savitalote2021@bolgger.com

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

महाज्योत शिक्षणाची सावित्रीबाई ज्योतिराव फुले

         


   महाज्योत शिक्षणाची 
                     सावित्रीबाई ज्योतिराव फुले 


            भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक, मराठी कवियत्री, प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणाऱ्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरीने काम करणारा ज्योतिबा फुले यांच्या सोबत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.  आधुनिक मराठी कवितेचे अग्रदूत सावित्रीबाई फुले होय.


          सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नैवसे आईचे नाव लक्ष्मीबाई होते. १८४०  मध्ये सावित्रीबाईचा विवाह १३ व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. 

            भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून दिले. भारतीय स्त्री मुक्तीसाठी रूढी प्रथा परंपरा याविरुद्ध आयुष्यभर त्यांनी लढा दिला. या सर्वांची सुरुवात ज्योतिराव फुले यांच्यापासून झाले. कारण महात्मा ज्योतिराव फुले लहानपणापासून जातीयतेचे चटके बसले होते. 

         अस्पृश्यता ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. असे त्यांना सतत वाटत असे.  अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांड या विरुद्ध ज्योतिबाचे मन पेटून उठले. अशा ज्वलंत विचारांचे ज्योतिराव बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांनी हाती घेतलेले    समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने सावित्रीबाई फुले यांनी पुढे नेला. 

            भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती असली तरी भारतीय संस्कृती मध्ये मात्र स्त्रीशक्तीला फार महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. कारण तिने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. भारतीय स्त्रियांमध्ये सहनशीलता मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले होय.

              कारण त्यांनी अंगावर  शेण  दगड-धोंडे सहन करून शिक्षणाची प्रखर ज्योत....शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. शिक्षणाची महती सांगताना सावित्रीबाई फुले म्हणतात,"विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी  तो ज्ञानी मानिती जन."

          3 जानेवारी १८४८ रोजी पुण्यात महिलांसाठी शाळा स्थापन करण्यात आली. या शाळेत नऊ मुली होत्या त्याही वेगवेगळ्या जातीच्या..!! त्यानंतर एका वर्षात त्यांनी पाच शाळा स्थापन केल्या.

          १२ फेब्रुवारी१८५२ मध्ये मेजर कन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले गेले. 
    
              १९४८ मध्ये शाळा चालविणे आणि तेही स्वमतांच्या जोरावर नियमांच्या जोरावर तेही रूढी प्रथा परंपरा कर्मकांड त्यांच्या नावावर विविध प्रथा समाजाला चिटकलेला होत त्या काळात सावित्रीबाई फुले महिला मुख्याध्यापिका या भूमिकेत होत्या. ती किती अवघड परिस्थिती असेल... त्यांना  काय सहन करावे लागले असेल... याची फक्त आपण कल्पना करू  शकतो. तरीपण सावित्रीबाई फुले यांनी स्वतः ही अभ्यास केला आणि त्याचा फायदा सर्व स्त्रीवर्गाला मिळावा यासाठी शाळेत शिक्षिका म्हणून काम सुद्धा केले. 
           
           इ स १८४८ते१८५२ या कालावधीत त्यांनी १८ शाळा काढला. 

                ज्योतिबा फुले यांच्या समवेत ब्रिटिश राजवटीत भारतातील महिलांचे हक्क सुधारण्यात सावित्रीबाईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली म्हणून त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे ओळखून सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केले.
       
          बालविवाह सतीप्रथा केशवपन अशा विविध प्रथांना स्त्रियांना सामोर जावे लागत असे. या प्रथेच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचार होत असे. सावित्रीबाई फुले यांनी अशा क्रूर प्रथांना विरोध केला.

          बालजठार या प्रथेमुळे अनेक लहान मुली लहान वयातच विधवा होत होत्या. त्याकाळी पुनर्विवाहाला मान्यता नसल्यामुळे त्यामुळे सती जात नसत त्यांचे केशवपन करून कुरूप देण्यात येत असे अशा विविध प्रथा समाजमान्य होत्या. या याविरुद्ध कोणीही बंड करू शकत नव्हते त्या वेळी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याविरुद्ध बंड केले. 

     समाजाला प्रगतीची एक नवीन वाट मोठ्या जिद्दीने  दिली आणि त्या वाटेवर आपण चालत आहोत डोंगर वाटा तुफान लाटा अंगावर झेलत निश्चयावर ठाम राहात हातात लेखणी धरून अमृताच्या वाणी प्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी आपले कार्य केले त्या हरला नाही हरू दिले नाही सावित्रीबाई फुले यांनी सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते तरच प्रगती आहे त्यांना आश्रय दिला सामाजिक कार्यात पुढाकार घेत न्यायासाठी लढत राहिल्या.



               भारत पुरुष प्रधान देश असला तरी भारत भूमीमध्ये स्त्रियांच्या योगदानाकडे कानाडोळा करू शकत नाही. कारण पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी आपले योगदान दिले आहे. भारतीय इतिहास पाहिला तर याचे दाखले अनेक सापडतील तसेच आधुनिक काळातही पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आपली भूमिका निभावली आहे. 

             ज्यावेळी रुढीच्या नावावर त्यांना बंधनात  एक प्रकारे गुलामगीरी ठेवण्याचे कार्य स्वार्थी समाजव्यवस्थेने केले होते त्या समाज व्यवस्थेला सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या जोरावर त्यांनी स्त्रियांना चार भिंतीच्या आत असलेले आयुष्य म्हणजे सर्व काही नाही तर शिक्षण हे फार मोलाचे आहे म्हणून "स्त्रियांना शिकावे", हे ब्रीदवक्य आयुष्यभर जपणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे निधन १८९७ मध्ये प्लेगची साथ आली असताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता सतत काम करत राहिला आणि या काळात त्यांना प्लेगची लागण झाली आणि दुर्दैवाने त्या स्वतः बळी ठरला.

           सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडे करून स्त्रियांना स्वातंत्र्याची नवी पहाट दिली. स्त्री आणि पुरुष यांच्यातील दरी कमी करण्याचे काम शिक्षणामुळे झाले. पितृसत्ताक पद्धती  मातृशक्तीलाही तितकेच महत्त्व आहे हे समाजव्यवस्थेत रुजविण्याचे  काम सावित्रीबाई फुले यांनी केले. आणि त्यांच्या या शिक्षणकार्याला वर्षांनी वर्ष पुढे नेण्याचे काम आजची स्त्री करीत आहे.

        समाजामध्ये सर्व क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे आणि याचे सर्व श्रेय सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना जातात.  म्हणून शिक्षणाची महाज्योत लावणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना मानाचा मुजरा...!!! त्या होत्या म्हणून आज आम्ही प्रत्येक क्षेत्रात मानाने आपल्या पायावर उभे आहोत म्हणून एवढेच म्हणावे वाटते.....
 
शेण दगड धोंडे वर्षाव 
तरी हरला नाही त्या आमच्यासाठी समाजव्यवस्थेचा तुफान लाटा अंगावरती 
तरी हरला नाही त्या आम्हासाठी 
जमिनीत रोवली समाजव्यवस्थेच्या 
मुळाशी शिक्षणाची बीजे 
काट्यांच्या पायवाटासोबत घेऊन 
तरी हरल्या नाही त्या आम्हासाठी 
कारण ती ज्योतिबाची सावित्री होती 
क्रांतीची पहिली ज्योत होती..!! 

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- महाज्योत शिक्षणाची सावित्रीबाई               ज्योतिराव फुले

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...