बदलत्या समाज व्यवस्थेची बदलती परिस्थिती स्थलांतरित गरीब समाज व्यवस्थेवर ही कविता आहे. गरीबी ही शाप आहे. तिला मुळापासून कोणीही उध्वस्त करू शकत नाही. उद्ध्वस्त करण्याची पूर्वतयारी हे शिक्षण करते. याच पार्श्वभूमीवर भावविश्वातून ही कविता. विद्रोह हा भुकेसाठी आहे. ओढ ही शिक्षणाची आहे विद्रोह शिक्षणाचा आहे. बदल घडविण्यासाठी...!!
भला पहाटे विद्रोहाची ठिणगी आसमंतांमध्ये पेटविली जाते. हा विद्रोह अस्तित्वाचा आहे.
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण कविता ही अस्तित्वाच्या विद्रोहासाठी आहे.
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
****** अस्तित्वाचा विद्रोह*****
पायाला क्षणभराची विश्रांती देते
झोपडीतील त्या आवाजाने
उलट तपासणी करते
बिछान्यात पडून राहावे वाटते
त्यावेळी कुणीतरी वाचत असते
पुस्तकातील A, B, C, D.....
समोरची व्यक्ती कोण...?? पण उत्तर
मात्र बोलके असते
वाचाल तर वाचाल या नेमक्या
अर्थाने घेतलेली
दारिद्र्याची
ती कहाणी संपविण्यासाठी
प्रस्थापित समाजाला
दिलेले ते उत्तर असते
स्वप्नातला भारताचा तो अधिकार असतो
भुकेल्या वनव्यात जळत निखाराही
ठेवत नाही
अन्नाच्या आतड्यांना आता
शिक्षणाची ओढ असते
समाजव्यवस्थेच्या चिंध्या करण्यासाठी
कडेकोट बंदोबस्त असतो
जातवाल्यांना आग लावण्यासाठी
मुजरा करणाऱ्या झुकता त्या मानेसाठी
जंग लागलेल्या त्या हरामखोर विचारांसाठी
शरम हरवलेल्या माणुसकीसाठी
भुकेला भुकेच्या आगीत न जळता
जळत राहतो
अस्तित्वाच्या विद्रोहासाठी
जळत राहतो
अस्तित्वाच्या विद्रोहासाठी
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
The changing conditions of the changing social system is a poem on the migrant poor social system. Poverty is a curse. No one can destroy her from the roots. Education prepares to destroy. This poem from Bhavvishva in this background. Rebellion is for hunger. Obsession is education Revolt is education. To make a change...!!
Early in the morning the spark of rebellion is lit in the skies. This rebellion is existential.
If you like the poem, don't forget to like and share. If you have any suggestions, please let us know in the comment box. Because poetry is for existential rebellion.
The poem is handwritten and composed.
******Existential Rebellion*****
A rush of thoughts while going from the settlement
Gives the foot a momentary rest
With that voice in the hut
Reverse checks
I want to stay in bed
Someone is reading at that time
A, B, C, D in the book.....
Who is the person in front...?? But the answer
But is talkative
If you read it, you will read it
Taken literally
of poverty
To end that story
to established society
Given is the answer
Dream India has that right
Burning coals in the hungry forest
does not keep
Now to the intestines of food
There is an affinity for education
To tear apart the social system
There is strict security
To set the people on fire
For the neck that bows to the mujra
For those bastard thoughts that have started
Shame on the lost humanity
Without burning the hungry in the fire of hunger
Keeps burning
For existential rebellion
Keeps burning
For existential rebellion
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras.
If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
==========================================================
#डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कविता त्यांचे विचार,#विद्रोही साहित्य आणि कविता, #भीम जयंती, #भीम उत्सव, #भीम जलसा, भीम गीते, #१४ एप्रिल, #डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस,
Poems of #Dr. Babasaheb Ambedkar His Thoughts, Revolutionary Literature and Poetry, #Bhim Jayanti, Bhim Utsav, Bhim Jalsa, #Bhim #Geeta, #14th April, Birthday of #Dr. Babasaheb Ambedkar,
--------------------------------------------------------------------------