*** स्पर्श ****
( मायेचा दुसरा शब्द स्पर्श विविध स्वरूपात)❤
(( ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .))
स्पर्श कदाचित हा शब्द एका विशिष्ट चाकोरीबद्ध मध्ये अडकविला जाऊ शकतो पण स्पर्शाची भाषा ज्यांना कळली तो भावनातील त्या सर्व भावनेला समजले असे होते.
स्पर्शाची भाषा जन्मताच आपल्याला मिळते. पहिला स्पर्श आईचा मायेने भरलेला...!! निशब्द शब्दांना शब्द देणारा मायेचा स्पर्श. निरागस कोमल मुक्या भावनांना हृदयाशी घट्ट नाते निर्माण करते. डोळ्यातले दवबिंदू आणि पहिल्या पावसाची सर येऊन गेल्यावर अलगद बिलगून असणारे पावसाचे थेंब यामध्ये जे प्रेम आहे कदाचित ते कुठेच नाही. शिंपल्याचे मोती होणे हा ही एक मायेचा स्पर्श. निशब्द स्पर्शाच्या शब्दांना शब्द देतात. शब्दाविनाश स्पर्शाची जाणीव स्पर्शाने नाते बालमनात निर्माण होते.
स्पर्शाने उमटलेला मोह हा जादूच्या दिव्यासारखा असतो. भावनेने ओथंबलेला क्षणात मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा आणि क्षणात खेळकर होणारे बालमन खरस्पर्शाच्या भाषेने सुरक्षित असते.
सगळच गोष्टी स्पर्शात सांगितल्या जातात. प्रेम व्यक्त करण्याची निराळीच पद्धती स्वतः तयार करतात. कारण शब्द कमी असतात पण विश्वासाच्या आधारावर स्पर्शाने सगळ्या आई सोबत व्यक्त केल्या जातात.
"वेडा प्रेमाची वेडी ही गोष्ट",अशी त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत फक्त स्पर्शाने...! आईचा गालावर पडणारा हाताच्या स्पर्शानेही त्यांना कळते, आईच्या मनातील शब्द.
शब्दाविनाश स्पर्श हा लाजाळू सारखा असतो. मायेचा स्पर्श जितका मायने भरलेला असतो तितका स्पर्श बाबांचाही मायेने भरलेला असतो. फक्त व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते.
तो स्पर्श मनाला आत्मविश्वास निर्माण करून देणारा असतो. खांद्यावर ठेवलेला हात विश्वासाच्या त्या धाग्यांना जोडलेला असतो. जिथे कधीही एकटेपण्याची जाणीव नसते. आपल्या मागे खंबीर एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ,"बाबा"....!
बाबाच्या मायेचा स्पर्श फक्त आपल्याला आयुष्याच्या अनेक वळणावर वळण घेताना आपल्यासोबत असतो. जीवनाचा आधार असतो .यशाची चमक असते. उपकाराची झालर असते आणि विशेष म्हणजे आपल्या अस्तित्वाचे अस्तित्व असते.
बाप नावाचा माणूस कधीही जबाबदारी झटकत नाही. चुकीला कधी पाठीशी घालत नाही. प्रेम शिस्तीचा अहंकार आणि रागीट स्वभावाचा भाग आपल्याला मायेची भूक कधीच कमी होऊ देत नाही.
सकारात्मकतेचा अभिमान बाळगणारा मायेचा स्पर्शला बाबा म्हणतात. बाबाच्या डोक्यातली टोपी मुलांना झाले की मूल मोठे होते. पण तसे बाबांच्या आयुष्यात नसतेच तो शेवटच्या क्षणापर्यंत आभाळमाया एवढ प्रेम देत राहते त्याला माहीत असते त्याचे जाणे तरीही वटवृक्ष सारखा कल्पतरू सारखा मागे असतो. शांत, प्रेमळ,कठोर,रागीट अशा बहुरूपी आत्मविश्वासाने आपल्या सोबत कोणी झिजलेला तरी हसत्या चेहऱ्याचा भाकरीची किंमत काय असते हे आपल्याला सतत मनात असून देणारे म्हणजे बाबा.
त्याचा स्पर्श हा कधीही न समजणारा. तरीही त्या स्पर्शाच्या धाकामुळे आपण शिस्तीत आणि संस्कारात वाढत असतो.
आई त्या उलट;फक्त तरीही त्यांचा स्पर्श आपल्या नात्यांमध्ये एक घट्ट वीण गुंफलेली असते. अगदी एखाद्या रसायनसारखे एखाद्या प्रयोगशाळेत तयार केलेले दोन विश्व दोन स्पर्श म्हणजे आई - बाबा...!
कदाचित त्यांच्याच पहिला स्पर्शाने मुलांना कळत असावे. हेच आपले विश्व. हेच आपले जीवन... हेच आपले प्रेम आणि हेच आपले सर्वस्व उगाच वाटून जाते लहानपणी मार खाणारे आपण मोठे झाल्यावर तर स्पर्श माहीतच पडत नाही कारण बाबांसाठी आपण मोठे झाले असते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची ताकद बनत असतो.
ती ताकतच आपल्यामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व चांगला माणूस बनविण्याचा आधार असतो. संवाद होतात आईकडून तरीही बाबा नावाचा व्यक्ती किती प्रेमाने काळजीने भरलेला असला तरी तो कधी दिसतच नाही.
तो नेहमी दिसतो, रागीट.... सतत शिकविणारा .....सतत जगण्याची गणिते सांगणारा..... स्वयं दीप होण्याकडे चालविणारा ...!!कुटुंबाचा आधार असतो कितीही। म्हातारपणाची चाहूल आली असली तरी तो घराचा आधारस्तंभ असतो आणि तो गेला की रिकामी खुर्ची एकटेपणाची जाणीव निर्माण करते. ते केले की जगायच कस हे तेच कधी सांगतच नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या रंगमंचातील प्रत्येक व्यक्तिमत्व सांभाळून आयुष्य जगत असतो आणि ते सांभाळण्याची तंत्र बाबा आपल्याला शिकवीत असते पण ते नसताना कसे जगायचे हे शिकवायला मात्र विसरून जातात....💕
भावनिक रित्या आपण मोकळे झालेले असतो. जीवन सोपे असते पण आता ते कठीण झालेले असते. सगळे काही हातात असताना पाठीवरची ती थाप स्पर्श तो भक्कम आधारस्पर्श आपल्या जवळ नसतो.
जीवन चालत असते. जीवनाचा प्रवास चालू आहे पण ते स्पर्श आपल्याला कधीच मिळत नाही. तो स्पर्श मूल्यवान संपत्ती आहे. तो जपून ठेवावा लागतो.
जेव्हा एकटेपणाची जाणीव होते तेव्हा तिथे स्वतःला मारून घ्यायची त्या स्पर्शाने. डोळ्यातले पाणी त्या स्पर्शाची जाणीव करून देते आणि शब्द कमी पडतात अशावेळी...!!
" डोन्ट वरी बी हॅपी," म्हणणारे शब्द आता काळा सोबत गेलेले असतात. चिखल मातीचा खेळ आता आयुष्याचा खेळ झालेला असतो. पण तो स्पर्श देवासारखा नेहमी पाठीवर थाप देणारा सतत आपल्या सोबत असतो.
स्पर्शाची भाषा ही वेगवेगळी असते. प्रत्येकांसाठी ते नाते वेगळे असते. कधी ते नाते एका विशिष्ट शब्दांवर आधारित असते. तर कधी तो स्पर्श फक्त मायेचा असतो. कधी प्रेयसी होऊन,कधी प्रियकर, कधी नवरा तर कधी बायको...!
कधी ताई लहान बाई कधी भाऊ तर कधी जिवलग मैत्रीण म्हणून जिवलग मित्र म्हणून तर कधी अनोळखी स्पर्शही मायेने भरलेला असतो. एक वेगळेच स्नेहबंध त्यांच्याबरोबर जोडलेले असते. हे स्नेहबंध प्रत्येक नात्यात असते.
कधी - कधी शब्दविना दुःखाचे सांत्वन करताना स्पर्शाची भाषा खूप आधार घेऊन येते. अशा विविध स्तरावर स्पर्शाची भाषा वेगवेगळी असते.
प्रेमात पडले की त्याचाच पण हाताचा पहिला स्पर्श भावनांना वाट मोकळी करून देत नाही. अलगद तो स्पर्श हुरहुर लावून जातो. शब्दाविना गुंतवत जातो. ओठांवरचे शब्द आता नको असते.
गालावरची लाली प्रेम व्यक्त करत राहते. वास्तवात तसे काहीच नसते तरीही तो पहिला स्पर्श न समजणाऱ्या शब्दा स्वतःशी बोलत राहतो.
बदललेल्या पण बदललेला स्पर्श बदललेल्या स्पर्शाची भाषा आता हवीहवी वाटते. कदाचित त्यालाच प्रेम असे म्हणू.
आपण त्याच्या प्रेमात पडतो. खरतर स्पर्शाची भाषा ही वेगळीच छोट्या - छोट्या गोष्टींना स्पर्शत सांगितले जाते. गालावरच्या लालीला स्पर्शाची भाषा दिली जाते.स्वप्न रंगविले जातात त्या स्पर्शाने संसार थाटला जातो.
त्या स्पर्शाने ,"दुनिया इधर की उधर हो जायेगी", ते प्रेम कधीही कमी होत नाही. नात्यांची नवी गुंफण घट्ट आयुष्यभरासाठी विणली जाते. एकांत एकटेपणा हे शब्द आता कंटाळवाने झालेले असतात. एकटही असल तरी तो स्पर्श उंच - उंच भरारी घेत वर्षानी वर्ष सोबत असते.
स्वर्ग सुखाची कल्पना काय असते हे कदाचित त्या स्पर्शाने जाणवते.जुन्या आठवणी घट्ट मिठीत अबोलपणाने स्वतःजवळ घट्ट बांधून ठेवले जाते. त्या स्पर्शाने स्पर्शाची भाषा कळते. कोमेजलेले फुल सुगंधित होत जाते.
स्वप्नांची रिकामी ओंजळ नवीन स्वप्नांनी भरली जाते. नात्यांच्या गर्दीत ती गर्दी अधिक जवळची वाटते मग ती गर्दी खोट्या आश्वासनांवर का असेना पण तो स्पर्श मनाला हवा असतो आणि त्याची किंमत मन तुटल्यावर कळते.
तरीही मनात बडबड चालूच असते. त्या आनंदी क्षणांची पण काहीच अपवाद असतात. या भावनेसाठी...!💕
प्रेमात पडताना अधुरा तो स्पर्श नवीन वाट नवीन सुरू नवीन कल्पना नवीन मेकअपचे दुनियेत नेणारे ते दिवस असतात.
पायातली पैंजण आपल्याला अधिक आवडते. आरसा आपला जिवाभावाचा स्नेह सबंध होतो. मेकअप संपले जातात. सतत आईचा मायेचा स्पर्श आपल्या पाठीला होतो, धाडकन!!!
तेव्हा भानावर येतो आपण. आपलाही स्पर्श पुस्तकांना होऊ द्यावा यासाठी. त्यावर आपले विश्व असते. रजिस्टरचे मागचे पान लाल रंगाच्या पेनाने बदामी चित्राने भरलेली असते. सोबत बाण असतो.
विचित्र असते ती भावना. हसरा नयनांसोबत स्वप्नांची नवीन वाट असते. महत्वकांक्षा,आत्मविश्वास, विश्वास प्रामाणिकपणा या शब्दांची ओळख त्यावेळी आपल्याला होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'सुरक्षितता', या शब्दांची किंमत आपल्याला कळते.
आठवणी खूप सुंदर आहे. कागदावर कितीही उतरवला तरी त्या कमीच पडतात. कधी कधी शब्दही हसून जातात. माझ्या शब्दांवर !! वाट मोकळी असतानाही घट्ट मिठीची दुनिया ही वेगळीच असते. पण ती चोरून चोरून केले जाते. ती मीठी जगण्याची इच्छा असते. दोन अश्रूंच्या सोबत.
नवीन स्वप्नांचा हुंदका असतो.हृदयाच्या कप्प्यात आठवणींचा साठा असतो आणि त्यासाठी मायेचा स्पर्श असतो.
मुलांचा सहवास हाही एक नवीन मायेचा स्पर्श. नातवंड म्हणजे स्पर्शाने भरलेले कोठार मस्त जगण असते.
हे सगळे पहिला स्पर्श मायेचा ....दुसरा स्पर्श शिस्तीचा.... तिसरा स्पर्श प्रेमाचा ....चौथा स्पर्श नातवंडांच्या आणि पाचवा स्पर्श निरोपाचा...!!
स्पर्श हे खूप काही सांगून जाते. डोळ्यातले अश्रू इतके दाटून येतात की त्या आसवांना अथांग समुद्राचा काठही कमी पडतो. आकाशात पतंग उडावे इतकी उडावी की आपल्या डोळ्यांनीही दिसू नये इतका निरागस हास्य प्रेमळ स्पर्शाने मनात आठवण येते.
प्रेम गालावरच्या हसूशी खेळणार प्रेम वाहते. डोळे पुसणार प्रेम, भरल्या डोळ्यांनी निरोप घेणार आणि प्रेम जीवन व्यथा सांगणारा जोडलेले नाते फक्त स्पर्शाने थांबले की त्या स्पर्शाला किंमत असते.
तो स्पर्श अविस्मरणीय क्षण होऊन जातात. मग ते क्षण कठीण प्रसंगी कुठल्याही नात्याने कशाही पद्धतीने व्यक्त केलेला असो. जो स्पर्श मायेचा होता शिस्तीचा संस्काराचा होता स्पर्शसोबत विश्वास पात्र नसणाऱ्या नात्यांना स्पर्शाची भाषा कळत नाही.
फक्त कळते एकच भाषा ,"अविश्वासाची'. म्हणून स्पर्श ओळखा. शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा खूप वेगळी असते. तो स्पर्श तुम्हाला जगण्याची गणिते शिकवित असतो.जीवनशैली शिकविते.
ते स्पर्श सर्वच गोष्टींना उत्तर असते मग तो स्पर्श मायेचा असो. शिस्तीचा प्रेमाचा या कुठल्याही एखाद्या नात्यांसोबत असो.
प्रामाणिकपणा हा प्रत्येक स्पर्शाची भाषा असते. स्पर्श या जगातला सर्वात सुंदर सुगंध आहे. जो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या स्पर्शाने येतो. मोठ्या बहिणीचा मायेचा स्पर्श हा आई सारखाच असतो. लहान बहिण भाऊ आपला श्वास असतो. मायेचा स्पर्श आपल्याला जगण्याची नवी उम्मीद देते. आपल्या सत्य आणि असत्य गोष्टीची ती खऱ्या अर्थाने साक्षीदार असते. आपल्यापेक्षाही आपल्याला ओळखणारी ती आपली सावली असते.
प्रतिबिंब असते. तिच्या प्रेमळ स्पर्शाने आपण आपले अस्तित्व तिच्याभोवती गुंफत असतो. संघर्षाच्या वाटेवर तिच्या हाताचा अवगत स्पर्श त्या संघर्षाची किंमत शून्य करून देते.
एक नवीन आत्मविश्वास त्या संघर्षाला समोर जाण्यासाठी निर्माण करीत असते. स्पर्शाची व्याख्या करता येत नाही. स्पर्शाला शब्दात बांधून ठेवता येत नाही.
जसजसे रेशीम बंध नात्यांसोबत आपल्या नात्यांमध्ये गुंफत असते. तसतसा वेगवेगळा स्पर्श त्या स्पर्शाची भाषा आपल्याला कळत असते.
स्पर्श शब्दात व्यक्त करताना स्पर्शाची एक नवीन स्पर्शाची भाषा नवीनच पद्धतीने कळली. ती म्हणजे स्वतः स्वतःशी स्वतःसाठी स्पर्शाची भाषा आणि ही भाषा एक व्यक्ती म्हणून किती महत्त्वाची असते.
स्वतः स्वतःसाठी स्वतःचा मायेचा स्पर्श आपली सावली असते. तो स्पर्श ती जाणीव हीच आपली ओळख असते.
स्पर्श मायेने भरलेला
स्पर्श शिस्तप्रिय संस्काराने भरलेला
स्पर्श आजीच्या प्रेमाने भरलेला
स्पर्श अबोली बोलांनी भरलेला
स्पर्श स्पर्श आणि फक्त स्पर्श
ओलावणाऱ्या नयनातून अश्रूंच्या सोबत गालावरती येणाऱ्या त्या थेंबान सारखा स्वच्छ निर्मळ पवित्र निरागस स्पर्श असतो.💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा