विषमतेच्या लढाईमध्ये एक नाजूक भावना जळून खाक झाली आहे. मनात गर्जना प्रेमाची पण जगण्याची लढाई इतकी कठीण आहे की तो त्या प्रेमाला स्वीकारू शकत नाही. कारण माझ्या अंगाला अजूनही कष्टाच्या घामाचा वास येतो आहे.
तू जगली आहे या मुक्त स्वातंत्र्याच्या रानात. मी रुजलो आहे, एका वादळात...!! मी कितीही प्रेमाचे बीज लावले तरी तू तेथे राहू शकत नाही. ही सांगणारी ही कविता!! समानतेच्या लढाईमध्ये आम्ही लढत आहोत त्यामुळे तू लावलेले रोपटे हे चुकीचे आहे. अजूनही आपल्यावर वस्तीच्या लोकांची नजर आहे.'प्रेम', नावाचा पवित्र शब्द त्यांच्यासाठी गढूळ आहे. या भाषेत एक तरुण युवक विद्रोह मांडत आहे.
कारण जगण्याची लढाई अजून चालू आहे. या लढाईत प्रेमाला कुठेच स्थान नाही. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...! कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....!! धन्यवाद💕💕💕😂🌴❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
***** तुझ्या माझ्या प्रेमाला ***
मी च ....!!!
माझ्या प्रेमाला समजून सांगतो
माझ्या जगण्याची लढाई हा वारा सांगतो
तू जवळ येऊ नकोस
मी स्पर्श करू शकत नाही
माझ्याच मनातील प्रेमाचा जगण्याच्या खिडकीवर वळणा वळणावर
ज्वलंत जाळ पेटला आहे
इथल्या जळत्या वर्तमानात
फुला फुलांचा बाजार फक्त
फुले सजली जातात
अंधाराच्या जगात भ्रमिष्ट बुद्धी
याचा मनाच्या कोलाटावर दुरावते
उमटलेल्या भावना वेदना सांगत नाही
नको देऊ प्रेम भाषाशैली
नको देऊ स्पर्श प्रेमळ शैलीचा
नको देऊ मोगराचा सुगंध
अत्तराच्या शरीराचा
तुझ्या माझ्या प्रेमाला
नजर हजारो नयनांची
अनवाणी पायाला सोन्याच्या मुकुटाची
गरज नाही
तुझ्या माझ्या प्रेमाला नजर
माझ्या तुझ्या वस्तीची
स्वच्छ आणि गढूळ वासनांची
मी राहतो आहे अजूनही त्याच डोहात
जिथे...., जिथे विषमतेचे झाड
अजून जिवंत आहे
विषमतेचे झाड अजून जिवंत आहे...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
==========================================================
A fragile emotion has been burned in the battle of odds. Roaring love in his heart but the battle for survival is so hard that he cannot accept that love. Because my body still smells of the sweat of hard work.
You have lived in this wilderness of freedom. I am rooted, in a storm...!! No matter how many seeds of love I plant, you cannot stay there. This poem that tells this!! We are fighting a battle for equality so the saplings you planted are wrong. We are still watched by the slum dwellers. 'Love', the holy word is murky to them. In this language, a young youth is expressing rebellion.
Because the battle for survival is still going on. Love has no place in this battle. If you like, don't forget to like and share...! The poem is handwritten and composed. If you find any mistakes, please let me know in the comment box...!! Thank you💕💕💕😂🌴❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
*** to your my love ***
I f...!!!
I understand my love
The wind tells the battle of my survival
don't come near
i can't touch
The love of my own heart turns to the window of life
A fiery flame is lit
In the burning present here
Flower flower market only
Flowers are decorated
Deluded wisdom in a world of darkness
It breaks the heart
The emotions that arise do not tell the pain
Do not give love language style
Do not give touch loving style
Don't give the scent of Mogra
of the perfume body
to your my love
A look of thousands of glances
A gold crown on bare feet
No need
Look at your love
of my dwelling
of clean and dirty vasanas
I am still living in the same place
where..., where the inequality tree
still alive
The tree of inequality is still alive...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
=========================================================