savitalote2021@bolgger.com

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

*** भारतीय संविधान दिवस ***



*** भारतीय संविधान दिवस ***
                 (Indian Constitution Day)

               ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कायद्याविषयक, अर्थ इत्यादी क्षेत्रात बहुमूल्य काम केले आहे

                   भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये आणि चर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला होता. आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान बाबासाहेबांनी दिले. भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते.

                         डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या सोबत विद्वत्ता कल्पनाशक्ती तार्किक भाषा शैली वक्तृत्व आणि आज पर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान पणाला लावून आणि अनुभवावरून भारतीय संविधानाची निर्मिती त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तयार केले. राष्ट्राच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे प्रचंड ज्ञान त्यांच्याजवळ होते. त्यांनी संविधान तयार करताना कुठेही अस्पष्ट गोंधळलेल्या शब्दात संविधान तयार केले नाही तर मुद्देसूद आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत संविधानाची निर्मिती केली म्हणून आधुनिक भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास देशातील त्या समाजव्यवस्थेविरुद्ध होता जिथे अन्याय अत्याचार स्वातंत्र्याला कुठेही स्थान होते. प्रवास अनुभव त्यांनी अनुभवले होते आणि समोरच्या पिढीने देशातील भावी पिढीने विकासात्मक विचार प्रवाहात आणि आधुनिकतेमध्ये समाजातील तळागाळातील जनतेचा सहभाग असावा हा दृष्टिकोन सामोर ठेवून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपी होती त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय दिला.

            देशभरात संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

                भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांच्या आचरण करणे होय. संविधानात मूलभूत हक्क अधिकार नागरिकांचे  अंतर्भूत आहे. संविधानाच्या प्रास्तविकेत समाविष्ट आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ,राष्ट्रीय एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता ,समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थापित करणे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.


                भारतीय संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका दीर्घ कालावधी संविधान पूर्ण करण्यासाठी लागला. भारतीय संविधान इंग्रजी आणि हिंदी भाषेत हाताने लिहिले गेले. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

                संविधान सभेची स्थापना 6 डिसेंबर 1946 रोजी झाली. काही कारणास्तव सभेवर बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला, तरी 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत  राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष हरेंद्रकुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी एन राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केले. सुरुवातीला या सभेवर 389 सदस्य होते. फाळणीनंतर 299 सरकारी प्रांतातील चार मुख्य आयुक्त प्रांतांचे आणि 93 राज्यातील होते. जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर करून मूलभूत तत्वे मांडली आणि हीच राज्यघटनेचे प्रस्तावना आहे. कारण वस्तुनिष्ठ ठराव सर्वनुमती मंजूर करण्यात आला होता. 

                22 जुलै 1947 रोजी नवीन राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला.... देशाची फाळणी झाली.... देश दोन भागात विभागला गेला....  भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व अशा देश विभागला गेला आणि भारताला स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवशी फाळणीचे दुःख मनात घेऊन, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा लागला. यासाठी काही राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी मतभेद असू शकतात किंवा विचार प्रवाहाच्या त्या विचारसरणीमुळे अखंड भारताला दोन भागांमध्ये विभागल्या गेले असावे पण भारताला स्वातंत्र्य मिळाले ही मुक्तता म्हणजे संपूर्ण भारत वर्षासाठी एक जल्लोष होता. उत्साह होता.

                29 ऑगस्ट 1947 रोजी समिती सभेमध्ये डॉ. बी आर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि समितीमध्ये अन्य सदस्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. 
या मसुदा समितीच्या 44 सभा झाल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. 

                    24 जानेवारी 1950 संविधान सभेचे अखेरची बैठक झाली. भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली आणि मान्यता मिळाले. त्यावेळी भारतीय राज्यघटनेस 395 लेख, आठ अनुसूची व 22 भाग असलेली राज्यघटना होती. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य भारताची राज्यघटना मिळाली ही राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. यासाठी 64 लाख रुपयांचा खर्च लागला.

                    भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठी लिखित संविधाना आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय तसेच प्रज्ञाशील, करुणा, मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवली गेली आहे. राज्यघटनेत एक प्रस्ताविका बारा अनुसूची 25 भाग 448 कलमे 5 परिशिष्टे आहेत. भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
 

                डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचे सदस्य म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. . त्यानंतर बाबासाहेबांनी जी भाषणे समितीच्या बैठकीमध्ये केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयावर प्रभुत्व बुद्धिमत्ता दूरदृष्टी देशप्रेम अशा विविध विषयावरील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव पंडित नेहरू पटेल प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करताना बाबासाहेब यांना सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सर्व सदस्यांना वाटले आणि त्यांनी बाबासाहेबांवर एवढी मोठी जबाबदारी बाबासाहेबांना दिली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताची पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली. ती देशातील नागरिकांना स्वातंत्रपणे वास्तव करता यावे, कुणीही कोणावरही अन्याय करू नये. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, मी प्रथम भारतीय आणि अंतिम ही भारतीयच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून ते निर्णय सार्थक सिद्ध केले आहे. 
                    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातील एक श्रेष्ठ घटनाकार संविधानकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण जगात त्यांना ओळखले जा.ते भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि विषय संपला असे झाले नाही तर भारताच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठे योगदान भारतीय संविधान तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले.

                 भारतीय संविधान हे लवचिक आहे. त्यामुळे काळानुसार परिस्थितीनुसार वेळेनुसार त्यामध्ये बदल करता येतो आणि त्यामध्ये सुधारणा करता येते. 

             आपली राज्यघटना प्रस्तावना मूलभूत मूल्य अधिकार, कर्तव्य, तत्त्वज्ञान, लोकनेते यांच्या आधारे बांधली गेलेली आहे. सामाजिक, आर्थिक विचार, राजकीय विचार, न्यायिक विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य समान संधी राष्ट्रीय एकात्मता अखंडता याची खात्री देणारी सर्व बंधुता वाढविणे इत्यादी विशेषण राज्यघटनेत आहे.
   
                       भारतीय राज्यघटना पूर्णपणे हाताने लिहिली गेली आहे. आजूबाजूंनी नक्षीकाम केलेले आहे. भारतीय संविधान म्हणजे राष्ट्रीय कायदा जो कायदा घराघरात पोहोचविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणाद्वारे केलेले आहे. लोकशाही ही फक्त कागदावरच राहिली नाही तर लोकशाही बाबासाहेबांच्या शब्दांमुळे समाजमान्य झालेली आहे. समाजाच्या त्या तळागाळापर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे. त्यातील तत्त्वज्ञान कर्तव्य अधिकार जबाबदाऱ्या पोहोचलेल्या आहे. तिथे नागरिकांना स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास करता येईल. प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार आहे .

        भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव राज्यघटनेत केला गेला नाही. गरीब - श्रीमंत असा भेदभाव केला गेला नाही. लहान - मोठा असा भेदभाव केला गेला नाही. प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेला नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे मत मांडण्याचे आणि व्यक्त करण्याचे अधिकार आहे.

          भारतीय लोकशाहीमध्ये चारही स्तंभ स्वातंत्र्य आहे. कारण यामुळेच भारतीय लोकशाही बळकट सशक्त आणि उपयोगिता पूर्ण होत असते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. भारतीय संविधान म्हणजे देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली आहे म्हणून उच्चपदस्थ अधिकारी व भारतातली कोणताही सर्वसामान्य नागरिक या सर्वांना एकच अधिकार आहे.

 भारतीय सविधान म्हणजे भारतीय लोकशाहीचा लख्ख प्रकाश आहे. लोकशाही घराघरात गुण्यागोविंदाने नांदत आहे. याचे सर्वस्व श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.

          संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश हा देशातील नागरिकांना संविधानाचे महत्त्व व मसुदा समितीने संविधानाच्या स्थापनेसाठी केलेले  अथक प्रयत्नांची जाणीव करून देणे हा आहे. संविधान दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी संविधानाबद्दल माहिती दिली जाते. ठिकठिकाणी संविधानाचे वाचन केले जाते.

         अनेक सरकारी आणि संस्थेमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे मोठ्याने वाचन केले जाते. वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. निबंध स्पर्धा घेतल्या जातात. लेखन कौशल्य संबंधित संविधाना संबंधीचे विविध उपक्रम राबविले जातात. लोकनाट्यद्वारे चौकाचौकात ग्रामसभेत पंचायत समिती जिल्हा परिषदे येथे वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. राष्ट्र उभारणीसाठी राज्यघटनेची भूमिका किती महत्त्वाची होती या संदर्भात कार्यशाळा घेतली जातात.
         सामुहिक वाचन यांचे नियोजन केले जाते. अशा प्रकारे विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. देशाचे नागरिक म्हणून भारतीय संविधान आपल्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे हे नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याचे हे एक संविधान दिन साजरा करणे हे माध्यम आहे. 

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांगीण विकासाची ती पाठशाळा आहे. त्या शाळेत एकदा प्रवेश केला की आयुष्यभर व्यक्ती हा विद्यार्थीच राहतो. संविधानाचे महत्त्व आणि भारतीय लोकशाही टिकविण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे भारतीय संविधानामुळे कळते आज आजूबाजूंनी जी परिस्थिती उभी आहे ती फक्त देखावा आहे. कारण भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही आणि कुणीही भारतीय लोकशाहीला नष्ट करू शकत नाही. कारण भारतीय संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे एकमेव पुस्तक आहे.

          ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


==============================================!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

** निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते ****

*** निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते  ****

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

 
        विचार खूप येतात. शब्द खूप येतात पण त्या शब्दांना योग्य विचारसरणीत मांडता येत नाही त्यावेळी शब्दांची मर्यादा कळते म्हणून थोर मोठे सांगून गेले, शब्दांना जपून वापरा. शब्दांना आपलेसे करा. जिंकणे आणि हारणे यासारखा कोणताच खेळ नाही कारण जिंकणे म्हणजे समाधान असेल तर समाधान कोणत्या गोष्टीचे आहे हे ही मनाला शब्दात सांगावे लागते.
                  हरणे म्हणजेच मनाला दुःख निर्माण करणे. दुःख होणे असे असेल तर तेही शब्दाने सांगावे लागते. एखाद्या गोष्टीला आपण कोणत्या बाजूने बघतो, खरंतर हेच महत्त्वाचे आहे. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. निसर्ग तितका सोडल तर परिपूर्ण या जगात काहीच नाही म्हणून जिंकण्यासाठी आयुष्य जगू नका.

         दुसऱ्याला हरवण्यासाठी आयुष्य जगू नका. आयुष्य हे त्या वर्तुळासारखा आहे. ते वर्तुळ 48 तास फक्त फिरत असते. आयुष्याची किंमत करा. माणूस जगताना मला मला मला मला इतरांना काय हा प्रश्न जर स्वतःला विचाराल तर इतरांमध्ये तुम्ही सुद्धा मोडता हे विसरू नका.

         ज्या निसर्गाने तुम्हाला जीवनदान दिले आहे त्याच निसर्गाने इतरांना सुद्धा जीवनदान दिले आहे म्हणून आयुष्यात त्या गोष्टींना मागे सोडा जिथे अहंकार सर्वोच्च सीमा गाठते. आयुष्यात त्या गोष्टीला मागे सोडा, तिथे माणूस म्हणून जगू शकत नाही.

         माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार त्या निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेले आहे म्हणून निसर्गचक्र हे क्रमानुसार चालते. निसर्गचक्र त्याच्या गतीनुसार चालते. निसर्गचक्र हा स्वयंभू आत्मनिर्भय आत्म अनुशासन आणि सत्वाला जाणारा असतो.

         सत्य असत्य या परिक्रमामध्ये फिरण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याच्या परिक्रमे मध्ये स्वतःला फिरवत ठेवा. ज्यावेळी तुम्ही माणूस म्हणून जगता त्यावेळेस तुम्हाला समोरचा व्यक्ती माणुस दिसतो. म्हणून स्वतःला घडवितांना त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, ज्या गोष्टीमुळे स्वतः आणि इतरांचे नुकसान होईल.

         काल एक टोपली पाहिली त्या टोपलीत काहीच नव्हते ती टोपली होती विचारांची,  ती टोपली होती शून्याची, ती टोपली होती महत्त्वकांक्षाची, ती टोपली होती अहंकाराची, ती टोपली होती रागीटपणाची,ती टोपली होती 'मी पणाची,' त्या टोपलीत काहीच शिल्लक राहत नाही. हे  एक सत्य कळले ;कारण ती टोपली प्रत्येक जण स्वतः तयार करीत असतो म्हणून त्या टोपलीत काय ठेवायचे हे स्वतःलाच ठरवावे लागते.

          ती टोपली खाली दिसली म्हणून  नेहमी वाटते,  आपल्याला चांगल माणूस बनावे लागेल. या जगाच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला चांगले माणूस बनावे लागेल. कारण तो क्षण आयुष्यात आल्यानंतर आपल्याला ती टोपली सुद्धा इथेच ठेवून जायचे आहे. जर ती टोपली आनंदाची समाधानाची संघर्षातून शिखर उभे करण्याची हसऱ्या चेहऱ्याची,हसऱ्या शब्दांची, हसऱ्या शब्दांची, हसऱ्या गाण्याची,असेल तर ती टोपली आठवणी कुणाच्या ना कुणाच्या राहीलच.

                 म्हणून आयुष्य समाधानाने जगा...!! कारण समाधानाची व्याख्या संकल्पना आपली स्वतः स्वतःची असते. निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते.

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

 

******************************************************************************

****निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते ****

**** निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते  ****

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        विचार खूप येतात. शब्द खूप येतात पण त्या शब्दांना योग्य विचारसरणीत मांडता येत नाही त्यावेळी शब्दांची मर्यादा कळते म्हणून थोर मोठे सांगून गेले, शब्दांना जपून वापरा. शब्दांना आपलेसे करा. जिंकणे आणि हारणे यासारखा कोणताच खेळ नाही कारण जिंकणे म्हणजे समाधान असेल तर समाधान कोणत्या गोष्टीचे आहे हे ही मनाला शब्दात सांगावे लागते.

                  हरणे म्हणजेच मनाला दुःख निर्माण करणे. दुःख होणे असे असेल तर तेही शब्दाने सांगावे लागते. एखाद्या गोष्टीला आपण कोणत्या बाजूने बघतो, खरंतर हेच महत्त्वाचे आहे. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. निसर्ग तितका सोडल तर परिपूर्ण या जगात काहीच नाही म्हणून जिंकण्यासाठी आयुष्य जगू नका.

         दुसऱ्याला हरवण्यासाठी आयुष्य जगू नका. आयुष्य हे त्या वर्तुळासारखा आहे. ते वर्तुळ 48 तास फक्त फिरत असते. आयुष्याची किंमत करा. माणूस जगताना मला मला मला मला इतरांना काय हा प्रश्न जर स्वतःला विचाराल तर इतरांमध्ये तुम्ही सुद्धा मोडता हे विसरू नका.

         ज्या निसर्गाने तुम्हाला जीवनदान दिले आहे त्याच निसर्गाने इतरांना सुद्धा जीवनदान दिले आहे म्हणून आयुष्यात त्या गोष्टींना मागे सोडा जिथे अहंकार सर्वोच्च सीमा गाठते. आयुष्यात त्या गोष्टीला मागे सोडा, तिथे माणूस म्हणून जगू शकत नाही.

         माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार त्या निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेले आहे म्हणून निसर्गचक्र हे क्रमानुसार चालते. निसर्गचक्र त्याच्या गतीनुसार चालते. निसर्गचक्र हा स्वयंभू आत्मनिर्भय आत्म अनुशासन आणि सत्वाला जाणारा असतो.

         सत्य असत्य या परिक्रमामध्ये फिरण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याच्या परिक्रमे मध्ये स्वतःला फिरवत ठेवा. ज्यावेळी तुम्ही माणूस म्हणून जगता त्यावेळेस तुम्हाला समोरचा व्यक्ती माणुस दिसतो. म्हणून स्वतःला घडवितांना त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, ज्या गोष्टीमुळे स्वतः आणि इतरांचे नुकसान होईल.

         काल एक टोपली पाहिली त्या टोपलीत काहीच नव्हते ती टोपली होती विचारांची,  ती टोपली होती शून्याची, ती टोपली होती महत्त्वकांक्षाची, ती टोपली होती अहंकाराची, ती टोपली होती रागीटपणाची,ती टोपली होती 'मी पणाची,' त्या टोपलीत काहीच शिल्लक राहत नाही. हे  एक सत्य कळले ;कारण ती टोपली प्रत्येक जण स्वतः तयार करीत असतो म्हणून त्या टोपलीत काय ठेवायचे हे स्वतःलाच ठरवावे लागते.

          ती टोपली खाली दिसली म्हणून  नेहमी वाटते,  आपल्याला चांगल माणूस बनावे लागेल. या जगाच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला चांगले माणूस बनावे लागेल. कारण तो क्षण आयुष्यात आल्यानंतर आपल्याला ती टोपली सुद्धा इथेच ठेवून जायचे आहे. जर ती टोपली आनंदाची समाधानाची संघर्षातून शिखर उभे करण्याची हसऱ्या चेहऱ्याची,हसऱ्या शब्दांची, हसऱ्या शब्दांची, हसऱ्या गाण्याची,असेल तर ती टोपली आठवणी कुणाच्या ना कुणाच्या राहीलच.

                 म्हणून आयुष्य समाधानाने जगा...!! कारण समाधानाची व्याख्या संकल्पना आपली स्वतः स्वतःची असते. निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते.

      ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

**मुखवटा **

         जगण्याच्या या प्रवासामध्ये आपल्याला अनेकदा नकळत का होईना काही मुखवटे घालून जगावे लागते. कारण त्यामुळे आपण आपली सुरक्षितता निर्माण करीत असतो.
        मुखवटा म्हटले की रितेपणा आलाच पण मुखवटा कधी सत्य बोलते तर कधी असत्य. मुखवटा एक आडवी भिंत असते आपल्या भावनांवर घातलेली.
        याच भावविश्वातून व भावसंदर्भातील ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. 
       मुखवटा हा प्रत्येक व्यक्ती घालून जगत असतो. त्या संदर्भातली ही कविता...!! धन्यवाद❤❤☹️😂

***मुखवटा ***

नवीन वेगवेगळ्या वाटेवर 
नवीन वेगवेगळे मुखवटे 
भाव वेगळे तरी 
शब्दांचा डाव मात्र एकच 
मागे लपलेले अंतकरणाच्या 
हिरावून घेतलेला शिल्लक मुखवटा 

मुखवटा बदलवत नाही आव्हाने 
मुखवटा बदलवत नाही आपलाच खोटेपणा 
मुखवटा बदलत नाही अविश्वास 
नवीन मुखवट्यावर जुने सत्य 
आडवी असलेली 
उरणारा प्रत्येक क्षणाला 

हिरावून घेणारा एक क्षण उरलेला 
असतो मुखवटाआड उरणारे नाहीच 
नाही मात्र जमाखर्च जास्तच आहे 
मुखवटाच्या आड वेगळ्या वाटेवर 
डोक्यातील अर्धवट सत्याचा पसारा 

गुपिते खुलावे असे वाटतात 
मन उतावळी होते 
पापणीच्या आड चिंब भिजलेल्या 
थरथराट मुखवटा कठीण प्रवास असतो 
उगाच सरळ झालेला निकामी 
होऊन आरशात आव्हाने 
मात्र तितके शिल्लक असतात 

गच्च भरलेला प्रश्नांची शिदोरी घेऊन 
पण शांत मुखवटे वेगवेगळे 
नवीन वेगवेगळ्या वाटेवर 
नवीन वेगवेगळे मुखवटे

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💔💔💔


       In this journey of living, we often have to live with some masks, even if we don't know it.  Because that is how we create our security.
 It is said that the mask is boring, but sometimes the mask speaks the truth and sometimes it is a lie.  A mask is a horizontal wall placed over our emotions.
      This poem is from this emotional world and related to emotions.  Don't forget to like and share if you like.  The poem is handwritten and composed.
     A mask is what every person lives by wearing.  This poem in that context...!!  thank ❤❤❤😂☹️😂☹️💔💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤


***Mask***

 New on different paths
 New different masks
 Prices are different though
 But the plot of words is the same
 Hidden behind the heart
 Balance mask taken away

 The mask does not change the challenges
 A mask does not change your own falseness
 Disbelief does not change the mask
 An old truth in a new mask
 horizontal
 Every remaining moment

 A moment left to seize
 There is no one behind the mask
 No, but the deposit is high
 On a different path behind the mask
 Spreading half-truths in the head

 Secrets want to be revealed
 The mind was in a hurry
 Wet under the eyelids
 Trembling is a difficult journey to   mask
 A very straightforward failure
 Challenges in the mirror
 But there are so many left

 With a barrage of questions
 But calm masks are different
 New on different paths
 New different masks

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
       The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 


 *****************************************************************************

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

आता वाटेला यावे लागते..

       पांढराशुभ्र नाजूक वेलीला ज्यावेळी फुलांचा वर्षा असाह्य होतो निसर्ग नियमानुसार ते खाली जमिनीवर येतात तसेच आयुष्य निसर्ग नियमांनी चालते.
       दगड हा फक्त दगड नसतो तर तो हिशोब असतो. त्यातील काही दगड दैवत व प्राप्त करतात वेदना सहन करून...!
       बहरने कशाला म्हणतात हे त्यावेळी कळते. याच आशायसंदर्भातील ही कविता," आता वाटेला यावे लागते ",आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. धन्यवाद...!!💕

*** आता वाटेला यावे लागते ***

दगडहून जगणे हेही जगणे 
आता वाटेला यावे लागते 
सांभाळता येईल एवढेच 
कदाचित भावना इतरांच्या असल्या तरी 
त्या आपल्या नसतात कधीच
हृदयाच्या
 
दगड होऊन  
दगड झाले पण दगड होणे 
सोपे नसते 
नवीन आकार घेण्यासाठी 
नवीन सुखदायी होण्यासाठी 
काळजाला

व्यर्थ बाळगलेला गैरसमज अभिमान 
स्वाभिमान बंद दरवाजा सांभाळत 
बसण्यापेक्षा दगड होणे  
कधीही चांगले 
नयनातून

नवीन आकार घेण्यासाठी 
कितीतरी घाव सोसावे लागते 
जिवंतपणे वेदनेचा मारा तो 
शब्दातही सांगता येत नाही 
अपेक्षित आरशातून 

दगड होणे अंधारात उजेडाला 
शोधणे असते 
संपून निभवणे आणि संपलेलेच नाही 
असे संथपणे  भिजत राहणे 
स्पष्ट -अस्पष्ट आवेगाला 
शांत करत दगड होणे 
कधीही चांगले 
झुलण्यासाठी - जुळण्यासाठी

दगडाला आकार देता येतो आणि 
दैवत्व प्राप्त करता येते 
मखमली पायवाटेवर 
ओंजळीने सुखाचा वर्षाव होतो 
पूर्णत्व कशाला म्हणतात हे त्या 
दगडातून कळते 

त्यांनी वेदना सहन केलेला 
असतात त्या वेदनेला झुगारून 
त्याने दैवत्व प्राप्त केलेले असते 
दगड होऊन जगणे 
हे ही जगणे 
आता वाटेला यावे लागते...!!❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



******************************************************************************

When the rain of flowers becomes unbearable for the delicate white vine, they come down to the ground according to the laws of nature and life goes according to the laws of nature.
 A stone is not just a stone, it is a calculation.  Some of these stones are divine and obtained by enduring pain...!
 At that time you will know why Bahrane is called.  If you like this poem about this hope, don't forget to like and share it.
 The poem is handwritten and composed.  Thank you...!!💕

 *** Now we have to get on the road ***

 To live by stone is also to live
 Now we have to get on the road
 That's all that can be managed
 Maybe the feelings are someone else's though
 They are never yours
 of the heart

 turned to stone
 Stoned but stoned
 Not easy
 to take a new shape
 To become a new pleasant
 worry

 Vain Misconceived Pride
 Self-esteem guarding the closed door
 Getting stoned rather than sitting
 better than ever
 through the gaze

 to take a new shape
 One has to bear many wounds
 Live in pain
 Can't even say in words
 From the expected mirror

Turning stone into light in the dark
 is to find
 Ending and not ending
 Soaking slowly like this
 Obvious - Obscure impulse
 Soothing stone
 better than ever
 To swing - to match

 The stone can be shaped and
 Divinity can be attained
 On the velvet trail
 Onjali rains happiness
 That is what is called perfection
 It is known from the stone

 He endured pain
 By defying the pain that exists
 He has attained divinity
 Living as a stone
 This is living
 Now the way has to come...!!❤


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
******************************************************************************

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

*****जगणे राहून गेले*****Cease to Live ***



     कधीकधी जगताना जगण राहून जातात. स्पर्शाची  भाषा स्पर्शानेच कळते पण स्पर्शच होऊ न देण्याच्या हृदयाला जगण मात्र राहून जाते.
       आयुष्याच्या नकारात्मक वेळेला सकारात्मक करण्याच्या वेळेला जगण कस राहून गेले सांगणारी ही कविता ..!!

      त्या भाव विश्वातून त्या संवेदनशीलतेतून या कवितेचे शब्द. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...," जगणे राहून गेले"...!!❤💔

*** जगणे राहून गेले ***

जगण्याच्या या वळणावर जगणे राहून गेले 
रंगाच्या या वळणदार दाट रंगाने 
गडदपणा मात्र घेऊन गेला 
फिक्‍या आयुष्याच्या रस्त्यावर मात्र 
जगणे राहून गेले 

जळून राख झालेल्या मनाला वळणदारपणे 
यशाच्या मार्गावर घडवावे लागणार आहे 
अजूनही मनात माझ्या प्रकाश जागा आहे 
प्रकाशदार वळणावर वळणदार होऊन सुद्धा 
जगणे राहून गेले 

विसरले ती फुंकर - स्पर्श आता 
तुटलेल्या स्वप्नाची माळ आता 
वळणदार रस्त्यावर मात्र दुःखाचा किनारा
 वेलीसारखा त्यात मात्र 
जगणे राहून गेले 

संपत संपत 
विचारांच्या प्रवासयात्रेत मात्र जगणे 
थोडेफार होऊन गेले तरी 
जगण्याच्या वळणावर जगणे राहून गेले 
तरी जगण्याच्या वळणावर 
जगणे मात्र राहून गेले


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************

        Sometimes life goes away while living.  The language of touch is known only by touch, but the heart that does not allow itself to be touched remains alive.
 This poem tells how the negative time of life is the time to make it positive..!!

 The words of this poem come from that sentimental world.  The poem is handwritten and composed.  If you like it, don't forget to like and share it...,"Javne rajna gana"...!!❤💔


** Cease to Live ***

 At this point in life, life has ceased to exist
 With this twisted dense color of color
 Darkness, however, took away
 But on the road of pale life
 Ceased to live

 A twisted mind that has been burnt to ashes
 It has to be done on the way to success
 I still have a bright spot in my mind
 Even turning light turns
 Ceased to live


The forgotten blow - touch now
 A broken dream now
 On the winding road, however, the edge of sadness
 But like a vine in it
 Ceased to live

 end end
 But living in a journey of thought
 Even after a while
 At the turning point of living, living ceased
 But at the turn of life
 However, life was left behind

©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

******************************************************************************

 

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

***दिवाळी प्रकाशज्योत अंधाराची **** Diwali Light of Darkness ***

***दिवाळी प्रकाशज्योत अंधाराची ***

       घराघरात दिव्यांची प्रकाश ज्योत अंधाराला उजेडात उजेड देण्यासाठी....  प्रत्येक घराच्या दारात लागते हा प्रकाश...!
        अमावस्येच्या अंधाराला भेदून प्रकाशाची चाहूल देऊन जातो; पण खरंच हा अंधार आपल्या सभोवतालीच असते...? वातावरणातच असते....? असे नाही.
      कधी कधी हा अंधार नकारात्मक विचारसरणी मध्ये सुध्दा असतो. कधी कधी हा अंधार नकारात्मक शब्दांमध्ये असतो. कधी कधी हा अंधार अहंकारामध्ये असतो. म्हणतात दसऱ्याला रावण दहन झाला आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशमययुग निर्माण झाले. सुरक्षितता हा मुद्दा घेतला तर रावण अनेक प्रकारचे आहे.
     आता ती आपल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. रावण कुणाला म्हणायचे..... की स्वतः स्वतःला म्हणायचे.
     असो, इवल्याशा पणतीच्या प्रकाशात आपण आपला अहंकार जाळून टाका कारण तो प्रकाश त्या अंधाराला प्रकाशमय करतो. तो अंधार नैसर्गिक रित्या नैसर्गिक परंपरा रूढी प्रथा परंपरेने आपल्या भोवताली निसर्ग रचनेनुसार येत असतो.💕💕💕💕
       तसेच काही अंधार आपल्याभोवती आपल्या परिस्थितीनुसार येत असते म्हणून या अंधाराच्या अंधाराला प्रकाशित करण्यासाठी सकारात्मक विचारांचा एक दिवा मनात सुद्धा लावा. कारण हा दिवा कधीही न विजणारा आणि कधीही अंधारात न नेणारा असेल.
          बाजारात दिव्यांची खरेदी करताना एक दिवा त्या मनासाठी सुद्धा खरेदी करा, जिथे प्रकाश निर्माण होईल. या दिवाळीला त्या प्रत्येक घरात दिवा उजळू द्या ....ज्या घरात अंधाराला कायमचा आसरा असतो.
       त्या घरालाही तुमच्या खरेदीने त्यांच्या दिवाळीला दिवाळी होऊ द्या. दिवाळीच्या फराळांसारखे आपल्या मनातील शब्दांना गोड तिखट खारट अशा चवींची सुंदर मेजवानी द्या.
......💕 माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💕......!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
 

*** Diwali Light of Darkness ***

 The light of the lamps in the house to light the darkness into light.... This light comes at the door of every house...!
 Penetrates the darkness of Amavasya and gives a glimpse of light;  But really this darkness is all around us...?  Is it in the environment?  Not so.
 Sometimes this darkness is also in negative thinking.  Sometimes this darkness is in negative words.  Sometimes this darkness is in the ego.  It is said that on Dussehra, Ravana was burnt and a veritable era of light was created.  When it comes to security, there are many types of Ravana.
 Now it depends on your situation.  Ravana used to call someone..... or himself.
 However, let us burn our ego in the light of this panati because that light illuminates the darkness.  That darkness naturally comes around us according to the structure of nature.💕💕💕💕
        Also, some darkness comes around us according to our circumstances, so put a lamp of positive thoughts in your mind to illuminate the darkness of this darkness.  Because this lamp will never go out and will never lead to darkness.
 While shopping for lamps in the market, also buy a lamp for the mind, where the light will be created.  This Diwali, let the light shine in every house....where darkness is a permanent shelter.
 Let that house too make their Diwali a Diwali with your purchase.  Treat your heart's words like Diwali snacks to a beautiful feast of sweet, spicy and salty flavors.
 ......💕 Happy Diwali to all my friends💕......!!


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

******************************************************************************
 
(Picture :-google )
******************************************************************************
 


बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

जीव माझाच #life is mine

        एक प्रियसी आपल्या भावना व्यक्त करताना ,आपल्या प्रियकरायला सांगत आहे. आता आठवणी जीवघेण्या होत आहे म्हणून ''थांबावे म्हणतो," आठवणींच्या पसारामध्ये...!! याच भावविश्वातूनी कविता.
          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखीत आणि  स्वरचित आहे.

**** जीव माझाच  ***

थांबावे म्हणतो आता 
तुझ्यात गुंतने आता 
नकोच आहे 

ढगाळलेल्या नयनासोबत आठवणी 
पावसात भिजलेल्या आठवणी 
नकोच आहे 

मी निस्वार्थ विसरतो आता 
लक्षात राहावे असे काही आता
अर्ध ओल्या आठवणी आता 
नकोच आहे 

थांबणे झाले आता संपूर्ण 
ढग दाटून येत नाही संपूर्ण 
नयनात गालावर येत नाहीत 
अश्रूंचा पूर आणि डाळिंबाच्या 
रंगाचे नयन 

मी माझ्या आठवणी विस्मरण 
करीत आहे 
त्या आडोशाच्या त्या बागेतल्या 
त्या माळलेल्या फुलांच्या 
त्या फुललेल्या मनांच्या संपूर्णपणे 

आता थांबणे चालू आहे 
तरीही आता कुठेतरी तेच 
म्हणून थांबावे म्हणतो 
आता तुझ्यात गुंतला 
आता नकोच आहे 



✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



==========================================================


            A lover is expressing his feelings to his lover.  Now the memories are becoming life-threatening, "stop saying," in the expanse of memories.
 Don't forget to like and share if you like.  The poem is autographed and composed.


**** life is mine ***

 Says to stop now
 Get involved in you now
 Don't want it

 Memories with a clouded gaze
 Rain soaked memories
 Don't want it

 I forget selflessness now
 Now something to remember
 Half wet memories now
 Don't want it

 Stopping is now complete
 The cloud does not cover the whole
 Nayanat does not come on the cheeks
 Flood of tears and pomegranates
 A look of color

 I forget my memories
 is doing
 They were in that garden of Adosha
 Of those arranged flowers
 All of those blooming minds

 Now the wait is on
 Still the same somewhere now
 So he says to wait
 Now involved in you
 No need now



 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

==========================================================

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

मी फिदा होते

      तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली प्रियसी आपल्या प्रियकराबद्दलच्या तिच्या भावना ,"मी फिदा होते त्याच्या कृष्णरूपावर आणि तो फिदा होता माझ्या खडूसपणावर," या भाषेत आपला भावना व्यक्त करतात .
           कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....❤❤

****मी फिदा होते ****

मी फिदा होते त्याच्या कृष्णरुपावर 
तो फिदा होता माझ्या खडूसपणावर

दोन वेगवेगळ्या मनाच्या कप्प्याने पांघरून 
घेतलेले पुढील भेट मात्र एकत्रच होती 
स्वार्थ बाळगलेल्या मनाला आता 
पुन्हा भेटीची आस होती 🌹🌹

मी फिदा होते त्याच्या कृष्णरुपावर 
तो फिदा होता माझ्या खडूसपणावर 

मनाचे दरवाजे खुले करून शब्दाविनाच 
अबोल शब्दांचा वर्षाव होता 
मला आवडायचे त्याचे बोलके डोळे 
हसऱ्या ओठांवरची नवजात बालकाची निरागस स्मित 
हृदयाला स्पर्शून जाते 
ती गोड समुद्राची लाट ❤ 

मी फिदा होते त्याच्या त्या उतावळापणावर
तो फिदा असावा नयनातील काजळावर 
माथ्यावरिल टिकलीवर गालावरच्या खळीवर 
स्मित हास्यावर  माझ्याकडे तो द्यायचा त्याचे 
पुस्तक आणि मनसोक्त भिजायचा त्या पावसात 
मुखवटे काहीच नव्हते 
हातातली छत्री हातात देत 
ओलावलेल्या पापणीने भिजत राहायचा💕💕

तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक क्षणांच्या 
प्रवास रुजलेला असायचा 
वाटायच पुस्तकाला ज्याप्रमाणे घट्ट मिठी.....
विचारांनाही मर्यादित असावे लागते 
नाजूक वेली सोबत त्यावेळी कळले 
तो फक्त अबोल असायचा 
मी फिदा होते त्याच्या कृष्णरुपावर 
तो फिदा होता माझ्या खडूसपणावर


बेधुंद जुगार खेळत कोणतेही 
स्पष्टीकरण न देता 
मी फिदा होते त्याच्या कृष्णरुपावर 
अक्षराविना वेगळा वाटेवर 
तो फिदा होता माझ्या खडूसपणावर 
न  बहरलेल्या वेलीवर 
रानातल्या हिरवळीत मर्यादेच्या प्रवासावर 
तरीही 

तो फिदा होता माझ्या खडूसपणावर  
तो फिदा होता माझ्या खडूसपणावर 
मी फिदा होते त्याच्या कृष्णरुपावर 
मी फिदा होते त्याच्या कृष्णरूपावर❤

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


******************************************************************************

          A lover on the brink of youth expresses her feelings for her lover in the language, "I was jealous of his blackness and he was jealous of my blackness."
            The poem is handwritten and composed.  If you like don't forget to like and share....❤❤


 ****I was fed up****

 I was obsessed with his dark form
 He was mad at my stupidity

 Covered by two different pockets of mind
 But the next visit was together
 Now to the selfish mind
 Hope to meet again 🌹🌹

 I was obsessed with his dark form
 He was mad at my stupidity

 Opening the doors of the mind without words
 Abol words were raining
 I used to love his talking eyes The innocent smile of a newborn baby on the smiling lips The sweet ocean wave that touches the heart ❤

I was worried about his haste
 It must be Fida on the soot in Nayan
 On the tikli on the head and on the cheek
 He used to give it to me with a smile
 I used to soak the book and my heart in that rain, there were no masks.

 The book seems to be rooted in the journey of fragile moments on the threshold of youth, just like a tight hug.....
 Thoughts also have to be limited. Along with fragile vines, it was known at that time that he was only Abol
 I was obsessed with his dark form
 He was mad at my stupidity


 Any reckless gambling
 without explanation
 I was obsessed with his dark form
 On a separate path without letters
 He was mad at my stupidity
 On an unflowered vine
 On a journey to the lush green border of the forest
 Still

 He was mad at my stupidity
 He was mad at my stupidity
 I was obsessed with his dark form
 I was jealous of his blackness

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

        The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like then don't forget to follow comments and share...!💕


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

संध्याकाळची सावळबाधा

           एक प्रेयसी प्रियकरायला भेटून आल्यानंतर स्तब्ध होते. कोणत्यातरी कारणामुळे त्यांच्यामध्ये थोडासा दुरावा आलेला असतो. का तर, वेळच्या या सांज वेळेला ती एकटीच विचार मग्न झालेली असते. तिच्या मनातला या संवेदनेमधून, भावविश्वातून ही कविता.
           संध्याकाळची सावळबाधा कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे.


*** संध्याकाळची सावळबाधा ***

कदाचित उगाच नाही येत शांतता 
सुखाचा रंग सांज संध्याकाळच्या 
रंगाशी एकरूप झाले आणि उगाच 
गंध फुलांचा सुगंधहीन झाला 

सगळे कसे गोड नात्यांमध्ये संथ 
हळुवार स्तब्ध विस्तीर्ण पण जखमा 
मात्र खोल पानगळीनंतर पालवी न येणारी 
स्वर हृदयाला भिडणारे गर्दीतही आवेग 
शांत ठेवणारे 

उगाच विचित्र हिशोबात 
स्वतःला गुरफडणारी संध्याकाळच्या 
अंधार अंधारलेले स्पष्टीकरण शून्य ठरतात 
शुभ्र चांदण्यांचा प्रकाश हिरव्यागार रंगाला 
  
सांजवेळीची बाधा मनाला जगून 
उजेडाचे दान देणारी सावळबाधा 
जखमेवर दाटते माया मनात जपवणूक 
संपून पांगरले जाते अथांग सावळबाधा 

काळाकुट्ट मध्यरात्रीच्या सावळ्या रंगांसारखे 
कदाचित शांतता स्तब्ध करते 
मशालीला संथपणे 
कदाचित उगाचच थरथर राहते 
जखम दाटलेल्या श्वासांसोबत 
सांजवेळच्या संध्याकाळच्या सावरबाधेत......!! 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤



         A girlfriend is stunned after meeting her boyfriend.  Due to some reason there is a slight rift between them.  Why, at this evening time, she is alone in thought.  This poem is from this feeling in her mind, from the world of emotions. 
        Don't forget to like and share if you like evening sawalbadha poem.  The poem is self-written and composed.



*** dusk of evening ***

 Maybe peace is not coming soon
 The color of happiness in the evening
 Matched with the color and so on
 The smell of the flowers became unscented

 How slow everyone is in sweet relationships
 Gentle numb wide but bruised
 However, after deep leaf fall, the leaves do not come
 The heart-pounding voice is an impulse even in the crowd
 Calming

 A very strange calculation
 A self-enveloping evening
 Darkness Darkness is void of explanation
 The light of the white moon turns green

 By living the hindrance of the evening
 Savalbadha, the donor of light
 Chanting in the mind of Maya thickens on the wound
 The bottomless barrage ends

 Kalakutta is like the shades of midnight
 Perhaps the silence is stifling
 Light the torch slowly
 Maybe just shivering
 With gasping breaths
 In the twilight of the evening...

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lotte

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤


==========================================================

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

**** गुलाबांच्या पाकळ्या ****

      समोरची वाट कितीही कठीण असली तरी ती जगावे लागते ती जगा वेगळी असली तरीही...... याला जीवन म्हणतात!!
        याच भाव विश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
       धन्यवाद...!!💕


**** गुलाबांच्या पाकळ्या ****

जगण्याच्या वाटेवर 
काटे फारसे आले नाही 
म्हणून जगण्याच्या वाटेवर 
गुलाबाच्या पाकळ्यांचा गालिचा
सुद्धा आला नाही 

जगण्याच्या वळणा वळणावर
वळणदारपणे जगत राहिले 
आणि समोर वर्तुळाकार प्रवास
वाटते जगावेगळी वाट आली

देणाऱ्याने देत राहिले 
पण मी घेत नाही राहिले 
कारण जीवनाला अंत नसतो 
आत्मा अमर असते 
आत्म्याला मन नसते 
मनाला भावना नसतात 

आणि वाहत्या समाधानाबरोबर 
चालताना दुःखाचे सावट
कधी जगण्याच्या वाटेवर 
आलेच नाही

म्हणून प्रेम करत राहिले 
हसून आपुलकीला घट्ट 
मिठीत घेऊन 
हसत्या पावलाने 

सांगत राहिले वाट कठीण असते 
पण याला जीवन म्हणतात 
कदाचित या समोरची 
वाट यापेक्षा सोपी असेल 
सहज असेल 

पण आयुष्य जगताना 
बंधन मात्र तितके घालून 
घेतले, मागे वळून पाहताना 
खुणा मात्र नेहमी 
समाधानाच्या ठेवल्या 

कुणाला तो अहंकार वाटला 
तर कुणाला स्वभाव वाटला 
पण मी रेंगाळत राहते 
माझ्यातील माझ्यासाठी असलेल्या 
सोबत बंधन घातलेली 
व्यापक जीवनशैली सोबत 

जगण्याच्या वाटेवर काटे 
फारसे आले नाही म्हणून 
गुलाबांच्या पाकळ्याचा 
गालिचा सुद्धा आला नाही 
गुलाबांच्या पाकळ्या 
असलेला गालिचा सुद्धा 
आला नाही...!!💔💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

      No matter how tough the road ahead is, it has to be lived even if it is a world apart......that's called life!!
 This poem is from this Bhav universe.  Don't forget to like and share if you like.
 Thank you...!!💕

**** rose petals ****

 On the road to survival
 Thorns did not come much
 So on the way to live
 A carpet of rose petals
 Didn't come either

 Life turns upside down
 Lived in a twisted way
 and circular travel in front
 I think life is waiting

 The giver kept on giving
 But I stopped taking it
 Because life has no end
 The soul is immortal
 A soul has no mind
 The mind has no emotions

 And with flowing satisfaction
 Sadness while walking
 Sometimes on the way to live
 It didn't come

 So loved
 Smile and tighten the affection
 with a hug
 With a smiling step

 It is said that waiting is difficult
 But this is called life
 Maybe this front
 The path will be easier than this
 It will be easy

 But living life
 However, by putting as much restrictions
 Taken, looking back
 Signs however always
 Satisfied

 Someone thought it was arrogance
 So someone felt the nature
 But I linger
 The ones in me for me
 Bound together
 With an extensive lifestyle

Thorns in the path of survival
 As not much came
 Rose petals
 Even the carpet did not come
 Rose petals
 Even the carpet
 Didn't come...!!💔💕

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 
==========================================================


 

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

..... माझ्या भिमाईने ....

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केले.
      गुलामाला गुलामीची जान करून दिली. अनंत काळच्या गुलामगिरीला मुक्तीचा मार्ग दिला. याच पार्श्वभूमीवर ही कविता...!!❤
     आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वलिखित व स्वरचित आहे.


..... माझ्या भिमाईने ....  

पहाटेच्या सूर्यप्रकाशाने
पावन झाली नागपूर दीक्षाभूमी
जनसागराने घेतली
वर्षानुवर्ष गुलामगिरीतून
मुक्त सूर्यप्रकाशाचा आस्वाद
14 ऑक्टोंबर या तारखेला
ऊर्जा स्त्रोत धर्मांतराचा
भिमाई माझी झाली
माझ्या मुक्तीची विश्वगाथा
पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या
साक्षीने नवी इतिहास
घडविला भारत भूमीच्या
पावन धरतीवर
गुलामाला गुलामीची जाण करून
मुक्त केले
माझ्या भिमाने
माझ्या बाबासाहेबांनी
क्रांतीची सावली झाले
विटाळलेल्या सावलीला
मुक्त केले घृणास्पद
जगण्याला धम्मचक्र दिले
रात्र रात्र जागून
माझ्या भिमाईने
माझ्या भिमाईने...!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************




गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

माहीत असते तरी💔***

        कधी कधी काही गोष्टी माहित असतानाही आपण अपेक्षा करीत असतो. ती अपेक्षा का करतो ,माहित नसते असते अशाच द्वि मनस्थितीच्या एका व्यक्तीच्या भावा विश्वातील ही कविता ..!!
      कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा. तुम्हाला कविता आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद...!!❤

*** माहीत असते तरी💔***

एखादी गोष्ट माहीत असते 
आपल्याला ...
तरीही ती गोष्ट शोधत असतो 
कधीतरी वाटते आता बदलेल 
परत काही दिवस जातात 
परत काही क्षण जातात 
परत काही शब्द जातात 
पण बदल होतच नाही 
पण का...? 
या प्रश्नाचे उत्तरही माहीत असते 
तरीही काहीतरी शोधत असते 
निरर्थक उसवलेल्या मनाला 
शिवण्याचा प्रयत्न असतो 
प्रतीक्षेनेच

आपणच बोलवलेला या क्षणाला 
आपलीच किंमत माहित असते 
तरीही शोधत असते उंबरा पलीकडे 
आपले अस्तित्व की त्या शब्दांमध्ये 
आपले अस्तित्व 
कळते पण वळत नाही वळत नाही 
म्हणजे काय असते माहित नाही 
तरीही शोधत असते 
ओलावलेल्या क्षणांबरोबर 
बोलवलेल्या क्षणांचे शब्द 

अजूनही वाटत चूक कुणाची 
वाट कुणाची अपेक्षा कुणाकडून 
कोणत्या शब्दांकडून 
कोणत्या व्यक्तींकडून 
कोणत्या नात्यांकडून 
कोणत्या हसऱ्या बोलक्या शब्दांकडून 
जे शब्द नजरआड करून 
बोलले जातात 
त्या शब्दांकडून 
ही गोष्ट शोधत असते 
दूर कुठेतरी कुठल्यातरी 
क्षणात त्या काळोखात 

लख्ख प्रकाशाच्या उजेडात 
चमचमणाऱ्या त्या चांदणी क्षणात 
गोष्ट शोधत असते 
माहित असतानाही 
क्षणाक्षणांच्या गोष्टींमुळे 
चालते मी 
तरीही त्या वाटेवर 
कधीतरी त्या अप शब्दांच्या 
सहनशीलतेला 
सहनशीलता काय असते 
हे माहीत करण्यासाठी 

ते हसू ते शब्द त्यापलीकडील 
भाषा मागची भाषा शोधत असते 
माहीत असतानाही 
तरीही शोधत राहते 
कुठेतरी 
आपुलकी हृदयाचा तो 
ओलावलेला कोपरा शोधत राहतो 
माझ्यातच माझ्यातील चुका 
त्या चुका माझ्याच असतात 
बदल हा नसतोच मुळात 
बदल फक्त असलेल्या क्षणात 
तरीही शोधत राहते मी 
माझ्यातील चुका 

मी शोध कोरड्या नयनांनी 
सुकल्या शब्दांनी 
नजरेआड केलेल्या चोर नजरेने 
शोधत राहतो एखादी गोष्ट 
माहीत असते तरी 
एखादी गोष्ट माहीत 
असते तरी...!!💔

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

(picture google) 

--------------------------------------------------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...