 
अजूनही तिची समाजव्यवस्था 
रूढी जाती प्रथा अहंकार 
द्वेष मत्सर गुलामगिरी 
दुःखाच्या बाजारात उगवणारे 
फुल नको आहे स्त्री म्हणून 
स्वातंत्र्याची परिभाषा चौकटीत आहे 
गर्दीतला माणसात 
ती शोधत नाही बाईपण 
ती त्या गर्दीचा एक भाग होऊन जातो

खैरलांजीत जगण्यासाठी काहीच उरलं 
नव्हतं कदाचित तिच्यासाठी 
पण तो संघर्ष होता तो विद्रोह होता
...... जगण्यासाठीचा माणूस म्हणून 
पण तिला अजूनही मान्य आहे   
ती उच्चवर्णीय स्त्रीच आहे 

कारण तिच्यावर कधीही खैरलांजी 
झाली नाही कारण तिच्यावर 
कधी अत्याचार बलात्कार मारहाण  
लैंगिकतेचे कोणतेही शोषण झाले नाही 
कारण ती मूकबधिर आहे 
तिला माहीतच नाही 
पण तिला अजुनही जाणीव आहे
उच्चवर्णीय असल्याची 
तिच्यावरही हे सर्व होतात 
फक्त शब्द वेगळे असते 
विषमतेच्या रानात त्यांच्यासाठी 
वेगळे शब्द आहे 

पण तिला माहित नाही 
ती एक स्त्री आहे 
तिच्यावरही हे सर्व होते 
पण तिला ते मान्य नसते 
कारण ती प्रस्थापित समाजव्यवस्थेपुढे 
दुहेरी आंधळी असते 
विचाराने आणि भावनेने 

भावना शून्य झालेला व्यक्तीला 
खैरलांजी हा अनैतिकतेच्या बाजारात 
योग्य वाटतो पण...
माणुसकीच्या बाजारात दुहेरी हत्याकांड 
असतो एका स्त्रीचा झालेला 
तो खुलेआम खूण असतो 
विद्रोह हा तिचा अंतिम श्वास असतो 
तरीही तिला मान्य आहे 
एक स्त्री म्हणून झालेला 
तो सर्व प्रकार 
कारण ती अजूनही उच्चवर्णीय 
विचारसरणाची स्त्रीच असते ...!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-" अजूनही ती उच्चवर्णीयच "
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना मनातील विद्रोहाला परिस्थितीला साधे सरळ शब्दात निवडुंगाच्या काट्यासारखे टोचत असले तरी गुलाबाच्या फुलासारखे नाजूक भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

                         पहाटे उगवलेल्या स्वप्नासारखी  माणुसकी अजूनही जिवंत आहे, ही सांगणारी कविता. विद्रोहा हा जातीपाती धर्म रूढी प्रथा इतकाच संदर्भात नाही तर विद्रोह प्रत्येक माणसात आहे. जो माणूसकी जपतो.
       विद्रोह प्रत्येक व्यक्तीत आहे. ज्याला स्वप्न आहे... ज्याला श्वास आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो त्याला जपतो आहे. म्हणून कवितेत शब्द "रिकाम्या खिशाला न परवडणारी माणुसकी तरीही तो माणुसकी जपतो आहे."
        याच आशायसंदर्भात ही कविता. "अजूनही जिवंत आहे." कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या सुधारल्या जाते. त्यावर संशोधन केल्या जाते. तुमच्या मतांना प्रथम प्राधान्य दिल्या जाईल. कारण कविता हा विशिष्ट संदर्भातून लिहिले जाते. 
     असलेल्या परिस्थितीतून लिहिली जाते म्हणून त्यात बदल केला जाऊ शकतो. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे धन्यवाद...!!❤

*** अजूनही जिवंत आहे ***

माणसाच्या जगात अजूनही जिवंत आहे 
माणूसकी माणुसकी रिकाम्या खिशाला 
परवडत नाही तरीही जिवंतच 
त्यांच्याही खिशात माणूसकी  
कधी शब्दाने कधी सहानुभूतीने 
कधी उगवत्या प्रेमाने 
म्हणूनच रस्त्यावरचा प्राणी 
अजूनही अन्न खातो आहे 
काढायला आलेले धान्य 
अजूनही चिमणी पाखर खातच आहे 
रिकाम्या खिशाला परवडत नसले तरी  त्यांच्यातली माणुसकी 
अजून जिवंत आहे 

त्याची माणुसकी विचित्र असली तरी 
व्यवहार वादाला धरून नसली तरी 
तो विद्रोह माणूस असण्याचा 
गंमत मात्र वेगळीच 
विकत घेणारा आणि विकणारा 
दोन्ही हात खालीच असतात  
पण विद्रोह मात्र 
पोटासाठी - भविष्यासाठी 
अंगणात झुकलेल्या त्या 
पाठीच्या कणासाठी  
मातीचा जन्म खांद्यावरून 
मातीत जातो.....
पण विद्रोह संपत नाही 
विद्रोहाने चुल विजली जाते 
पडकी भिंत तशीच राहते 
एकटीच 
सूर्यप्रकाशाच्या -अंधाराच्या सावलीने 
तरी कणा मोडत नाही 
पाठीवर एक थाप असते 
विद्रोही असल्याची 
झोळीतल्या रिकाम्या झोळीला 
चेहरा मोहरा नाही 
तो विस्थापित असतो 
त्याला जात नसते 
धर्म नसते 
त्याला रुढी नसते 
त्याला अस्तित्व नसते 
त्याला आधार नसतो 
काळ तेवढा सोबत असतो 
आव्हानांचे सारेच गणित 
त्याच्या रिकाम्या खिशात असते 
कारण तो विद्रोही असतो 
रिकाम्या खिशाचा 

पडक्या भिंतीचा  
ओलावलेल्या शेताचा 
भेगा पडलेल्या जमिनीचा 
तो विद्रोह असतो 
झाडावर लटकणाऱ्या देहाचा 
तो विद्रोह असतो 
उपासमारीचा 
तो विद्रोह असतो 
फसवणुकीचा 
तो विद्रोह असतो 
रस्त्यावर फेकून दिलेल्या 
रक्ताच्या घामाच्या कष्टाचा मालाचा 
तो विद्रोह असतो 
ओझं वाहत चाललेल्या 
माणुसकीचा 
तो विद्रोह असतो 
दुःखाच्या त्या साऱ्या अहंकाराचा 
जिथे उपासमार झालेली असते 
हिम्मत खचलेली असते 
तो विद्रोह असतो 
शिखरावर न चढणाऱ्या 
आयुष्याचा 
तो विद्रोह असतो 
संधी हिरमुसून गेलेल्या मनाचा 
तो विद्रोह असतो 
अपमानचा 
तो विद्रोह असतो 
मुलीच्या उंच भरारीला 
जमीन दोस्त करणारा 
तो विद्रोह असतो 
यशाच्या शिखरावर न चढणारा 
खडतड प्रवासाचा 

पण तो माणूस आहे म्हणून 
त्यांच्यातला विद्रोह अजूनही जिवंत आहे 
तो हरला नाही 
तो डगमगला नाही 
तो अजूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 
विश्वास ठेवतो आहे 
या निसर्गाच्या शक्तीवर  
माणुसकीवर माणुसकी
अजूनही जिवंत आहे 
विद्रोहा सोबत विद्रोहाच्या सुगंधा 
पुन्हा सोबत त्याला माहित आहे 
आयुष्याचे सोने काय असते 
त्याला माहीत आहे वळणावळणावर 
आलेल्या त्या प्रत्येक गणिताचा हिशोब 
तोही शोध विद्रोह पूर्ण करणार आहे 
म्हणूनच विद्रोहाला कुठल्याही 
जाती रुढी प्रथा परंपरा 
कोणतीही समाज व्यवस्था 
स्वतःमध्ये गुंडाळून ठेवू शकले नाही 
हरवलेला माणूस 
कधी दिशाही झाला नाही 
दिशा विद्रोहाच्या असल्या तरी 
त्याची माणुसकी कधी संपली नाही 
डोळ्याचा रंग तेवढा विस्तवाच्या रंगासारखा    झाला पण त्याची झुंज संपली नाही 

रानातला वनवा त्यांनी विजू दिला नाही वसंताच्या फुललेल्या परिस्थितीसारखा   
तो त्या रानात अजूनही जळतो आहे 
शिवाराचा खेळ अजूनही चालूच आहे 
रस्त्याच्या कडेला अजूनही 
मालाची विक्री होतेच आहे 
चार पैसे कमी असले तरी 
अजूनही त्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक  रस्त्यावर फिरणाऱ्या कुणाला तरी 
त्या रिकाम्या खिशातले 
काहीतरी तो देतोच आहे 
सारखी तळमळ विद्रोहाची 
फसलेल्या मनात असली तरी 
त्यांचा विद्रोह हा त्याला 
त्याच्यातली माणुसकी संपू देत नाही
कारण विद्रोह माणूसकीवरच 
कारण विद्रोह माणुसकीचे दुसरे 
नाव आहे म्हणून 
त्याच्यात अजूनही जिवंत आहे 
माणुसकी विद्रोहाच्या संगतीने पेरलेली विद्रोहाच्या शांततेला 
तो कुठे सोडून देत नाही 
कारण त्याच्या मनात 
अजूनही जिवंत आहे 
ती पायवाट जी संविधानाकडे जाते 
जी माणसाला माणूस म्हणून 
जगण्याचे हक्क देते 
माणुसकी जिवंत आहे 
विद्रोहाने अजूनही......!!💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- अजूनही जिवंत आहे 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------

                कविता नव्या जाणिवेतून निर्माण झाली आहे. मनात खदखदत असलेली एक भावना क्रांतीच्या बदलत्या संदर्भात आणि नवीन जागृती आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आत्म जाणीव निर्माण व्हावी. या विचार मंथनातून कवितेचा उगम झालेला आहे. 
      मला माझ्या हक्काचा अंगण हवा आहे. कारण अंगण घरातील विचारांचे प्रतिक असते. अंगण आठवणीचा उजाळा असतो. अंगण सुखदुःखाचे सोबती असते. म्हणून मला माझ अंगण हवा आहे.... जे वेगवेगळ्या विचारांमुळे वेगवेगळ्या वाटेवर गेले आहे. वेगवेगळ्या वाटेवर चळवळ चालू ठेवत आहे ही चळवळ एकत्रित यावी त्या चळवळीला त्या एकत्रित चळवळीला "अंगण"= हा शब्द संबोधला आहे.
       कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. 
        काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद !!!!!!❤💕

*** अंगण  ***

अजूनही शोधता आले नाही 
अंगण माझे माझ्याच पानवट्यात
शोधता शोधता पृथ्वीचे अनंत फेऱ्या  
वाट पाहतच राहिले 
दलदलीत स्वतःच्या अंगणाची 
का कुणास ठाऊक. ?
का कुणास गृहीत धरावे माहित नाही ..?
पण अंगण हवे होते 
माझे स्वतःचे 
माझ्या हक्काचे 
माझ्या विचारांचे 
माझ्या जळजळीत स्वभावाचे 
अप्रत्यक्ष प्रत्यक्ष बसता येईल 
असे अंगण हवे होते !!

आठवणी आणि आठवणीच्या बाहेर 
अर्धवट चाललेल्या या वास्तवाला 
आता अंगण हवे आहे 
हक्काचे नव्या युगाचे 
अंगणातील आभाळ आपले असावे 
जमेल तेवढे पण हक्काचे 
नरडीचा घोट घ्यावा 
इतकी अमानुष वागणूक नको आहे 
उसळलेल्या आगीत 
आता जळायचे नाही आहे 
तर शांत व्हायचे आहे 
विद्रोहाच्या ठिणगीची आग 
आता आपल्याच अंगणात

मुळाच्या सुरुवातीपासून आता खोल 
मनावर वास्तवतेचे लेबल नको 
मोकळ्या श्वासाची अपेक्षा तेवढी मात्र 
त्या उन्हात हामी हवी  
असे किती दिवस जाईल 
हीच अपेक्षा ठेवून 
असे किती दिवस जातील 
हीच अपेक्षा ठेवून 
दिशा पूर्ण होण्याच्या भीतीने 
माझी भूक आता 
माझ्या उन्हाची आहे 
कायमची 

उगवलेल्या भिंतीच्या आडोशाला 
गवताच रान होऊ शकत नाही 
दबलेल्या आवाजाला मोकळेपणाची 
वाट देऊ शकत नाही 
तुटलेल्या वास्तवाला नवीन अर्थात 
गुंफू देत नाही चीड खूप आहे 
बंदिस्तव्यवस्थेची.... 
बंदिस्त व्यवस्थेकडे चालणाऱ्या शब्दांची 
हसावे कि रडावे या उलट 
तपासणीकडे जाताना 
अंगण हक्काचे हवे हे मात्र 
मनात ठसून भरले आहे  

खिल्ली उडवावी इतकी अस्मिता 
संपली नाही आमची  
जीवनाचा संघर्षमय प्रवास चालूच  
आहे शांततेत म्हणून 
मला माझ्या हक्काच अंगण हव 
थोडीच शब्दांची रांगोळी 
सजवता येते मला 
शब्दांना भावनेत गुंफायचे मला 
पण माझ्या हक्काच्या अंगणासाठी 
माझ्या डोळ्यांच्या अश्रूंसाठी
शब्द मला सापडत नाही 
कारण मला माझ्या हक्काचे 
अंगण हवे आहे 
विद्रोहाच्या पायरीवर चालताना 
उलगडत नाही शब्द आता 
झगडता येत नाही शब्दांबरोबर 
भांडता येत नाही शब्दांबरोबर 
आता शब्द अपुरे पडत आहे 
कंठ दाटला आहे 
परत गप्पाटप्पांच्या या माझ्या 
शब्दांच्या रांगोळी 
आता जुने दिवस 
हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी 
गणिताचा हिशोब मांडत आहे 
कारण मला माझ्या हक्काचे 
अंगण हवे आहे 

पोत पोत भरलेले आठवणीने 
हसऱ्या मोकळा केसांचा गुंता 
आता माझ्या हक्काच्या अंगणात 
काढायचा आहे 
कारण प्रस्थापित व्यवस्था शृंगाराला 
लैंगिकतेचे वळण देते 
उभ्या आयुष्यात जपलेली प्रतिमा 
आता बदलायची भाषा करते 
म्हणून आता माझे स्वतःचे 
अंगण हवे आहे 
उगाच गुरफडते मी त्या शृंगार 
मनोरंजनात्मक कवितेकडे 
पण त्यासोबत मनात 
कुठेतरी हक्काचं अंगण हवे आहे 
अस्तित्व जपणारे जिवंत
 
समाजव्यवस्था बदलेल 
या भीतीने 
पायाखालची जमीन सरकेल 
या भीतीने 
सर्व आता खूपने स्वार्थीपणा 
बाजूला ठेवावा वाटतो 
विविध रंगांच्या बाजारात 
आता आपले स्वतःचे अंगण 
शोधावे वाटते 
समाधीस्थ होईपर्यंत 
खांद्यावर हक्काचे अंगण 
हवे आहे 
जे उच्चारता येत नाही 
जे लिहिता येत नाही 
जे चैतन्यमय आहे 
जे आपले आहे 
कपाळाच्या उगवलेल्या शिक्यावर 
आता माणुसकीचे 
अंगण हवे आहे 
आता विभागून गेलेल्या दुःखाचा 
एकत्रितपणा करावा लागेल 
स्वार्थीपणाची गुंफण आता 
हक्काच्या अंगणासाठी विसरावा लागेल 
पळविलेल्या स्वप्नांना  
पळवत असलेल्या स्वप्नांना 
मिळविण्यासाठी, समोरच्या भविष्यासाठी
अंगण हवे आहे हक्काचे 
खिडकीच्या आत बसून 
हिरवळीचा आनंद घ्यायचा आहे 
प्राचीन सभ्यतेची 
संकल्पना व्याख्या ध्येय 
विसरायची आहे 
संवेदनशील मायेची उब आता 
फक्त माझ्या अंगणातच मिळेल 
म्हणून मला माझ स्वतःचं 
अंगण हवे आहे !!❤😂

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- "अंगण"
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------


         विद्रोहाची भाषा कवितेत कमी होत आहे कारण विद्रोह संपलेला आहे. विद्रोहाचे स्वरूप बदलले आहे. सातत्याने लिखाणाकडे जाणाऱ्या विद्रोही मार्गाकडे न जाता विद्रोह कसा संपत चाललेला आहे तरीही विद्रोह आहेत हे कुणीही बदलू शकत नाही.
        विद्रोह संपला हे गृहीत धरले तरी तो परत नव्या स्वरूपात आपला समोर उभा आहे याच तीव्र निषेध व्यक्त करत एक प्रेयसी सर्वसामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करते तिच्या या भावना शब्दात गुंफण्याचा हा प्रयत्न.
       कवितेचा आशय प्रेमभंग नसून तो कोणत्या कारणाने झाला हे सांगणारी आशाय संदर्भातून ही कविता......!!❤
          कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!❤

**** आधी त्यांनी जात विचारले ****

आधी त्यांनी  जात विचारली 
आणि शब्दांना तोडमोड करत 
नवीन विषयाची जात निर्माण केली 
तेव्हा प्रेम काय असते हे कळले 
जातीचा विषय 
तेव्हा आला नाही 
जेव्हा त्याने हाताला स्पर्श केला 
त्याने ओठांना स्पर्श केला 
झाडाच्या मागे शरीराशी 
सहमतीने का होईना 
डोंगराएवढ्या मायेने प्रेम केले..... 

आता त्याने जातीचा आधार दिला 
पंख खुले आता पिंजऱ्यात अडकविले 
शब्दांचा पसारा खूप झाला मनात 
पण तो बाहेर आले नाही 
डोंगर तुटताना आवाज तितका  
पण वेदना दिसत नाही 
समुद्राची लाट डोळ्यात भरून 
आली पण 
निशब्द भिजलेल्या गालाला निमित्त 
सोबतीला एकांत होता श्वासाचा 

आत पावसासोबत शेवाळ तितका 
निर्माण होत होता 
प्रेमाचा वनवा जातीने भिजविला 
ओठांचा स्पर्श आता आठवणीतही 
राहणार नाही 
जात तितकी आडवी आली आहे 
फुलपाखराला आता निस्वार्थ 
प्रेम करण्याचा अधिकार नाही 
आधी विचारावी लागेल जात 
मगच प्रेम करावे लागेल 

पाजर फुटणार नाही भावनेला 
इतकी काय काळजी घ्यावी लागेल 
भिजलेल्या ओठांना स्पर्श 
झालेल्या शरीराला 
फुललेल्या स्वप्नांना चंचल मनाला 
कारण इथे जगण्यासाठी 
जात महत्त्वाची आहे 
व्यवस्था चालविण्यासाठी 
भिजलेल्या डाळीला अधिक भिजविण्यासाठी 
कोवळ्या मनाच्या त्या 
स्वप्नांना पायदळी तुडविली जाते 
जातीच्या नावाखाली 
भावनांचा खेळ मांडला जातो 

तारुण्याची परवड एका जातीच्या 
शब्दाने होऊन जाते 
विणलेल्या स्वप्नांना शेवटी 
तुटलेल्या धाग्यासोबत 
कुठेतरी ठेवून द्यावे लागते 
जात आडवी येते तेव्हा  
आम्ही प्रतिष्ठित नसतो 
या समाजव्यवस्थेपुढे  
आम्ही अस्पृश्य आहो 
त्यांच्या मानसिकतेमध्ये 
आम्ही अस्पृश्य आहोत 
त्यांच्या शब्दांमध्ये 
त्यांच्या विचारांच्या माणुसकीमध्ये 
जात गुंडाळली जाते 
आपल्या सोयीनुसार-विचारानुसार 
 
तुटलेल्या आशेच्या किनारावर 
मी शोधते तो वनवा 
माझ्या जातीचा माझ्या अस्पृश्यतेचा  
गावकुसाबाहेर जगण्याचा 
पण त्या व्यक्तीची वणवण 
अजूनही त्याच दुहेरी मानसिकतेत  
मिळमिळीत झालेल्या शब्दांमध्ये 
त्यात माणुसकी जिवंत नाही 
त्याची वणवण विज्ञानाशी नाही 
त्याची वणवण समाजव्यवस्था बदललेल्या 
......संविधानाशी नाही 
त्याची वणवण जळलेल्या 
त्या मनुस्मृतीशीच आहे  
सावल्यांच्या खेळांमध्ये  
रंग न बदललेल्या सावल्यासोबत
खेळ मांडला गेला सावल्यांचा प्रेमाच्या 
आधी जात विचारल्या गेली 
आणि जातीनुसार विषय बदलला गेला
प्रेमाचा...!! ❤💔

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- आधी त्यांनी जात विचारले 
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

           झाड हा शब्द त्या भावनेला समर्पित आहे.  तेथे विद्रोहाची भाषा नाही ते झाड संवेदनशील आहे. नाजूक, कमजोर, वंचित, दलित,अविकसित आहे.
        शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये अस्मिता जागी झालेली आहे. विचारांचे कुंपण तुटलेले आहे. ढोंगी स्वार्थी प्रवृत्तीची चीड येते. परिवर्तनाच्या नावाखाली जुनी संस्कृतीचा प्रकाशअंधार नवीन आधुनिकतेला देऊ पाहत आहे पण आम्ही तो अंधार ते संवेदनशील झाडाला विकासाच्या आणि माणुसकीचे फळ येणार आहे.
       ही आशा या कवितेत सांगण्याचा हा प्रयत्न...! याच विचारमंथनातून ही कविता. विद्रोह शांत आहे पण मनाला विचार करणार आहे.
           सूर्य तळपत आहे पण संवेदनशील माणूस त्याला पाणी देत आहे. शांत होण्यासाठी!! कारण प्रगतीची वाट अजूनही त्यांच्यापर्यंत आहे. अनादी अनंत काळापासून नसलेली.
       या झाडाला फळ शांतीचे येणार आहे.  आशावाद "झाड", या कवितेत लिहिण्याचा हा थोडा फार प्रयत्न...!
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!💕

      **** झाड ****

श्वासात अडकलेला माझा श्वास 
आता सोपे नाही 
जगणे माणुसकीच्या 
पुरुषार्थामध्ये आता 
संवेदनशील सामान्य माणसाच्या 
झाडाचा खेळ मांडला आहे 
नीचव्यवस्थेने

झिरपत चाललेल्या क्रांतीची आग 
विद्रोहाला राक्षसी परंपरेचे जतन 
करीत विकासाचे वतन करीत आहे 
लिहिता येत नाही 
त्या विकासाची भाषा कारण 
तो दिसत नाही 
वनवा होतो लढण्याचा 
पण अडकला आहे अति 
संवेदनशील माणसाचा 
झाडाचा खेळ मांडला आहे 
नवीन कर्मकांठाने

मुलतत्ववादी व्यवस्थेवर आघात 
करता येत नाही 
संवेदनशील मानसिकतेला 
पळविले जाऊ शकत नाही 
पहाड कितीही कणखर असला 
तरी मन मात्र हळव असत 
गडद होत चाललेले प्रारब्ध 
झुंडशाही मानसिकतेसमोर हतबल होत
संवेदनशील माणसाच्या 
झाडाचा खेळ मांडला  
वैदिक संस्कृतीने परत

बेंबीच्या देठापासून उगवलेला 
आवाज ओठांपर्यंत येतच नाही 
वारसा सांस्कृतिक धडपडीचा 
माणूस होण्याचा 
जे जे लिहिता येईल 
जे जे उच्चारता येईल 
जे जे सांगता येईल 
ते लपून छपून नरटीचा घोट 
घेत उगवलेल्या रानात हिरवळीसारखे 
संवेदनशील माणसाच्या 
झाडाच्या खेळालाही पालवी फुटेल 
समाधानाचे माणूस होण्याचे
शोषक व्यवस्थेच्या 
अंतर्बाह्य परिवर्तनासाठी 

हातात पेन पेन्सिल घेऊन 
पुस्तकाच्या साक्षीने 
क्रांतीच्या रक्ताचा थेंबही नसताना 
संवेदनशील माणसाच्या 
झाडाला फळ येईल 
शांतीचे अहिंसेचे 
माणुसकीचे
विकासाचे 
बुलंद प्रगतीचे...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- " झाड "
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------


       दलित साहित्य हे वेदनेचे साहित्य आहे हे आपले साहित्य आहे पानगळ आपलीच आहे म्हणून पालवी ही आपलीच असेल या मताची मी आहे याच मतप्रवाह वर ही कविता.
        कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..!! धन्यवाद💕

**** प्रवाह ****

क्षणभराच्या प्रवाहासाठी नवीन साज 
चढविला आहे शब्दांवर 
निराशेच्या संकेत आशेचे गोड 
बोल मनी येत आहे 
संध्याची आकाशातील रांगोळी 
आता दिशाभूल करीत आहे 
असे मनी वाटून जाते 
कारण प्रत्येक फांदीवर पानगळीचा 
ऋतू आला आहे 
पाखरांची कुजबुज आता 
दिसत नाही 
आपला रंग तेवढा दाखवतो 
बहरलेला मोहर 
आता नाही म्हणून 

सूर्य झाकायला जात नाही 
सांजवेळीच्या वेळेला 
तो आपला रंग कधी सोडत नाही 
तो आपल्याच दिमाखात चालतो 
हसऱ्या क्षणभर हसू वर 
....आणि मावळतो मिळालेल्या दिशेने 
म्हणून आम्ही नाही मावळणार 
कारण आम्ही नवीन भाषा शिकलो 
हसण्याची आम्हाला माहित  
ऋतुचक्राचे चक्र वसंताचा बहर 
चैत्र्याची पावले 
जगाच्या नवीन आरसा  
आम्ही फक्त सहानुभूतीमध्ये 
ते खोटे आम्हाला माहित आहे 

आमचे जग वेदनेने भरलेले 
वेदनेचा चारही बाजूने 
दुःखाचे पोते भरले आहे 
जगण्याच्या प्रवाह भयकांत आहे 
जगण्याला किंमत नाही 
आमच्या वेदना दूर करण्याचे काम 
आम्हीच करतो 
आमच्या हसण्यातून कारण 
आम्ही नवीन भाषा शिकलो आहे 
हसण्याची ....😂

ती खूप महाग आहे 
न परवडणारी आहे 
हिशोबात न बसणारी आहे 
प्रवाहाच्या तरी उरल्या सुरल्या 
आयुष्याला उधळत चाललो आहो 
आम्ही त्या कलेने  
आमचा जन्म कुणाच्या खांद्यावरती 
ठेवायचा नाही 
आभाळाएवढी उंची आमची 
आमच्या दुःखाने आमच्या वेदनेने भरलेले
पापण्यांमध्ये पाणी थोडेच आहे 
यापुढे थोड्याच प्रवाह शोधावा लागेल 
धुक्याच्या प्रवाहात थेंबांच्या लाटेमध्ये 
चेहरामोरा बदलावा लागेल 
आयुष्य बदलताना 

तेव्हा भीती आंधळी 
आयुष्याला भिडतात स्वप्नांची 
साऱ्या जगाची नजर  
प्रवाह चालू आहे 
स्वरकठोर आहे 
निरोप शेवटचा आहे 
वेदना भरल्या आयुष्याचा 
नजर रोखून स्वप्न बघतो आहे 
माझेच माझ्या सामर्थ्याला 
कधी येईल सामर्थ्य 
तक्रार माझीच आहे माझ्याशी 
ओझही माझच आहे माझ्याशी 
दुःखही माझाच आहे माझ्याशी 
वेदनाही माझ्याच आहे माझ्याशी 
आणि पाऊल ही माझीच आहे माझ्याशी
आयुष्याचे शिखर चढताना 
 
कुणी येईल याची वाट 
पाहत नाही आम्ही  
हिम्मत आपलीच आहे 
संधी साधू हिरमुसलेल्या क्षणांना
विसरून जायचे 
मनाच्या आत कुठेतरी घट्ट बांधून 
ठेवायचे सुंदर आयुष्य 
आपण आपल्या सहानुभूतीने प्रेमाने 
परक्यांना परक करायचे 
आपणच आपले व्हायचे 
नवीन चैत्राच्या पावली सारखे 
उंच भरारी साठी 
हे जग हसण्यासाठी आहे 
हे जग नवा इतिहास चिमूटभर 
ही रचू देणार नाही 
अशी भाषा आहे 
आपलं घरट बांधलेल 
आता मोडायला निघाले  

.....म्हणून हरायचे नाही 
लढायचे लढाई हा आपला 
अंतिम हक्क आपली परीक्षा 
कासवाच्या गतीने चालायचे नाही 
सशासारखे आळशी बनायचे नाही 
आपण चालायचे समुद्रातील झरांसारखे 
आपण चालायचे नदीच्या प्रवाहासारखे      
आपल्याच हसू सोबत 
कारण ह्या वेदना फक्त 
ते हसूच कमी करू शकते 
ही कला आपण शिकलो आहोत 
म्हणून एक निश्चय मनाचा या वळणावर 
या व्यवहारावर आपल्या नशिबावर 
आपल्या पिंजऱ्यातल्या पंखांवर 
आपले घरटे आपण उभे करायचे आहे 
रक्ताने माखू न देता  
पिंजरा तोडायचा आहे 
नवा समाज घडवायचा आहे 

अभिमानाने आनंदाने 
प्रवाहाच्या नवीन दिशेने 
काट्याच्या संगतीने 
यशाच्या पायरीवर 
दिलेल्या पायवाटेवर ती पायवाट 
देऊन गेला आहे 
स्वतःच्या कष्टाने मेहनतीने 
आमचा बाप......(बाबासाहेब)
तोडलेल्या पिंजऱ्याला 
परत उभे करू द्यायचे नाही 
विद्रोहाची भाषा बोलायची 
पण बदललेली प्रवाहामध्ये 
प्रवाहाच्या अंतिम 
प्रवाहासाठी...!!


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-  "प्रवाह"
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

      कविता ही माझ्या मनातील माझ्या विचारमंथनाचे  माझ्या स्वार्थ स्वभावातील दर्शन कवितेत होते. कारण मी संधी साधू झाली आहे. त्यामुळे मला ही बंदिस्त व्यवस्था दिसत नाही.  कोणत्याही दगडावर चढायला तयार आहे.
             ........ पण एक स्वाभिमानी विद्रोही भाषा बोलणारी कवियत्री मात्र अशा कोणत्याही दगडावर चढायला तयार नाही कारण तिचा बाप लिहून गेला आहे," संविधान". संविधानाची भाषा.... माणुसकीची भाषा..... आणि बुद्ध धम्म देऊन..!❤😂
           याच विचारमंथनाच्या जंजाळातून ही कविता साकार झाली.
              आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!
  💕💕💕💕😂धन्यवाद..!!😂 💕💕💕💕

*** जंजाळ ***

गुलामाच्या मर्जीने वागला तर 
तू संधी साधू असे तू 
वेळेच्या चक्रासोबत चालशील 
पण तुझी पिढी अंधारात जाईल 
इतक मात्र मनाचाकप्पात बांधून ठेव 
त्यावेळी प्रहार हा नियतीचा असेल 
त्यावेळी प्रहार हा तुझ्यासारख्या 
हरामखोर संधी साधू मानसिकतेचा 
असेल असे समजू नको 
कारण रेड्याची भाषा समजत नाही 
छळलेला वेदना वेदनेची वेदना 
आम्ही विसरू नाही 
तुला वाटते मी कसा 
डोंगरातल्या वेलीसारखा 
कोणत्याही दगडावर चढेल 
चढत राहील पण 
असे समजू नको 
आकाश ठेंगणे आहे 
विमानात बसल्यावर 
तुझ्यासारख्या संधी साधू लोकांना 
आता काडीचीही किंमत देत नाही 

तू बस फुलांच्या गादीवर 
मऊशार गालीच्यावर पण 
तुझा शेवट तर 
पंचशीलानेच होणार आहे 
हे लक्षात ठेव 
विद्रोहाची भाषा आता बदलली 
फक्त फाटलेले नशीब आमचे नाही 
तर फाटलेले नशीब तुझेही  
जळजळत्या निखाऱ्यावर 
तुलाही जायचे आहे  
मलाही जायचे आहे 
म्हणून ठिगळे लावत बसू नको 
जागोजागी फाटले आहे 
आणि ते आम्हाला दिसत आहे 

प्रस्थापित समाजव्यवस्था बंदिस्त समाजव्यवस्था 
एकटा घरट्यात राहू शकत नाही 
गणिताचा हिशोब शून्य शिवाय होत नाही 
अति फाटलेले कधी शिवता येत नाही 
मोडलेल्या सर्व घरट्यांना 
आता शेणा मातीचे करता येत नाही 
आता आम्ही समजदार झालो आहोत  
आता आमच्या विद्रोहाची भाषा बदललेली    जिंकणारे सर्वच विजेता असे नाही 
हसणाऱ्या चेहऱ्यावर सर्व 
अलबेल असेही नाही 
निमित्त मात्र तू होऊ नको
तुझ्या विध्वंसाचा 
तुझ्या समाजाचा 
कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून 
तुझ्या खांद्यावर जबाबदारी आहे 
कारण आम्ही तुला हक्क दिला आहे 
तिथे बसण्याचा 
म्हणून मुखवटा लावून 
आमची फसवणूक करू नको 

दोष तुझाच असेल 
असे म्हणणार नाही 
कारण जबाबदारी कुणाच्या 
पानात वाढावी हे त्यावेळी 
आम्हाला कळले नाही 
म्हणून धारदार शब्दांच्या 
खोचक शब्दांसोबत 
आता जबाबदारी तुझ्याकडून 
काढून घ्यावीशी वाटते  
माझ्या जुन्या डायरीचे पाने 
अजूनही ताजेतवाने आहे 
तुझ्या सावलीतला प्रत्येक क्षण 
आता आस्वान सोबत ताज आहे 
कारण जखमा कधीच भरला नाही 
तू कधी भरूच दिला नाही 
समाजाचा सहप्रवास आता 
शून्याकडे जाऊ पाहत आहे 
अस पिंजऱ्यातला व्यक्ती सांगतो आहे 
खुणावतो आहे 
पण त्याला माहित आहे  
पिंजरातला व्यक्ती हा कधीही 
काहीही बदलू शकत नाही 
चक्र युगाच्या अग्नीतून 
विद्रोहाचा वर्तुळ पूर्ण झाले आहे 
वर्तुळाला स्पर्श करतात 
तुझ्या पिंजराचा तुझ्या विश्वासातल्या 
त्या प्रत्येक माणसाचा 
जिथे चिखल आहे 

बंदिस्त विचारसरणीचा 
मनुवादी विचारसरणीचा 
पडदा आड चालू असलेल्या 
नाटकाला आता पूर्णविराम द्यावा 
लागेल कारण गळ्याभोवती येऊ पाहत असलेल्या हाताला
त्याच्याही नकळत अडगडीच्या खोली 
निर्जीव वस्तू सारखा जखमान 
सोबत ठेवावा लागेल 
सूटबुटातला माणूस 
आता निर्जीव नाही उगवणाऱ्या 
प्रत्येक आवाज त्यांचा श्वास आहे 
अंधाराच्या गर्दीतून 
नदीच्या शांत प्रवासासारखा 

तो सोबत आहे निश्चय मनाने 
ठाम मनाने म्हणून 
आम्ही घाबरत नाही 
कोणत्याही  जंजाळाला 
कोणत्याही दगडाला 
कोणत्याही अंगात आलेल्या 
अस्तित्वहीन प्रश्नांना 
कुठलाही विटंबळेला 
कुठल्याही बाटलबंदव्यवस्थेला 
आम्ही ओव्या गातो माणुसकीच्या 
आमचा जंजाळ माणुसकीचा 
उगवत्या ताऱ्यांसोबत 
उगवत्या सूर्यासोबत 
आमचा जंजाळ माणुसकी पळविलेल्या 
त्या प्रत्येक किनाऱ्यासोबत 
जिथे ओरडतो माणुसकीची हाक 
येते म्हणून शोधत नाही 
सुटा बुटातला माणूस पडदाआड
असलेल्या व्यवस्थेकडे 

जखडून ठेवत नाही स्वतःचे 
स्वातंत्र्य जपून ठेवत नाही 
आठवणींच्या जखमा 
जकडून ठेवत नाही 
अडगडीत पडलेल्या त्या रस्त्याला 
कारण आम्ही त्या जंजाळातून 
विद्रोही भाषेने शिक्षणाने बाहेर आलो 
म्हणून चपलीची किंमत नसलेल्या 
संधी साधू आमच्याच लोकांना 
आम्ही अडगडीत ठेवत आहोत 
कारण त्याच्याही शेवटच्या प्रवासाला पंचशीलाचीच तरतूत झाली आहे 
त्याने कितीही पोसले चले असेल 
तरी बेंबीच्या देठापासून आम्ही 
त्या जंजाळाचे भक्त नाही 
आमचा जंजाळ फक्त  
आमचा विद्रोह आहे 
शूरवीरांच्या 
थेंब विद्रोहाचा संपला 
पण त्याला  जंजाळच्या 
भाषेत उत्तर देणार आहोत 
वादळापूर्वीची शांतता म्हणू नका 
क्रांतीची भाषा 
आमचा बाप लिहून  गेला  
उज्वलभविष्याचे रंगमंच सजवून 
जंजाळाला बंदिस्त भाषेत 
बंद करून गेला !!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :- जंजाळ
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------
सुरुवातीपासूनच कवितेचा सुरा आक्रमक प्रवृत्तीचा आहे. बेधडक शब्दांची शब्दरचना आहे. ठळकपणे सांगायचे तर भाकर ही पोटाची भूक भागविते पण भाकरीसाठी सर्व काही चालू असते हा इतिहास आहे.
        टिचभर पोटासाठी अहंकाराच्या त्या उद्रेकालाही सहन करावे लागते कारण जीवन जगण्यासाठी भाकर महत्त्वाची आहे. ही भाकर फक्त पोट भरण्यापूर्तीच नाही तर या कवितेत भाकर हा शब्द विषमतेविरुद्ध समानतेची भाकर जगण्याची भाकर या संवेदनेतून आलेली आहे.        " मोकळा श्वासाची हळहळ म्हणजे भाकर खुल्या मोकळ्या प्रश्नांना विचारण्याची आत्मा स्वाभिमान म्हणजे भाकर."याच भावविश्वातून याच विचार मंथनातून ही कविता. सरळ साध्या शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न काही चुका असल्यास नक्की कळवा.
           आवडलास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या सुधारल्या जातील, त्यावर संशोधन केल्या जाईल.

❤❤❤ धन्यवाद❤❤❤

**** भाकर ****

खरतर भाकर पोटाची भूक 
भागवीते पण आता भाकरी 
पळवण्याची शर्यत लागली आहे 
आरपार सगळ्यांच्या 
कुणी ना कुणी पळवीत आहे 
कायमस्वरूपी पळवता येईल 
या हिशोबाने  

सहन करायचे सोडले तर 
कुठे कुणाच काही अडत नाही 
आग पोटाची काही थांबत नाही  
भ्याड संस्कृतीची पेरलेल्या नशिबाची 
शिव्या शाप देणाऱ्या चेहऱ्याची 
भाकरी माझी आहे 
हुकूमशाहीची नाही 
लढा- चिंतन माझा आहे 
दहशतवाद पुन्हा चालू आहे 
उद्याच्या दिवसाची खिडकी 
पोटभर भाकरीने पूर्ण होईल 
या आशावादाने 

मी जतन करत आहोत 
तो सर्व खेळ जो परंपरेने जतन केला 
पोटाची वेदना शमविण्यासाठी 
दगडाची आवश्यकता नाही 
मानवाच्या छताला सोन्याचा कळसाची 
गरज नाही वास्तविक विचार 
पोटभर भाकरी देते 
तुटलेल्या मनालाही 
समाधानी मनालाही 
ऊन सावलीच्या खेळातही

क्रांतीची मशाल पेटवत आहे 
समानतेच्या भाकरीला 
सांस्कृतिक चिखलात 
भाकरीला काही महत्त्व नाही 
परंपरेच्या चिखलात 
भाकरीला काहीही महत्त्व नाही 
प्रसादाच्या चिमूटभर साखरेला 
अध्यात्माच्या रंगात 
काही महत्त्व नाही 

डोळे मिटावे तशी भाकर डोळा समोर 
ते भुकेल्या पोटाला 
पण नुसत्या भाकरीने पोट भरत नाही 
नुसत्या भाकरीने जगता येत नाही 
नितांत कष्ट करून कमवावी लागते 
भाकर वनवासही निराशेच्या गर्दीत 
किंचाळी मात्र भाकरीसाठीच  
उपेक्षित पोटाला 
भुकेला आसुसलेल्या मनाला 
पेटलेल्या वस्त्या भाकरी शोधत नाही    अस्तित्वाचा खेळात  
नुसत्या भाकरीने पोट भरत नाही 
भाकर देण्यासाठी 
भाडखायांनो हरामखोरांनो  
रूढीचा अडगळीत बाजार मांडता 
विजलेल्या भाकरीला 
पाण्यात बुडवून 
मुक्त विचारांची नव्याराखेवर 
चारचौघात 
विषमतेची भाषा करतात 
उध्वस्त सांस्कृतिक परंपरेची 
प्रगतीची वाट संपवण्याची  

पण एक लक्षात ठेवा 
भाकरी प्रत्येकांची वेगवेगळी  
विद्रोहाची भाकरी क्रांतीची 
ललकारीची 
सुटलेल्या तोडलेल्या चळवळीला 
पेटायला वेळ लागणार नाही 
कारण चळवळ अजून शांत आहे 
तक्रार तेव्हा करू नका  
आम्ही आमच्या भाकरीसाठी परत 
निळा झेंडाची रांगोळी काढणार आहोत 
काढत आहोत 
जगल्याशिवाय पेटल्याशिवाय 
भाकरी मिळत नाही हे सत्य आता 
एका क्रांतीने एका विद्रोहने 
आमच्यापर्यंत आले 
म्हणून भाकरी हा माझा हक्क  
माझा अधिकार आहे 

भाकरी हे माझे जीवन आहे 
वास्तवतेच्या जगामध्ये व्यर्थ विचारांना 
भाकरी विचारत नाही 
कारण परतीची कोणतीच मातीची 
वाट खुली ठेवली नाही 
भाकरी अजून जिवंत आहे 
परिवर्तनाची क्रांतीची 
समानतेची स्वातंत्र्याची 
नव्या संस्कृतीची 
आधुनिकतेची 
विकासाची 
सांस्कृतिक परंपरेची 
भाकरी अजूनही आमच्या सोबत  
पुस्तकाच्या साक्षीने  
क्रांती नसलेल्या चळवळीसोबत 
मुक्त विचारांच्या 
नव्या स्फोटक विचारांसोबत 
भाकरी अजून ही जीवंत आहे

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कवितेचे शीर्षक :-  "भाकर"
काव्यसंग्रह :-  " थेंब विद्रोहाचा "
               संपला आहे माझ्यातला

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------


 
 






--------------------------------------------------------------------------








-------------------------------------

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!💕 धन्यवाद !!!!!💕💕😂

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        ब्लॉग हे माझे शब्दाचे घर आहे. शब्दाने पेरलेले नवीन मायमाऊली आहे. मला सुचल पचेल पटेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे.
          शब्द उंबरठ्यापर्यंत आपण आला आहात तर इथे समाधान व तुमच्या मनातल्या असंख्य वेदना व्यथा विचार मनातील शब्द भावनेला शब्द मिळते. विद्रोहा माझ्या रक्तात आहे पण तो आता संपला आहे, अस वाटून जाते.
        कारण आता परिस्थिती बदलत आहे कालपरतवे परिस्थिती बदलते हे मी मान्य करणारी आहे; तरीही मला डोळसपणे जाणवलेल्या भावना किंवा प्रसंग मी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला. माझ्यातला विद्रोह बदलला असला तरी भावना मात्र त्याचा आहे. गोड गोड - कडू दोन्हीही भावना शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
        मनातल्या विचारांना शब्द भावनेत गुंफलेले आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.....💕💕!!



==========================================================















शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

अशांत वाटेवरची वाटाघाटी ( विद्रोही कविता)

         एक स्त्री म्हणून आलेला वाईट अनुभव तिच्यासोबत आहे पण तिचा प्रियकर त्या अनुभवातून तिला शांत करण्यासाठी आपल्या पद्धतीने तिला समजावून सांगण्याच्या सर्वस्वी प्रयत्न करतो. 
       तो विद्रोही नाही तो शांत आहे त्यावेळी तिला तो कसा दिसला की एक विद्रोही स्त्री विद्रोही भाषा बोलणारी हमरी तुमरी वर जाणारी  एक प्रियसी या कवितेत सांगत आहे.                      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत आणि स्वरचित आहे.
        काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या सुधारल्या जातील. धन्यवाद.....!!💕

     *** अशांत वाटेवरची वाटाघाटी ***

मी शांत होते 
त्याच्या भाषेची लय बघून 
डाळिंबासारखे लाल झालेले डोळे 
रंग बदलत चाललेला चेहरा 

तरी मी शांत होते 
भाषेची अनोळखी पद्धती 
तोडमोड करत होता 
हाताने हातवारे करीत होता 
संपूर्ण चेहराच बदललेला 
पांढराशुभ्र आता पिवळाभर 
दिसत होता 

मी शांतच होते 
त्यांनी माझा हात हाताने घट्ट पकडत 
हात माझ्या चेहऱ्याकडे नेत 
भाडीत गेला तुझा स्वभावातला 
विद्रोह... स्त्री आहे ..!?
एवढाच का तो शब्द 

तरी ही शांत होते 
मनातला आक्रोश 
शब्दात येत राहिला 
चळवळीची दिशा सांगत राहिला 
शांततेचे महत्व पटवत राहिला 
अशांत होऊन....
प्रेमाने मिठीत घेत 
जाऊ दे ना 
त्याला माहीत नाही 
ही समाजव्यवस्था 
इथल्या पद्धती इथली संस्कृती 
त्याला फक्त माहित आहे 
स्त्री .....
जन्माने भोगवस्तू असलेली 

मी शांतच 
त्याचा हात घट्ट पकडून 
तो ( व्यक्ती)जाऊ नये म्हणून 
आणि तो मला मिठीत घेऊन 
मी अशांत होऊ नये म्हणून 
पण ती घट्ट मिठी शांत करू 
शकली नाही 
मनातील आक्रोशाचा 
विद्रोह स्त्री...
म्हणणाऱ्याच्या तोंडावर 
मात्र विद्रोहाचे निशाण होते 
शांत होऊन 
शांततेच्या वाटाघाटीत...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------
        A bad experience as a woman is with her but her boyfriend tries his best to explain it to her in his own way to calm her down from that experience.
       He is not a rebel he is calm at that time how she saw him as a rebel woman speaking a rebel language Hamri Tumari going on Ek Priasi says in the poem.  Don't forget to like and share if you like.  The poem is autographed and composed.
       If you find any mistakes, please let us know in the comment box and they will be corrected.  Thank you.....!!💕

 *** Negotiations on a bumpy road ***

 I was calm
 By looking at the rhythm of his language
 Red eyes like pomegranates
 A discolored face

 I was calm though
 Unfamiliar patterns of language
 was destroying
 He was making hand gestures
 The whole face has changed
 White now yellow
 was seen

 I was quiet
 He held my hand tightly
 Hands leading to my face
 Your nature is gone
 Rebellion... is a woman ..!?
 That's all the word

 It was quiet though
 An outcry in the mind
 The word kept coming
 He continued to tell the direction of the movement
 The importance of peace continued to be emphasized
 Disturbed...
 embracing with love
 let go
 He doesn't know
 This social system
 Here's the way, here's the culture
 He just knows
 woman.....
 Possessive by birth

 I'm quiet
 Holding his hand tightly
 So that he (person) does not go
 And he hugged me
 That I may not be disturbed
 But let's calm that tight hug
 could not
 An outcry in the mind
 rebel woman...
 In the face of the speaker
 But there were signs of rebellion
 Calm down
 In peace negotiations...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कविता त्यांचे विचार,विद्रोही साहित्य आणि कविता, भीम जयंती, भीम उत्सव, भीम जलसा, भीम गीते, १४ एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस,

Poems of Dr. Babasaheb Ambedkar His Thoughts, Revolutionary Literature and Poetry, Bhim Jayanti, Bhim Utsav, Bhim Jalsa, Bhim Geeta, 14th April, Birthday of Dr. Babasaheb Ambedkar,


--------------------------------------------------------------------------


गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

पिंजरा (विद्रोही कविता)

          समकालीन वास्तविकतेवर ही कविता आधारित आहे. हातात धागेदोरे बांधून काही होत नाही,तर स्वातंत्र्य पिंजरा विचारांचा असावा.
     शाहू फुले आंबेडकर यांच्या चळवळीमुळे आम्ही मुक्त झाला आहोत. विकल्या गेलेल्या फालतू मानसिकते मुळे पिंजरा परत आपल्या वाटेला येईल का...?
          याच भाव संवेदनेतून या कवितेचा जन्म झाला आहे. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!
       धन्यवाद.....!!💕

**** पिंजरा ****

गगन भरारीला पिंजरात कैद 
कसे करू पाहता 
समानतेच्या गगनात 
असंतोषाचे वारे का वाहतात 

अंधश्रद्धेच्या माणसाला 
खुल्या बाजाराची पायवाट का 
दाखविता आधुनिकतेच्या युगात का 
रुजविता नवीन पिंजऱ्याची संस्कृती 

फुंकर लढण्यासाठी द्यावी 
पिंजऱ्यातील कैदेसाठी नाही 
धागा दोरांच्या बंधनासाठी नाही 
तर मानवतेच्या संरक्षणासाठी द्यावी 
सुटा बुटातला माणूस 
फाटक्या मानसिकतेच्या पिंजरात का 
कैद करावे 

जुन्या रूढी परंपरेतील पिंजरापेक्षा 
नक्की तू ज्ञानाच्या उजेडाचा 
आक्रोश घेत स्वाभिमानाच्या 
पिंजरात विणावे, 
नवीन पिंजरांच्या विणा 

स्वातंत्र्याच्या लाटेवर 
उबदार स्वप्नाचे भविष्य 
गगन भरारीला 
स्वकवेत घेण्यासाठी 
विशाल बाहुबलीत 

पिंजरा नको आहे विद्रोहाला 
पिंजऱ्यातला विद्रोह 
शांत झाला आहे 
शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीने 
कारण कालचा गुलाम 
आज स्वातंत्र्य झाला आहे 
उजेडातील प्रकाशाने....!!💕

    ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

         This poem is based on contemporary reality.  Nothing happens by tying hands with ropes, but freedom should be a cage of thoughts.
     We are freed by the movement of Shahu Phule Ambedkar.  Will the cage swing back its way because of the sell-out mentality...?
         This poem is born out of this sentiment.  The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.  If there are any mistakes please let me know in the comment box...!!
 Thank you.....!!💕

**** cage ****

 Gagan Bharari imprisoned in a cage
 See how to do it
 In the sky of equality
 Why do the winds of discontent blow?

 A superstitious man
 Why open market trail?
 Show why in the age of modernity
 Established new cage culture

 Blow to fight
 Not for cage confinement
 Thread is not for tying ropes
 So it should be given for the protection of humanity
 The man in the loose shoe
 Why in the cage of a broken mentality
 Imprison

 Rather than the old traditional cage
 Surely you are the light of knowledge
 Self-esteem by crying
 weave in a cage,
 Weaving of new cages

 On the wave of freedom
 Warm dream future
 Gagan Bharari
 To take a selfie
 Vishal Bahubali

 Rebellion does not need a cage
 Mutiny in the cage
 has calmed down
 Shahu Phule Ambedkar's movement
 Because yesterday's slave
 Today is freedom
 By the light in the light...!!💕


✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
            The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------




माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...