savitalote2021@bolgger.com

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

विद्यार्थी दिवस इतिहास बदलविणारे वटवृक्ष

विद्यार्थी दिवस 
       इतिहास बदलविणारे वटवृक्ष


           7 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस होय. हा दिवस महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय 2017 मध्ये घेतला.  7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ.
 बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये पहिला इंग्रजी शाळेत इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे 1904 पर्यंत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्या शाळेमध्ये त्यांच्या नावाची नोंद ,'भिवा रामजी आंबेडकर', अशी आहे. 

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक प्रवेश म्हणजे शैक्षणिक क्रांती होय. कारण शिक्षण हे मूठभर लोकांसाठी आरक्षित केले गेले होते. शिक्षण हे उच्चवर्णीययांसाठी आहे... असा समज समाजामध्ये पसरविला गेला होता.  त्यावर संपूर्ण समाजव्यवस्था आधारित होती.अशा समाज व्यवस्थेविरुद्ध जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी सर्वप्रथम समाज प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांना शाळेत घातले. 

          खरा अर्थाने शैक्षणिक क्रांतीचा इतिहासाचे वटवृक्ष लावले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले. या संविधानामुळे भारतीय संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये न्याय,स्वातंत्र,समता,बंधुता ही  मुल्ये रुजविली.


              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि इतिहास बदलविणारे घटना आहे. 1.धर्मनिरपेक्षता   2.न्याय    3. स्वातंत्र 
 4. समानता। 5.बंधुभाव के पंचसूत्रे देशाला दिले. शिक्षणाचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजव्यवस्थेत पेरले आणि ते उगवले सुद्धा !! त्यांचा वापर सुद्धा येणारा प्रत्येक पिढीने स्वतःच्या प्रगतीसाठी त्या वटवृक्षाखाली सावली घेतली. 

        माणसाला माणूस जगण्यासाठी लागणारे सर्व संस्कार हे शिक्षणामुळे आपल्याला मिळते हे संस्कार समाजमान्य करण्यात आले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे... हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेला नवीन संदेश दिला. 

       सामाजिक,आर्थिक, राजकीय,शैक्षणिक धार्मिक,सर्वांगीण उन्नती हे शिक्षणामुळे त्याची जाणीव होते. शिक्षण हे मुठभर लोकांसाठी नसून बदलत्या काळानुसार सर्व समाजव्यवस्थेतील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे असे अशी मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.

         महात्मा ज्योतिराव फुले यांनी या परिस्थितीत बदल घडवून आणला.शिक्षण ही व्यवस्था समाजातील त्या वर्गापर्यंत ज्या वर्गामध्ये शिक्षण घेणे त्याही पुढे जाऊन म्हणावे वाटते, 'शब्द ओळख' ही शिक्षेस पात्र होती त्या समाजापर्यंत समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोचविले. शिक्षणावरची बंदी उठविण्यात आली. 

          
               शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य आपल्या हक्काची जाणीव निर्माण होते. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 18-18 तास अभ्यास करून त्याचे सोने केले. त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहित जोपासले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक दिशादर्शक ठरलेले आहे.


     शिक्षणाची क्रांती ही समाजव्यवस्थेच्या तळागाळापर्यंत गेलेली आहे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले गेले. तरीही काही समाज वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही... याची कारणे काहीही असली तरी त्या समाज वर्गापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था त्यांच्या स्तरापर्यंत केली गेले पाहिजे. तरच ते शिक्षण प्रवाहात येईल.

           यासाठी शासनाने सतत नवनवीन उपक्रम राबवून शिक्षणाचे महत्व त्यांच्या बालमनावर रुजविली पाहिजे. शिक्षण हे फक्त अक्षर ओळखीचे साधन नसून सर्वांगीण विकासाचे मूलमंत्र आहे. शिक्षणामुळे प्रगतीच्या वाटा... विकासाच्या वाटा आणि माणूस म्हणून जगण्याच्या वाटा खुला होतात. हे त्या अक्षर ओळख नसलेल्या समाजापर्यंत त्यातील त्या पिढीपर्यंत पोचले पाहिजे जे समोरच्या पिढीला योग्य संस्कार आणि माणूस घडविण्याचे काम करीत असतात. त्यांच्यापर्यंत शिक्षणाचे महत्व कळले पाहिजे. 

        डॉ. बाबासाहेब म्हणतात," शिक्षण हे राष्ट्र उन्नतीचे एकमेव मार्ग आहे." त्यामुळे शिक्षण घ्या शिका संघटित व्हा संघर्ष करा प्रगती करा आपल्या कर्तव्याची आणि आपल्या हक्काची  जाणीव करून घ्या आणि करून द्या. आजच्या कालच्या आणि उद्याच्या सर्व  विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाच्या  कोटी कोटी शुभेच्छा.

केले एकच युद्ध 
शाळेत प्रवेश...  
बदलला गेला 
इतिहास गुलामगिरीचा..!!! 

शिक्षण म्हणजे प्रगती आपली
शिक्षण म्हणजे विचारबद्दल आपले 
शिक्षण म्हणजे माणसाला माणसातील माणुसकीची जात आपली 
बदलला इतिहास भिमाने 
शाळेत प्रवेश करून 
दाविला भीमाने इतिहास घडवूनी 
शिल्पकार भीम माझा संविधानाचा 
शिक्षणाने जगावर राज्यकरी भीम माझा 
गगन ठेंगणे झाले 
माझ्या भिमाच्या ज्ञानज्योती समोर 
केले एकच युद्ध 
शाळेत प्रवेश.....!!!


              शिक्षण हे वंचित समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. वंचित समाज हा विकास प्रवाहाचा केंद्रबिंदू व्हायला हवा.त्यांच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पोहोचले पाहिजे. तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.त्यासाठी शासनासोबतच आपण सुद्धा या कार्यामध्ये सहभाग घ्यायला हवा.

         सरकारद्वारे विविध योजना राबविल्या जातात.त्या त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी समाजातील सर्व वर्गघटकातील जनतेने कार्य केले पाहिजे. तरच भारतीय समाजव्यवस्था खऱ्या अर्थाने शिक्षित होईल आणि विकसनशील हा शब्द जाऊ "विकसित भारत" ही वाट मोकळी होईल.

       कारण शिक्षण हे आजच्या उद्याच्या आणि येणाऱ्या काळजी गरज आहे.

              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-
विद्यार्थी दिवस 
       इतिहास बदलविणारे वटवृक्ष

            अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...............!!!!!!!!



==========!!!!!!!!!!!=============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...