शब्द ही कविता माझ्या मनातील शब्दांबद्दल असलेल्या प्रेमावर स्वलिखित लिहिलेली आहे शब्द माझ्यासाठी काय आहे हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
***** शब्द *****
माझ्या शब्दांना साद
देत चालत राहा
माझ्यासोबत
शब्दांची माळ गुंफेपर्यंत
बोलत राहा माझ्याशी
माझ्यातील भावस्वप्नांसोबत
तू माझी प्रीत आहे
तू माझा भावरंग आहे
प्रतिमा तुझीच मनाला
प्रतिभा तुझीच विचारांना
लेखणी माझे प्रेम आणि
तू माझा आरशा
छंद तुझ्या सोबत भिजण्याचे
गंध माझ्या मनाला तुझाच ...
नियती ...तू
स्वाभिमान... तू
कुंभमेळा... तू
आशावाद ...तू
संपत्ती ...तूच माझी!!
शब्दमाळेत गुंफल्यानंतर
मौनालाच अर्थ तुझ्याच
वाचतोया भिजतांना
रुजावे शब्दरूपी जीवनाला
सोबतशब्द असावे
माझ्या शब्दांनाही शब्दांनी
साथ देताना माझ्या जीवनाला!!!
✍️©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- शब्द
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
----------------------------------