** तो माझाच **
उगाच रुसावे वाटते त्याच्यासाठी
भावनांच्या गुंतांमध्ये आकाशात
बेधुंद उडणाऱ्या पतंगासारखे
आठवणींच्या उजेडात
खुळावलेल्या मनात
जाई जुई रातराणी प्राजक्ता
आनंदाचा वसंत
तो हसत खेळत
हळुवार स्पर्शाचा हसत्या
स्मित हास्यसोबत निवांत
नयन निवांत कालचे आजचे
सर्व काही गुंतलेल्या भावनासारखे
तो माझाच मखमली सुगंधासारखा
चांदण्याच्या लख्ख प्रकाशात
आशेचा धूर घेऊन निवांत
नव्या जुन्या सर्वच आनंदाची
उधळण
उगाच वाटते आता
उरलेसुरला सर्वच आठवणींच्या
उजेडात घट्ट मिठीत
तो माझाच होता ???
गुलाबाच्या टवटवीत फुलासारखा 💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा