*** गोळा असेल आता ***
गोळा असेल आता
त्याचेच नातेवाईक जे त्यांनी निवडले आहे
गोळा असेल आता त्याच्या मनातल्या सर्व
गोष्टी जे त्यांनी निवडलेला आहे स्वतःसाठी
गोळा असेल आता त्याच्या विचाराचा
बाजार जो त्यांनी निवडलेला आहे स्व प्रगतीसाठी
गोळा असेल आता त्याच सुख त्यांनी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवून निवडले भविष्यासाठी
गोळा असेल आता त्याच्याजवळ समाधान त्याच्या शब्दांचा विश्वातील शब्द रक्ताला कमीपणा देऊन
गोळा नसेल तर त्याला सांभाळणाऱ्या माणसाची जात जी विश्वासाने त्याला जवळ करून ठेवणारी
गोळा असेल त्याचेच नातेवाईक आता आयुष्यात
यातच आता मला समाधान आहे त्याच्या सुखासाठी
गोळा बेरजेचा हिशोब मला करताच आला नाही म्हणून आता मी हिशोब करतच नाही
त्याने निवडलेल्या समाधानासाठी प्रगतीसाठी आपुलकीसाठी आणि शेवटच्या क्षणासाठी
गोळा असेल आता त्याचेच नातेवाईक
जे त्यांनी निवडले आहे मर्जीने रक्ताला नाकारून
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------