16 ते 17 वर्षाचा लढा अनेकांनी गमावले प्राण आणि झाला नामविस्तार ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,"
( 16 to 17 years of struggle many lost their lives and the name was changed to "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.")
सोळा वर्षाच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ", असे नामांतर करण्यात आले. एक धगधगती संघर्षाची चळवळ शांत झाली. 1976 ते इ.स.1994 या दरम्यान ही चळवळ चालू होती. 27 जुलै 1978 मध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृह आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. पण काही कारणास्तव या निर्णयाला जातीचा रंग देण्यात आला आणि एक चळवळ उभी झाले.
या चळवळीमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना तुरुंगात जावे लागले. समाजाने एकत्र येऊन उभारलेली ही चळवळ म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा होय.
ही चळवळ कुणाच्याही अस्मितेला ठेच लावणारी नव्हती. कुणालाही कमी लेखणारी नव्हती. ही चळवळ बाबासाहेबांच्या विचाराने ज्या घराघरात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित केला त्या महामानवाला देण्याचा मानाचा मुजरा होता.
तसे न होऊ देण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण नामांतराची चळवळ सुरू झाली आणि 16 ते 17 वर्ष प्रदीर्घकाळ हा संघर्ष चालू राहिला. नामांतर ही चळवळ एक साधारण आंदोलन होते पण प्रखर विरोधामुळे ही चळवळ एका लढा मध्ये रूपांतरित झाले.
दलितांना एकटे पाडले जात होते. त्यांची कोंडी केली जात होती. त्यांचा छळ केला जात होता. अत्याचार केले जात होते.तरीही चळवळ थांबली नाही.
ग्रामीण भागातील बरेचसे स्थलांतर झाले होते. तरीही चळवळ सोळा वर्ष चालू राहिले आणि शेवटी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले.
💕 नामांतर ही चळवळ फक्त नावासाठी नव्हती तर समता स्वातंत्र्य बंधुता या तत्त्वाला समोर नेण्याची होते. 14 जानेवारी हा मोठा उत्साहाने नामांतर दिवस म्हणून साजरा केला जातो.
विचारांच्या लढाईला कितीही विरोध झाला तरी समानतेच्या विचाराला असमानतेचे विचार हरवू शकत नाही आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा होय.
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=====!!!!!!!======!!!!!!!====!!!!!!======
(16 to 17 years of struggle many lost their lives and the name was changed to "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.")
-------------------------------------
After sixteen years of struggle, Marathwada University was renamed as "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University". A fiery struggle movement was silenced. This movement was going on between 1976 and 1994 AD. On 27 July 1978, both the Houses of the Legislature and the Marathwada University passed a resolution naming Babasaheb. But for some reason this decision was given a caste color and a movement arose.
Many lost their lives in this movement. Many had to go to jail. This movement, built by every section of the society, is the fight to change the name of Marathwada University.
This movement was not meant to offend anyone's identity. She did not look down on anyone. This movement was a tribute of honor to the great man in whose house Babasaheb's thought ignited the light of knowledge.
A lot of effort was made to prevent that from happening. But the name change movement started and the struggle continued for 16 to 17 years. The name change movement was a simple movement but due to intense opposition, the movement turned into a struggle.
Dalits were being isolated. They were being confused. They were being tortured. Atrocities were being done. However, the movement did not stop.
There was a lot of migration from rural areas. Still the movement continued for sixteen years and finally Dr. Marathwada University. Babasaheb Ambedkar Marathwada University was named.
The name change movement was not just for the name but to bring forward the principle of equality, freedom, brotherhood. 14th January is celebrated as Naamantar Day with great enthusiasm.
No matter how much opposition there is in the battle of ideas, the idea of equality cannot defeat the idea of inequality and the best example of this is the Marathwada University name change fight.
✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा