** विद्रोहाची मशाल पेटविणारे नामदेव ढसाळ**
(Namdev Dhasal who lit the torch of rebellion)
त्यांनी साहित्यातून समाजात जनजागृती केली. नामदेव ढसाळ दलित चळवळीतील नेते .नामदेव ढसाळ यांच्या कविता परंपरेला मूठ माती देणाऱ्या आहे.
नामदेव ढसाळ यांच्या कविता सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या होत्या. नामदेव ढसाळ यांच्या कविता समजून घेणे म्हणजे वास्तविक समाज व्यवस्था समजून घेणे होय. त्यांच्या कविता शब्दांच्या स्वरूपात सामाजिक व्यवस्थेला त्यांच्या शब्दात सांगायचे तर ..
(Namdev Dhasal's poems were commentaries on true situations. To understand Namdev Dhasal's poetry is to understand the real social system. His poetry is to describe the social order in his words.)
"पाऊस पडायचा राहत नाही
ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही जीवंतपणीच नरक वाटायला आला मेल्यानंतरच्या
स्वर्गाचं अप्रूप कशाला
फारच जीव कोंडून गेला रे
थोडा वेळ तरी गड्या उघड आकाशाची खिडकी" .....
इतके कठीण अवस्था जगण्याची होती. त्यांनी नेहमीच त्यांच्या कवितेमध्ये सामाजिक व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या रूढी परंपरा भाषा शब्द शैली अलंकार यमक इत्यादीला बाजूला सारून आपल्या बोली भाषेत त्यांनी त्यांच्या समाजातील व्यथा मांडला.
नामदेव ढसाळ यांची कविता ही गुळगुळीत नव्हती तर जहाल मतवादी विचारसरणीची होती. त्यांची लेखन काटेरी कुंपणावर चालणाऱ्या वेदनेची होती. तिखट मिठाची भाकरी खाताना होणाऱ्या वेदना तूप साखर पोळी खाणाऱ्या मनाला समजत नाही, अशी त्यांची भावना होती.कारण त्यांनी ते सर्व अनुभवले होते.
त्यांनी ते जन्मता पाहिलेले
होते... त्यांनी त्या व्यथा त्या परिस्थितीवर मात करत शब्दांसोबत मैत्री केली होती आणि त्या शब्दांनी त्यांच्या समाजातील व्यथा ज्या भाषेत त्यांनी मांडल्या. कारण गुळगुळीत आणि परंपरावादी कवितेची भाषा त्यांच्या व्यथा भावनेला विचारांना न शोभणारी होती.
(Namdev Dhasal's poetry was not smooth but rather ideological. His writing was about the pain of walking on a barbed wire fence. He felt that the mind that eats ghee, sugar and honey does not understand the pain of eating spicy salt bread, because he had experienced it all.
He saw it born
It was... He had overcome that pain and that situation and made friends with words and those words expressed the pain of his society in the language that he used. Because the language of the smooth and traditional poetry was unsuited to his sentimental thoughts.)
त्या व्यथा त्या भाषेत मांडून सुद्धा शकत नव्हता. दलित साहित्य त्या व्यथा मांडण्यासाठी जन्म झाला. जगण्याचे ओझे वास्तविक जगाला सांगण्यासाठी झाला. जातीव्यवस्था समाजामध्ये किती खोलपर्यंत रुजलेल्या आहे हे सांगण्यासाठी झाला.
वनवा पेटला विचारांचा आणि नामदेव ढसाळ यांनी त्या वनव्याला जाहीरपणे शब्दात मांडून जनसामान्यापर्यंत पोहोचविला. असंख्य प्रश्नांची बांधिलकी जपत नामदेव ढसाळ यांचे लिखाण अन्याय अत्याचार समस्या यावर भाष्य करणारे होते. धारदार तलवारी सारखे त्यांचे शब्द होते. ज्वलंत लेखनी होती... !!
"आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी करंडून खावा माणसावरच सूक्त रचावे माणसाचेच गाणे गावे माणसाने"!!
त्यांच्या साहित्यातून दलित बांधवांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या. त्यांच्या विचारावर ,"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या" विचारांचा प्रभाव होता. त्यांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या लेखणीतून मांडले त्यांच्या विचारांची दखल जागतिक पातळीवर सुद्धा घेतली गेली. त्यांच्या कवितेने विद्रोह पेटविला.
( Through his literature, the pains and sufferings of the Dalit brothers were presented. His thinking was influenced by the thoughts of "Dr. Babasaheb Ambedkar". He presented the thoughts of Babasaheb through his pen and his thoughts were also noticed at the global level. His poetry ignited a revolt. )
" मी जगण्याचे ओझे इथपर्यंत वाहता आणले
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?"
हे शब्द भावनेला रक्तबंबाळ करणारी आहे.
रोज आयुष्य संघर्षाने भरलेला आहे. माणसाला माणूस उद्ध्वस्त करत चाललेला आहे. वाहणारे पाणी स्वच्छ होईल या आशेने जगणे चालू आहे. सभ्यपनाची भाषा आता कुठे कानावर येतच नाही. अशी आयुष्य आमच्या वाटेला आले आहे.
वाहणाऱ्या गटारांनी आता स्वच्छ व्हावे अशी इच्छा असून सुद्धा समानतेचे वारे कुठेच दिसत नाही. अशी भावना त्यांच्या शब्दा - शब्दात जाणवते. नामदेव ढसाळाने गोलपीठातून शोषित पीडित स्त्रियांच्या व्यथा समस्या जगापुढे मांडला.
मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७२) आमच्या इतिहासातील एक परिहार्य पात्र प्रियदर्शिनी(१९७६) तुही यत्ता कंची (१९८१)खेळ (१९८३)गांडू बगीचा(१९८६) या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)मी मारले सूर्याच्या रथाचे घोडा, तुझे बोट धरून चालले आहे ,इत्यादी.. !
स्त्री जीवन नरकाने भरलेले आहे हे मांडले. त्यांनी स्त्रियांचे आयुष्य अशा स्त्रियांच्या आयुष्य खूप जवळून पाहिले जिथे फक्त स्त्रियांच्या देहाचा व्यापार केला जात होता. त्या स्त्रियांच्या व्यथा त्यांनी त्यांच्या शब्दात मांडला .
सामान्य माणसाला काहीही किंमत नाही आणि विद्रोह केल्याशिवाय ते मिळणारही नाही हे त्यांच्या कवितेतून पदोपदी त्यांनी मांडले. त्यांची शैली झोपलेल्या व्यवस्थेला जागी करणारी आहे. त्यांचे शब्द धारधार तलवार आहे. जो व्यक्ती माणसाला गुलाम बनवावे या मानसिकतेचा असेल त्यांना हंटरचे फटके मारावे अशी सांगणारी. त्यांची कविता धोकेबाज सावकार शेटजी या लोकांना जेवणातून विष घालून मूठ माती द्यावी ही त्यांची कविता माणसाला माणूस म्हणून जगून देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्ती भाष्य करणारी आहे.
नामदेव ढसाळ यांचे लेखन हे एका विशिष्ट वर्गापुरते या समाजापुरते मर्यादित नाही ते संपूर्ण जगातील अशा व्यवस्थेवर बोलतात तिथे शोषित पीडित अस्पृश्य गंजलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करते. अशा सत्तेविरुद्ध भाष्य करते जिथे फक्त पांढरपेशी समाजाची सत्ता असते. समाज एका विशिष्ट चाकोरीबद्ध व्यवस्थेतून जीवन व्यतीत करीत आहे हे सांगण्याचा हट्टहास करणाऱ्या समाजाविरुद्ध त्यांचे लिखाण आहे.
त्यांनी दलित समाजाला त्यांच्या भाषेमध्ये जनजागृती केले. त्यांनी ते कवी लेखक समाज सुधारक दलित साहित्य यांना त्यांनी त्यांच्या भाषेतून मांडले. नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा मांडल्या.
(Namdev Dhasal's writings are not limited to this society of a particular class but it speaks of such a system in the whole world where the oppressed sufferers are untouchables representing the rusted society. Commenting against such a power where only white society has power. He writes against a society that insists on living through a certain servile system.
He made the Dalit community aware in their language. He presented that poet, writer, social reformer, Dalit literature in his own language. Namdev Dhasal presented the sufferings of Dalits through literature.)
महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक होते. या संघटनेवर दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. त्यांची भूमिका मांडली. दलित चळवळीला त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
गोलपीठ ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. 1999 ला पद्मश्री पुरस्कार मिळाली असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले.
(Golpith won the Maharashtra State Award. He received many awards including Padma Shri in 1999.)
नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी साहित्याला मोलाची भर दिली. दलित साहित्याला त्यांनी साहित्य म्हणूनच घेऊ नका तर त्या समस्या अजूनही आहे हे आपल्या भाषेत पटवून सांगितले.
दलित साहित्याची निर्मिती ही एक जाणीव आहे हे विसरू नये .दलित साहित्य काल्पनिक नाही किंवा अवास्तव विचारसरणी नाही तर दलित साहित्य ही या समाज व्यवस्थेचे सत्य आहे. हे सांगण्याचे काम नामदेव ढसाळ यांचे लिखाण करते.
यांचे तत्त्वज्ञान अनुभवलेले होते. म्हणून ते अधिक प्रभावी वाचक मनामध्ये घर करून राहते. मानसन्मान यापेक्षा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला हवा हे सांगण्याचे काम त्यांची कविता प्रस्थापित समाज व्यवस्थेला करते.
" डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ",यांच्या विचारांना प्रभावित होऊन त्यांनी ,"आत्ता" या कवितेत लिहितात ...
" सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला
आत्ता अंधारयात्रिका होण्याचे नाकारलेच पाहिजे हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला
आत्ता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवायलाच पाहिजे
या वैभवनगरीसाठी आपलाच खून सांडला आणि
दगडी खाण्याचा मक्ता मिळाला
आता आभाळमुका घेणाऱ्या हवेल्यांना
सुरुंग लावलाच पाहिजे
सूर्यफुले हाती ठेवणारा फकीरा हजारो
वर्षानंतर लाभला
आत्ता सूर्यफुलासारखे सुर्योन्मुख झालेच पाहिजे".
नामदेव ढसाळ यांचे लेखन विश्वात्मक विचारसरणीचे होते. त्यांची भाषा ही गलिच्छ वाटत नाही तर त्यांची भाषा समाज व्यवस्थेचे दर्शन घडविते. त्यांची भाषा एका विशिष्ट मर्यादित जातीपुरते नव्हती तर ती संपूर्ण देशासाठी होती... जगासाठी होती .
( Namdev Dhasal's writings were of universal thought. Their language does not seem dirty but their language reflects the social order. His language was not for a certain limited caste but for the whole country... for the world.
It was for man in the world where man was exploited. He mentioned any caste, religion, creed, country, world in his language, his freedom of writing was rebellion.
Namdev Dhasal's writing gives the mind a path to go on a positive path. His austere style inspires to live as a man. His writings say that man has the right to live as a human being and must get it.)
ज्या ज्या जगात माणसाचे शोषण होते त्या त्या जगातील माणसासाठी होती. त्यांनी कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा देशाचा जगाचा उल्लेख त्यांच्या भाषेमध्ये येत त्यांचे लेखन स्वातंत्र्य बंडखोरी होती.
नामदेव ढसाळ यांचे लिखाण मनाला सकारात्मक वाटेने जाण्यासाठी पायवाट देते. त्यांची कडक शैली माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते. त्यांचे लिखाण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे हे सांगणारी आहे.
त्यांचे साहित्य दलित साहित्याला वेगळेपण आणून देते. त्यांचे साहित्य विद्रोहाची भाषा करते. परंपरा यांना मान्यता देत नाही. विद्रोही साहित्यात वास्तवाला अधिक महत्त्व दिले जाते आणि नामदेव ढसाळ यांचे साहित्य हे त्या साहित्यातील वेगळेपण सांगणारे साहित्य जखमेतून रक्त व्हावे इतकी दुःख वेदना त्यांनी शब्द शब्दातून मांडलेली आहे.
नामदेव ढसाळ म्हणजे विशिष्ट शब्द मध्ये अडकलेला व्यक्ती नसून समाजव्यवस्थेमध्ये बदल घडावा यासाठी केलेले त्यांचे लेखन आहे. नामदेव ढसाळ जगातील संपूर्ण शोषित पिढीत समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्दांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
-------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा