savitalote2021@bolgger.com

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

अबोली मीच माझी

** अबोल मीच माझी **

 अबोल मीच माझी 
माझ्या शब्दांच्या शब्दांशी 
नयन त्याचे कठोर 
भास सावलीचा 
अबोल प्रेमाचा 
बोल प्रवास हा 

कधी शब्दांचा प्रवास 
निशब्द आता 
सर्वस्वाने रिकामा हा 
बोल - अबोल प्रेमाचा 
प्रवास हा रिकाम्या 

समोरील दारातल्या वाऱ्यासारखा 
बेभान काळोखाच्या साक्षीने 
अबोल प्रेम हे 
बोल शब्दाने निशब्द होत आहे
काळोखाच्या साक्षीने 

बोल प्रवास हा कधीचा 
आता अबोल प्रेमाचा

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...