स्त्री म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. स्त्री या शब्द सर्व विश्व सामावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता ......याच भाव संवेदनेतून ही कविता.
स्त्रीची कहाणी शब्दात थोड्याफार प्रमाणात लिहिण्याचा प्रयत्न. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.✍️ धन्यवाद...!🤣💕
** संघर्षाच्या प्रवासात **
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहे
नव्या जमिनीवर जुनीच ओळख आहे
पतंग काढली जाते
तू स्त्री आहे म्हणून
तुला कुठेही निवांत झोप नाही
आशेचे दार नेहमी बंदच
शोषण हा तुझा मूलभूत अधिकार
असावा असे वाटते
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस
माणूस म्हणून जगण्याचा
तुला अधिकार आहे
हे निसर्गाने सिद्ध केले आहे
तरी तू गर्भातच मारली जाते
जुन्या सर्व रूढी प्रथांवर आता
नांगर फिरवले असले तरी
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस
आशेचा दीप लावून फिरविला तरी
आशेचे किरण मात्र बंदच आहे
तुझ्या जन्माने आनंदाचा सोहळा
नाही होत कुठेही
तुझ्या प्रगतीचा उदोउदोत
फक्त मोहरतात बाईच बाईपण
बाईतील चिंब भिजलेल्या केसांच बाईपण
सुगंध मात्र तिथेच थांबतो यशाचा
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस
बदलत्या जगाचा तू
आता एक भाग आहे
तरीही ज्वालामुखी मनात असतोच
असुरक्षिततेचा पावलोपावली
अग्निज्वालाने पेटलेल्या विचारांचा
गुलाम की स्वातंत्र्य या प्रश्नात
प्रवास चालू आहे
प्रवासाचा निखारा घर अंगण करीत
बंदिस्त स्वप्नांच्या मागे फिरत
एक युग चालत आहे
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस
तरी संघर्षाच्या प्रवासात गुढतेने
तुझा प्रवास विश्वासाने चालूच
पायातील शक्ति मात्र अजून
घट्ट करीत आहे
प्रवासाच्या संघर्षाची यात्रा
स्वप्नाने पूर्ण करत आहे
संघर्षाच्या प्रवासात आशेची
किरण बाईच्या मनात रुजवत आहे
रंगलेले सर्व स्वप्न आपले असतात
हे बहरलेल्या यशासोबत सांगते आहे
स्वप्नाची नवीन पायवाट उभी करते आहेस
दिखाव्याच्या जगात बाई म्हणून
जगते आहे
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
-------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा