savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

दहशत#

*** दहशत ***

शेवटी मरणारा तर माणूसच होता 
 मारणारही माणूसच होता
मग इथे जिंकलेल कोण आहे 
मरणारा वापस येणार नाही  
मारणार जिवंत राहणार नाही 
इतक सर्व माहीत असताना सुद्धा 
मारणारा मात्र आनंदाने जगत असतो 
तो असुरी आनंदच 
अशा हमलांना पाठबळ देत असते 
शून्य करणारी ही घटना न घडावी
हीच इच्छा 
कालपरवा आजूबाजूंनी घडली 
आज सीमेवर घडली 
उद्या परत कुठेतरी घडेल 
परवा परत कुठेतरी घडेल
 हे चक्र हेच हे वर्तुळ चालू राहील 
याला पूर्णविराम म्हणजे मानवता 
शांतीचा संदेश देणारे बुद्ध 
बुद्धाची शिकवण या भूमीत आहे 
त्या  भूमीत वर्तुळ थांबत नाही 
म्हणून आता आपल्याला 
युद्ध नको बुद्ध हवे...❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

दिसलास म्हणून

*** दिसलास म्हणून ***

आज काय लिहावे 
संबोधन कळलेच नाही 
काल-परवापर्यंत My love म्हणून 
चालू होणारा मेसेज 
आज कोणत्या शब्दाने लिहावे 
कळलच नाही 💔

आज सर्व मेसेज डिलीट झाले 
save save as केलेल्या सगळ्याच 
files delete झाल्या 
mobile computer Tap gift ग्रीटिंग्स 
तू दिलेले सर्व गिफ्ट ..😀
जे माझ्या पैशाने घेऊन दिले होते
पण खरच 
आठवणी या प्रवासातल्या  delete झाल्या 
असतील ??मनात 

मनात माझ्याकडून तर हो उत्तर आहे 
पण खरंच मनाच्या आतल्या आत 
त्या कप्प्यात त्या आठवणी साचल्या नसेल 
पण हे सांगून तुला काही फायदा नाही
परत जुन्या आठवणींचा पसारा 
आता नको आहे 

तू दिसलास आज फेसबुक वर 
सहज चाळता चाळता 
तू तसाच आहे निरागस डोळ्याचा
 हसऱ्या ओठांचा पण आतल्या मनातल्या 
आत असलेला माणूस खरच असा आहे 
का ?हा प्रश्न पडला म्हणून 
लिहाव म्हटल एखादी मेसेज 

 तर संबोधनच नाही अधिकाऱ्याची भाषा 
आता त्या शब्दातच नाही
 म्हणून बरं झालं त्याच वळणावर 
सोडून दिले खोट्याच्या बाजारात 
सत्याची किंमत राहत नाही 
हे परत एकदा सांगून गेला 
जगाची एक तरी भाषा
मला समजून गेला एक 
अनुभव देऊन गेला 

समोरील सावरण्यासाठी 
सांभाळण्यासाठी त्यासाठी
Thank you ...!!❤
म्हणून तू एक चांगला माणूस आहेस 
हे मात्र ठरवू नको

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================
 
सोमवार, २१ एप्रिल, २०२५

तुझा तू माझी मी

*** तुझा तू माझी मी ***

तुझ - माझ असण हे काही वेगळे नाही 
मी त्याच समुद्राच्या काठी उभी आहे 
तिथे तू कधीतरी उभा असायचा 
हातात वाळूची ओलीक्षार वाळू घेऊन 
नारळाच्या उंच उंच झाडायला बघत 

हातात पुस्तकांचा वजन नाही आता 
आता मोकळी झाली आहे माहित नाही 
कशी, पण झाली आहे मोकळी 
तुला हवी होती तशीच 
बघ न, समुद्राची लाट 
पायापर्यंत येऊन गेली 

 सांभाळला मात्र तू नाही 
आज तर एक वेगळीच गोष्ट झाली 
किनाऱ्यावर माणसांचा पायाच्या आकृत्या 
कमीच आहे फेरीवाले ही नाही 
अस आता नेहमी नेहमी होत आहे 
माझ्याबरोबर माहित नाही का 

आता माणसाची वर्दळ आवडत नाही 
 येण्याची वेळच बदलली आहे 
तुझ-माझ करता करता 
घर मात्र रिकामा झाल 
तुझ-माझ करता करता 
तू मात्र मोकळा झालास 

पण मी गुंतले तिथेच 
त्या मोकळ्या जागेत 
आता तू दिलेले पैंजण फेकून दिले आहे 
पाण्यात सोबत आठवणी ही 
दूर कुठेतरी फिरायला म्हणून 
तुझ - माझ करता करता आठवणी 
मात्र गोळाच आहे 
कधी चांगला कधी खूपच चांगला 
कधीतरी इतक्या आठवणी असतात 
 
त्यात मात्र मी आणि तू 
माझी मी तुझा तू झालास 
तुझा तू माझी मी झालो...!!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...