savitalote2021@bolgger.com

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

प्रश्न

प्रश्न 
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे राहतात 
आवासून...

वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जात
प्रश्न चिन्हांची साखळी 
आवासून...

अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार  
गुरफटून टाकतात
आवासून...

मानगुटीला 
प्रश्न चिन्हांची शांत जळत 
असलेली सहवेदना 
सूर्यास्त सूर्योदयाच्या 
पहिल्या किरणांच्या
उत्तर साखळीने

       सविता तुकाराम लोटे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...