फुलांचे सामर्थ्य अनुभवासाठी फुलच व्हावे लागत नाही तर त्यासाठी फुलाची कोमलता आणि त्यांच्या सारखेच जडत्व सुद्धा घ्यावी लागते ते जसा स्त्रियांच्या केसातील सौंदर्य वाढविते तसाच ते मंदिरातील देवत्वाचे देवपण म्हणजे जगातील कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही घटनेसाठी वापरू शकतो
फुलांमध्ये सुगंधीपणा असतो पण ते त्यापासून दूर राहू शकत नाही त्याच्या त्या सुगंधी सौंदर्यावर आपले सौंदर्य फुल होते त्याच्या सौंदर्यावर आपले मन टवटवीत होते हसरे होते पाऊल प्रत्येक क्षणी सुगंधी होते
कुठे ती मनाला फिरू देत नाही त्यांना आपल्या जवळी असलेले सर्व चांगल्या गोष्टी देऊन जाते आणि काट्यांचे घाव स्वतःजवळ ठेवतात जखमा स्वजवळ ठेवून चेहर्यावर हसु देऊन जातो . आपले आयुष्य दुसऱ्याला आनंदी देण्यासाठी असावे त्याला पाहतांना थोडे सामर्थ्य आपण आपल्याजवळ सुद्धा निर्माण करावे पण जखमांना दुर करीत फुलांसारखे मनात सामर्थ्य निर्माण करून वादळातही काट्यांना दूर करीत सत्याच्या गणितावर चालत.
आपल्यातील सामर्थ्य आपल्यातील फुल्लत्व आपल्यातील नाजूकपणा काट्यांना मागे सारत इतरांच्या नाजूक शब्द साखळी ने निर्माण करीत.
फुलांची कोमलता अनुभवावी
सत्याच्या गणितावर आणि
स्वतःच्या नाजूक शब्द सामर्थ्यांने
फुलांची सामर्थ्य अनुभवण्यासाठीच !
सविता तुकाराम लोटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा