savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

**** गुलाबांच्या पाकळ्या ****

      समोरची वाट कितीही कठीण असली तरी ती जगावे लागते ती जगा वेगळी असली तरीही...... याला जीवन म्हणतात!!
        याच भाव विश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
       धन्यवाद...!!💕


**** गुलाबांच्या पाकळ्या ****

जगण्याच्या वाटेवर 
काटे फारसे आले नाही 
म्हणून जगण्याच्या वाटेवर 
गुलाबाच्या पाकळ्यांचा गालिचा
सुद्धा आला नाही 

जगण्याच्या वळणा वळणावर
वळणदारपणे जगत राहिले 
आणि समोर वर्तुळाकार प्रवास
वाटते जगावेगळी वाट आली

देणाऱ्याने देत राहिले 
पण मी घेत नाही राहिले 
कारण जीवनाला अंत नसतो 
आत्मा अमर असते 
आत्म्याला मन नसते 
मनाला भावना नसतात 

आणि वाहत्या समाधानाबरोबर 
चालताना दुःखाचे सावट
कधी जगण्याच्या वाटेवर 
आलेच नाही

म्हणून प्रेम करत राहिले 
हसून आपुलकीला घट्ट 
मिठीत घेऊन 
हसत्या पावलाने 

सांगत राहिले वाट कठीण असते 
पण याला जीवन म्हणतात 
कदाचित या समोरची 
वाट यापेक्षा सोपी असेल 
सहज असेल 

पण आयुष्य जगताना 
बंधन मात्र तितके घालून 
घेतले, मागे वळून पाहताना 
खुणा मात्र नेहमी 
समाधानाच्या ठेवल्या 

कुणाला तो अहंकार वाटला 
तर कुणाला स्वभाव वाटला 
पण मी रेंगाळत राहते 
माझ्यातील माझ्यासाठी असलेल्या 
सोबत बंधन घातलेली 
व्यापक जीवनशैली सोबत 

जगण्याच्या वाटेवर काटे 
फारसे आले नाही म्हणून 
गुलाबांच्या पाकळ्याचा 
गालिचा सुद्धा आला नाही 
गुलाबांच्या पाकळ्या 
असलेला गालिचा सुद्धा 
आला नाही...!!💔💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

      No matter how tough the road ahead is, it has to be lived even if it is a world apart......that's called life!!
 This poem is from this Bhav universe.  Don't forget to like and share if you like.
 Thank you...!!💕

**** rose petals ****

 On the road to survival
 Thorns did not come much
 So on the way to live
 A carpet of rose petals
 Didn't come either

 Life turns upside down
 Lived in a twisted way
 and circular travel in front
 I think life is waiting

 The giver kept on giving
 But I stopped taking it
 Because life has no end
 The soul is immortal
 A soul has no mind
 The mind has no emotions

 And with flowing satisfaction
 Sadness while walking
 Sometimes on the way to live
 It didn't come

 So loved
 Smile and tighten the affection
 with a hug
 With a smiling step

 It is said that waiting is difficult
 But this is called life
 Maybe this front
 The path will be easier than this
 It will be easy

 But living life
 However, by putting as much restrictions
 Taken, looking back
 Signs however always
 Satisfied

 Someone thought it was arrogance
 So someone felt the nature
 But I linger
 The ones in me for me
 Bound together
 With an extensive lifestyle

Thorns in the path of survival
 As not much came
 Rose petals
 Even the carpet did not come
 Rose petals
 Even the carpet
 Didn't come...!!💔💕

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 
==========================================================


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...