**** संस्कार फक्त माझे *****
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नुसार समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांचे व्यक्ती राहतात. जीवन म्हटले की कुठे कमी कुठे जास्त कुठे परिस्थितीमुळे तर कुठे न मिळालेल्या पोषक वातावरणामुळे कधी जबाबदारी मुळे माणूस कुठेतरी वेळेच्या मागे पडत जातो आणि मग चालू होतो नशिबाचा खेळ..
नशीब नशीब म्हणून हिणवणारे आपलीच आजूबाजूची परिस्थिती व्यक्ती मनावर जखमा करत राहतात पण या सर्व परिस्थितीत स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळून जी व्यक्ती आज या वेळेला आत्मविश्वास आणि उभी राहते त्या व्यक्तीचे मनोबळ तोडण्याचा प्रयत्न करता.
त्यावेळी सहज मनात प्रश्न येऊन जातो चांगल्या संस्कारांचे आणि चांगल्या मनाच्या चांगलं भाषेच्या आणि विशेषता एक व्यक्ती म्हणून जगताना ज्या जबाबदाऱ्या त्यावेळी त्याने निभावलेल्या असतात.
त्या सर्वांचा काय कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जबाबदाऱ्या झटकू शकत नाही त्या व्यक्तीच्या मनातील त्यांच्या भावविश्वातील भावनेवर लिहिला गेलेला आहे काही चुकलं नक्की सांगा कारण मी संस्कार सांगाव इतकी मोठी नाही आणि इतकी लहान ही नाही लेख आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करायला विसरु नका आपला अभिप्राय म्हणजे तुमच्या येण्याची पोचपावती आहे अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद..!!
*****///*/*************
जगण्याचे सर्व प्रश्न हे नशीब असेल तर
चांगले संस्कार ...चांगले मन...
चांगल्या रूढी प्रथा परंपरा...
यांच काय ?????
1. संस्कार फक्त माझे
जगण्याचे सर्व प्रश्न हे नशीब असेल तर
चांगले संस्कार ...चांगले मन...
चांगल्या रूढी प्रथा परंपरा...
यांच काय ?????
संस्कार हे जन्माने मिळतात काही संस्कार स्वतः स्वतःवर करावे लागतात पण खरंच आपण त्या संस्कारांना आत्मसात करतो का.. संस्कार आत्मसात करणे हे माणूस म्हणून जगण्याचे एक अभूतपूर्व संस्कार आहे. जागतिक माहितीच्या या महा जाळ्यामध्ये माणूस हरवत चालला आहे का हा प्रश्न सतत विचारला जातो पण माणूस खरंच हरवत चालला आहे का? या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही.
मिळाले तर नक्की सांगा..!! कारण या प्रश्नत माणूस हरवत आहे का यापेक्षा माणूस संस्कार विसरत आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरांची जास्त आज गरज आहे. स्वार्थीपणा हा माणसाचा संस्कार असू शकत नाही कारण स्वार्थीपणा हा माणसाचा स्वार्थी संस्कारांचा नव्हे तर आधीच्या पिढीने दिलेल्या संस्काराचा गणिताची गोळाबेरीज असते.
प्राचीन काळापासून संस्कार ही आपली जमेची बाजू आहे. आधुनिक परिस्थितीनुसार आपण त्यात बदल करीत आहोत आणि करत राहणार आहोत कारण परिवर्तन हा जगण्याचा मार्ग आहे. परिवर्तन जगण्यासाठी नव्हे तर जगात स्वतःला आत्मविश्वासाने उभे राहणे.
संस्काराची भाषा करावी किंवा व्याख्या करावी इतकी मोठी नाही तरीपण संस्कार या विषयावर लिहिताना खरच मी एक माणूस म्हणून जगत आहे का या प्रश्नाचे उत्तर मला नेहमी सकारात्मक मिळते नकारात्मकतेची चाहूल सतत आजूबाजूला असली तरी सकारात्मकता ही नेहमी मनाला बळ देते संस्कार हे या सकारात्मक तेतून मिळत असावे.
सकारात्मकता नेहमीच सकाळचा सूर्य टवटवीत फुले गळलेला परिजात फुललेली रात्र सुगंधीत झालेला परिसर आणि आजूबाजूने असलेली हिरवळ याच सकारात्मक तेतून न मनात निर्माण होत असावी... कारण संस्कार कितीही चांगले असले तरी नकारात्मक हे नेहमीच वरचढ होत असते.
काही क्षणांसाठी पण निसर्ग नियम हा प्रत्येकानंच लागू आहे. पानगळ झाले की नवीन पालवी येणारच आणि नवनिर्मितीची चाहूल लागणारच. संस्कार हे असेच असावे नकारात्मकतेचे पानगळ झाली की संस्कारा ची नवनिर्मिती आपल्यामध्ये होत असते.
मनाला आत्मविश्वासाने उभे
करणारे संस्कार
आत्मविश्वासाने शब्द निर्माण
करणारे संस्कार
संस्काराची शिदोरी म्हणजे
माणुसकी...!!!
2. संस्कार समजूतदारपणाची फक्त माझे*
संस्कार शब्दांचे म्हणतात मनाचा आत्मविश्वासा नेहमीच जगण्याच्या या खडतर प्रवासात साथ देत असतो आजूबाजूची परिस्थिती आणि आपले मन त्यांच्यामध्ये चांगल्याप्रकारे सांगड घालत असल्यास कोणत्याही संकटांना प्रश्नांना आस समस्यांना सामोरे जाता येते पण खरंच त्यांना सामोरे जाताना चांगले संस्कार नेहमीच त्मविश्वास कमी करत असतो का आकाशात चिमणीचा चिवचिवाट आणि झाडावर बसलेल्या कोकिळेचा आवाज यामध्ये काय फरक असावा हे आपल्या सर्वांना माहित आहे.
चिमणीचा चिवचिवाट मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो कोकिळेचे स्वर मनाला सुखद आनंद देऊन जातो दोन्ही आवाजच दोघांचे आवाजावर झालेले संस्कार वेगळे हे दोन आवाज वेगवेगळे असतील तर दोन व्यक्ती सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि वेगवेगळ्या शब्दांना घेऊन जगत असतात तरीपण आपण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस सारखा वागावं अशी माफक कल्पना अपेक्षा आणि जगण्याच्या या खडतर प्रवासात असावा असे वाटते पण खरंच असे होते का चांगले संस्कार नेहमीच्या या वाटेवर जात असतात.
समजूतदारपणा व्यक्तीचा सर्वात सुंदर संस्कार आहे असे मला वाटते कारण समजूतदारपणा मुळे आपल्या अपेक्षा कमी असतात आपल्या कल्पना कमी असतात आणि आपला जगण्याच्या माफक संकल्पना कमी असतात तरीपण हा समजूतदारपणा जर कमकुवतपणा होत असेल तर या समजूतदारपणा च्या संस्काराला आपण कुठे थांबायचे का याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीने स्वतः स्वतःच्या मनाला प्रश्न करुन योग्य वेगळच करावा समजूतदारपणा थोडासा बाजूला ठेवून आपण आपल्यावर केलेल्या संस्कारांच्या जोरावर निर्णय घ्यावा
समजूतदारपणाची ओंजळ किती दिवस घ्यायचे हे प्रत्येक व्यक्तीला समजले पाहिजे समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणून त्या समस्येचे भांडवल कोणी करत असेल तर समजुतदारपणाने समजून सांगावे कारण ते आपले संस्कार आहे पण संस्कार संस्कार म्हणून किती दिवस त्याला गुंडाळुन बसायचे हेच कळत नाही मनाचा निर्धार करून आपण त्याला सामोर जावे असे सतत वाटत असले तरी चांगले संस्कार जाऊद्या च्या भूमिकेत असतात
ओंजळ संस्काराची ओंजळ कर्तव्याचे ओंजळ जबाबदारीची पण या सर्व ओंजळी मध्ये किती संस्काराचे पाणी ओतायचे हे आपल्यालाच कळले तर किती बरं होईल चांगले संस्कार हेच कळू देत नाही संस्काराची पानगळ प्रत्येक वेळी समजुतदारपणाने होऊन जाते.
मुसळधार पाऊस येऊन जातो नयनात प्रत्येक वेळी एकच प्रश्न मनाला पडतो बुद्धीला पडतो शब्दांना पडतो हा पावसाळा आपल्याच वाट्याला का प्रत्येक व्यक्तीला नाही तर प्रत्येक संस्कारित व्यक्तीला हा प्रश्न पडत असावा मी शब्दांत बरोबर जगण्याचा प्रयत्न करते काहीतरी चांगला मांडण्याचा प्रयत्न करते माझे शब्द संस्कार चांगल्या संस्कारांचे पायामुळे घट्ट बांधून ठेवते माझ्या शब्दांना माझ्या विचारांना कोणत्याही अशा शब्दात मांडू देत नाही कारण शब्द हे शस्त्र आहे ...!!!!!
3. संस्कार प्रेमाचे फक्त माझे"
आजकाल तुझ्याकडे शब्द जास्त
हसविल्यासारखे करताना कधी
निशब्द करून जातो... प्रेम संस्कारांना
संस्कार शब्दही नेहमीच मनाला आत्मविश्वास निर्माण करून देत असता शब्द संस्कार हे एका शस्त्र सारखे आहे ते वापरले तर कुणी आत्मविश्वासाने कोणत्याही समस्यांना समोर जात तर कधी हे शब्द आत्मविश्वास नष्ट करतात; नेहमी असे वाटत राहते. शब्द ही लेखणी पेक्षाही धारदार आहे.
लिहिताना लेखणी कुठेतरी पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम देत जाते. बोलत असलेले शब्द कुठेही पूर्णविराम स्वल्पविराम.... घेत नाही आणि इथेच घात होतो मग ते प्रेमळ शब्द असोत की नकारात्मक शब्द असो घात तर होणारच...!!!
जीवनात प्रकाश असतो... अशक्य असे काहीच नाही तरी पण काही वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्याही नकळत आयुष्यात घडून जातात... घडत असतात. अशावेळी अबोल शब्द बळ देण्याचे काम करतात. सहनशीलता म्हणजे काय ??या प्रश्नाचे उत्तर अशावेळी मिळतात. आयुष्यात रुसवे-फुगवे खूप असतात पण ते का असतात? हे माहीतच नसते.
शब्द मौन होतात अशा वेळी..!! मुके झालेले शब्द आणि मुके झालेल्या भावना सोबत अंतरीचे भाव दिव्यासारखे जळत... हळुवारपणे,अंधारात. प्रेम हा शब्द खूप पवित्र आहे. तरीपण या शब्दाचा उपयोग करून काही लोक त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात.
संस्कारांची भाषा करावी की नाही हे कळतच नाही तरीही मनात आलेले शब्द हे कागदावर उतरवावे असे सतत वाटुन जाते. संस्कार संस्कार म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तरही कधी मिळाले नाही कारण प्रत्येकांच्या घरातले संस्कार हे वेगवेगळे असते. अनुभवाने आलेले संस्कार वेगवेगळे असतात. व्यक्तिपरत्वे संस्कार वेगळे असतात. आधुनिक सामाजिक सहरचने नुसार संस्कार वेगवेगळे असतात.
संस्कार आनंदाचे ...संस्कार दुःखांचे... संस्कार प्रेमभावनेचे... प्रेमाची व्याख्या करणे कठीण आहे त्याही पेक्षा कठीण आहे संस्कार प्रेमाची व्याख्या करणे. कारण प्रेम हे जरी दाखविण्याची गोष्ट असली तरी ती न दाखविता ही अनुभवता येते... करता येते. पण प्रेम या भावनेवर काही लोक स्वतःच्या स्वार्थी महत्वकांक्षा पूर्ण करून घेतात आणि त्या करता करता इतका समोर निघून जातात की त्यांना कळतच नाही. आपल्या आजूबाजूला असलेले व्यक्तींवर याचा काय परिणाम होत असते. फक्त स्वतः स्वतः आणि स्वतः प्रेम फक्त स्वतःवर प्रेम फक्त स्वार्थ वर स्वतःच्या प्रेम फक्त संपत्तीवर प्रेम फक्त स्वतःच्या आनंदावर प्रेम फक्त इतरांना दुःख देणार या शब्दांवर प्रेम फक्त स्वतःच्या स्वार्थी विचारांवर अशा प्रेमसंस्कारांना काय उपमा द्यावे कळत नाही.
कारण व्यक्तिपरत्वे प्रेम संस्कार वेगवेगळे असतात. असे जरी म्हटले तरी पण व्यक्तीमध्ये या भावना निर्माण होतात कशासाठी निर्माण होतात.आपले संस्कार इतके कमकुवत का होतात? आपले संस्कार प्राचीन काळापासून चालत आलेले आणि स्वातंत्र्यानंतर मिळालेले एक नवीन संस्कार ते म्हणजे संविधान तरीही व्यक्ती त्या संस्काराचा उपयोग फक्त स्वतःपुरता करतो का?
निसर्गाने सर्वांना एकच नियम दिला आहे. संविधानाने सर्वाना एकच नियम दिला आहे. प्राचीन संस्कृतीने रूढी प्रथा परंपरेने एकच नियम दिलेला आहे. प्रेमभावना ही अशीच आहे ती क्षणात निर्माण होते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम निर्माण होणे नैसर्गिक भावना असते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम असते ती व्यक्ती जर मनात काहीतरी स्वार्थी भावना ठेवून प्रेम करत असेल तर काही दिवस सहज शक्य होते पण ती निरंतर चालणारी प्रक्रिया नाही... ते कधी तरी सामोरे येणारच आणि मनात निर्माण झालेले प्रेम संस्कार क्षणात विरून जाणार!!
फक्त त्या नात्याला ओढाताण सहन करावी लागते. मानसिक धक्का बसतो. तो वेगळाच आणि आपण फसवले गेलो आहोत याचं दुःख निराळेच..! पण हे माहीत होण्याकरिता खूप वेळ निघून गेलेला असतो. खूप स्वप्न निघून गेलेली असताना. खूप व्यक्तींचे आयुष्य त्यामुळे थांबले जातात.खूप क्षणांचा हिशोब त्या व्यक्तीला कधीच देता येत नाही.
कारण त्याच्या त्या क्षणाच्या प्रेमाने खूप काही व्यक्तींचे आयुष्य त्या क्षणापासून थांबलेले असतात. खूप काही व्यक्तींचे स्वप्न धूळखात बसतात फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे आंधळ्या प्रेमाच्या मागे लागल्यामुळे त्यालाही कुठे माहीत असते.
आपले प्रेम हे वापरून घेतले जात आहे...फक्त स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी हे सत्य समोर येईल तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. म्हणुन प्रेम संस्कार हे अशा कोणत्याही क्षणासाठी बांधून ठेवू नका.
आयुष्य हे खूप खडतर प्रवासात जात असते. समोरचा क्षण काय घेऊन येईल हे कोणत्याही व्यक्तीला माहित नसते. कारण निसर्ग नियम प्रत्येकांना एकच आहे.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणांसाठी एकच आहे. हे कमकुवत व्यक्ती प्रेमात आंधळे झालेली व्यक्ती हे सर्व सहन करतो पण कुठवर याही गोष्टीकडे जो स्वार्थीपणा ने प्रेम करतो. त्याला कळायला हवे त्याच्यावर जे संस्कार झाले असेल तर त्याला कळणारही नाही.
कदाचित कळेल ही पण वळणार नाही कारण आधीच्या पिढीने जे संस्कार त्याच्यावर केले गेले आणि त्यांनी स्वतः जे स्वतःवर संस्कार केले यामुळे तो त्या संस्कारा बरोबरच चालत राहील असे म्हणावे लागेल.
प्रेम करताना डोळसपणा असावा. प्रेम संस्कार मनावर जरूर करावे प्रेम खूप सुंदर कल्पना आहे... खूप सुंदर संकल्पना आहे... खूप सुंदर संरचना आहे... खूप सुंदर मनाला प्रफुल्लित करणारी भावना आहे.... खूप सुंदर मनाला सुगंधीत करणारी नाजूक प्रेम भावना आहे .....
प्रेम संस्कार मनाला जगण्याचे बळ देत असते. प्रेम संस्कार मनाला अशा आयुष्याच्या वळणावर घेऊन जाते तिथे सर्व काही खूप सुगंधित फुललेले टवटवीत असे फुले असते.प्रेम हे कुणीही कुणावरही करावे पण ते करताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र प्रेम संस्कारांना करावे लागले.
कधी एकतर्फी प्रेम करू नका. प्रेम ही भावना खूप सुंदर आहे ती मिळविता येत नाही... ती मिळविली जात नाही आणि कदाचित एखाद्या वेळ मिळविले जात असे तर ते टिकू शकत नाही. खोटारडेपणा हा एक ना एक दिवस येतच असतो मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना पण तो येतोच...!! हा नियम सर्वच नात्यांना लागू आहे. कारण निसर्ग नियम हा सर्व सजीव निर्जीव यांना एकच आहे.
4. अंधार संस्कार फक्त माझे
अंधार कधीकधी अंधार हवा असतो तर कधी कधी अंधार आपल्या वाटेला येतो. मनातल्या मनात असलेल्या कितीतरी गोष्टी अंधारात बोलून दाखवितो. सर्वोत्तम असे काहीच नाही. आतले बाहेरचे असे काही नाही. आंतरिक अंधार हा आपल्या असतो. अर्थात तो अंधार कसला आहे.
पूर्णत्वाकडे येणार आहे की अंधार कोठडी मध्ये स्वतःला नेणारा अंधारात फक्त आपण आपल्या भावना जाणून घेतो. अंधाराशी तडजोड करणे म्हणजे ,"आपल्या स्वप्न कल्पनांना मागे सोडणे होय." अंधारात जगणे म्हणजे जगण्यात वनवा आणणे होय. अंधारात फक्त मनाच्या आत असलेला किरणांचा काळ असतो.
अंधार मनाला काळ दाखवितो तसा तो थोडा थोडा प्रकाशाकडे घेऊन जातो. अंधारात आपला श्वास... आपली आसवे... आपली अंतर खेळ आणि जगण्याची आस स्पष्टपणे उजळलेले दिसते.
अंधारात कधीही नव्या जमिनीचा शोध लागू शकत नाही. अंधारअंगणात फक्त काळोख असतो. विचारांची प्रश्नांची आणि क्षितीजा पलीकडील विश्वाची..!!
....अंधार संपलेला असेल प्रकाशाची वाट आली तर पायवाट अंधारलेली असे प्रकाशाचा रस्ता कुठेतरी हरवलेला दिसतो प्रकाश असतो. पण ते मन चैतन्यात कुठेतरी लपलेला असतो. हरवलेला असतो.... प्रकाशाच्या दिशेला अंधार आपण कवेत घेत नाही तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न सतत करीत असतो.
मनाला एकाकी करीत असतो. मनाला कमकुवत होण्यापासून परावृत्त करीत असतो. प्रस्थापित विचारांना प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न सतत करीत राहतो. अंधार प्रकाशाकडे जाणारा आणि प्रकाश तेजस्वी रूपात आपल्यासमोर सत्य घेऊन येते.
मनाला अंधाऱ्या खोलीत जाताना बघताना मन जखमी होत जाते. मनात चित्रविचित्र भावना निर्माण होतात मग काहीही विचार करीत नाही. मनाचे चैतन्य नाहीशी होते. मनाला काहीही सौंदर्य राहत नाही म्हणजे मनविचारशृंखला... शब्द माहीत नसते ती फक्त कुठल्यातरी विचारात एकटाच मग्न असतो... मेंदूला मुंग्या येत पर्यंत..!!!
मनअंधार नक्की वाईटच पण तो आला तर काय करावे परिस्थिती परिस्थिती बदलू देत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तिळमात्र बदल होत नाही. सतत नियती समोर हात जोडावेच लागते. तरीही प्रकाशाची वाट आपली वाट पाहत असावे... असे; सतत वाटत राहते... अंधारा संस्कारांमध्ये!!
कळलेच नाही या वेळेसाठी अंधार आहे. की प्रकाशाच्या वाटेवर नयन ओले करून वाट पाहणारा अंधार बदलेल त्यावेळेसाठी आहे. अंधारानंतर प्रकाश येतो असे म्हणतात तर प्रकाशाची चाहूल का नाही?? प्रकाशाची चाहूल मग चैतन्य असेल तर ते चैतन्य कुठे गेले??
अंधारात की अंधारात मनसौंदर्यात कळत नाही. तरीपण अंधारकोठडी प्रकाशाची चाहूल शोधतच असते आणि शोधत राहील. कारण अंधार हा चिरकाल टिकणारा नसतो. मनसंस्कार तो टिकू देत नाही. प्रकाश किरणे अंधाऱ्या कोठडीत कुठून तर येणारच ..हे नक्की...!!
पण एक खरं नियतीचा खेळ संपला नाही आठवणींच्या बाजारात चैतन्य नावाचे सुंदर मेकअप किट आहे ते कधीही मनाला अंधारकोठडीत ठेवत नाही. अंधार संस्कार हे फक्त डोळ्यावर काळी पट्टी बाधांसारखे आहे. पट्टी कधीही सोडले जाऊ शकते. कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपण सतत अंधार संस्कारात राहू शकत नाही.
कारण प्रकाश अंधाराचे दुसरे रूप आहे. म्हणून सतत अंधारानंतर प्रकाश आणि प्रकाशा नंतर अंधार हा निसर्ग नियम प्रत्येकांच्या आयुष्याला लागू आहे. अंधार संस्कार कधीही मनावर करू नका. अंधाराची वाट नकारात्मक... प्रकाशाची वाट सकारात्मक... सतत ही भावना मनसौंदर्यावर.. मन चैतन्यावर.. स्वतःच्या संस्कारित विचारभाषेवर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अंधार संस्कार फक्त माझे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!!!!
Thank you..!!
*****************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा