savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

महाराष्ट्र दिन

          

             1 मे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्य पूनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नाकारले होते.  मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वत्र सभा  घेण्यात आला होता.  महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई-कोकण विदर्भ देश खानदेश मराठवाडा आणि आजही महाराष्ट्र बाहेर असलेले बेळगाव,डांग,निपाणी,कारवार,बिदर हे भाग अभिप्रेत होते.
           पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईसह महाराष्ट्र देण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक ,वैचारिक ,साहित्यिक, कलावंत ,अभ्यासक,  मराठी भाषिक प्रेमी,  इतिहास प्रेमी, वृत्तपत्रकार  इत्यादी आणि महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या संघटना आणि कर्मचारी संघटनेने आपापल्या सभांमधून निषेध नोंदविण्यात आला होता.

       21 नोव्हेंबर 1956 मध्ये फ्लोरा फांउटनच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यासाठी मोर्चे काढण्यात आला. त्यावेळी मोर्चावर लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. त्या आंदोलनात 106 हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या एकजुटीमुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली गेली.


       1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. हाती मशाल घेतलेले क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले जाते आणि तेव्हापासून फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. 
           अखंड राहो सदा 
               हे शिवराष्ट्र 
        जयघोष करूया जय जय जय
             जय महाराष्ट्र

आज परिस्थिती बदललेली आहे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आपण साजरा करीत असतो आणि करणार आहोत पण आपापल्या घरीच कोरोना संकटामुळे.
      सहकार्य करू या! आपल्या जगासाठी आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या माणसांसाठी,आपल्या स्वतःसाठी सुरक्षित राहू या.
                  सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...