savitalote2021@bolgger.com

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

आंबेडकरवाद

      "आंबेडकरवाद,"ही कविता बाबासाहेब अगदी थोडक्यात शब्दात लिहिण्याचा प्रयत्न.                  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल..!!❤

*** आंबेडकरवाद ***

आंबेडकरवाद म्हणजे विवेक गती तर्क  आंबेडकरवाद म्हणजे विज्ञानवादी विचार आंबेडकरवादी म्हणजे बुद्धाचा नवीन धम्म आंबेडकरवाद म्हणजे  विचारांची पेरणा   
आंबेडकरवाद म्हणजे विचारांची नवीन प्रेरणा आंबेडकरवाद म्हणजे विषम व्यवस्थेला समानतेची शिकवण 

आंबेडकरवाद म्हणजे समता स्वातंत्र्य न्याय नीतिमत्ता 
आंबेडकरवाद म्हणजे क्रांती परिवर्तनाची आंबेडकरवाद म्हणजे माणसाने माणसासारखे वागणे 
आंबेडकरवाद म्हणजे नवीन मूल्य 
आंबेडकरवाद म्हणजे शांतता विद्रोहाच्या स्वरूपात नवक्रांतीची 
आंबेडकरवाद म्हणजे लोकशाही 
आंबेडकरावाद म्हणजे चातुर्यवर्णव्यवस्थेच्या दगडाखाली फुललेले नाजूक वेल 
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी 
आंबेडकरवाद म्हणजे पाऊस नवविचारांचे

आंबेडकरवाद म्हणजे नवी नीतिमत्ता 
आंबेडकरवाद म्हणजे विचारांच्या समानतेचे रोप आंबेडकरवाद म्हणजे खंबीरपणा मवाळवाद आंबेडकरवाद म्हणजे निर्भीड प्रखर तेजस्वी 
पण शांत विद्रोहाचा ज्वलंत कोळसा

आंबेडकरवाद म्हणजे लोकशाहीची पहिल पान आंबेडकरवाद म्हणजे मूलभूत हक्क व्यक्ती विकास स्वातंत्र्य 
आंबेडकरवाद म्हणजे अनीतीला नीतीने परिवर्तित करणाऱ्या शब्दांची सुंदर 
मोत्यांची माळ 
आंबेडकरवाद म्हणजे मेलेल्या समाजाला 
जिवंत करणारी संजीवनी बुटी 


आंबेडकरवाद म्हणजे तत्वज्ञान 
आंबेडकरवाद म्हणजे इतिहासाच्या पानातील सुवर्णक्षण 
आंबेडकरवाद म्हणजे जागृती विचारांची शिक्षणाची उन्नतीची मूल्यांची 
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी मानवतेसाठी 
आंबेडकरवाद म्हणजे नवे पंख न्यायाचे आंबेडकरवाद एका शब्दात लिहिता येत नाही मांडता येत नाही 
आंबेडकरवाद म्हणजे नवीन आरंभ नवयुगाच

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

तू विसरु नको माणसा

   "तू विसरू नको माणसा", ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
     आंबेडकरवादी म्हणणारे आंबेडकरी चळवळीचे ध्येय आणि धोरण विसरत चालले आहे का..?? हा प्रश्नचिन्ह समोर आला आणि  या कवितेची रचना झाली. कविता कुणावरही परखडपणे आरोप करत नाही. कवीला पडलेला या प्रश्नाचे उत्तर तो या कविते शोधतो आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!❤

*** तू विसरू नको माणसा ***

माणसातला माणसा तुला अरेले का रे म्हणण्यासाठी कोणी शिकविले वास्तवाची जाणीव कुणी करून दिली 
सहन होत नाही रे आता 
झुंडशाहीची संघर्षाची भाषा 
आपलेच आपल्याला डोळे मोठे करून दाखवितात अनुभवाची शिदोरी सोबत 
असूनही सामर्थ्याचे  प्रतीक आपल्याला दाखवितात 
गावकुशाबाहेर आहे जीवन 
आपल्याला माहित आहे वेदना  
पण आता रडायचे कशासाठी 
हे समजत नाही 

तुझी डोळे किंवा माझे डोळे यात काय फरक मीही ती क्रांती पाहिली आहे 
जी बाबासाहेबांनी पुस्तकात लिहून ठेवली आहे तू ही ती चळवळ पाहिली असेल 
जी पुस्तकात लिहून ठेवली आहे 
अनुभवाची शिदोरी तुझ्याजवळही 
माझ्याजवळ पण लेकरा 
बाबासाहेबांची क्रांतीची भाषा समानतेची होती हेही समजून नको 

कारण समाजव्यवस्था ही कधीही कुणासाठी कोणत्याही क्रांतीची भाषा समजून घेत नाही 
ती समजून घेते 
फक्त आपलपोटी भाषा 
रोज जगण्याच्या विलक्षण अनुभवाने 
ती हलाखीच्या परिस्थितीत तशीच असते संघर्षाच्या वेलीवर सुद्धा 
विद्रोह कुठे करायचा माहित नाही 
जाणिवा कुठे मांडायच्या माहित नाही 
आशावाद कुठे ठेवायचा माहित नाही 
व्यथावेदना कुठे मांडायच्या माहित नाही अस्तित्वाची परिभाषा कोणती माहित नाही उपेक्षितांचे दुःखांच्या वेदनेचे जीवन कुठे मांडायचे माहित नाही 

वास्तवाचे समीकरण कोणत्या समीकरणाने सोडवायचे माहित नाही 
पण मी तिथेच आहे जिथे बाबासाहेबानी 
मला असायला हवे असे सांगितले 
मी तिथेच आहे मला जिथे राहायचे आहे 
तिथेच पण तू बदलला तुझ्यातील वेदना 
बदलला तू आता मांडीला मांडी लावून 
दुसरीकडे कुठेतरी बसलेला आहे 
तू संपूर्णपणे माणूस झाला आहे 
त्यांच्या विचारांचा 

बाभळीला फुले येईल पण काटेही येईलच संस्कृतीचे झाड लाव पण 
आक्रोश करायला विसरू नको 
तरच तू माझा आहेस 
माझ्या माझ्यातील बाबासाहेबांचा आहे 
नवीन आरंभ नवयुगाच्या नवक्रांतीच्या 
त्या आरंभबिंदूपासून तुझा प्रवास चालू आहे 

जग हसत असेल जग रडतही असते जागधिकारही करीत असे 
तरी चालेल दुःखाची नवीन ओंजळ 
तू देऊ नको 
जुन्या जखमांच्या खपला काढू नको 

तू विसरू नको 
अज्ञानाचा पाढा
तू विसरू नको परखड शब्दांची भाषा 
तू विसरू नको जगण्याची वाट 
तू विसरू नको डोळ्यातील अपयश 
तू विसरू नको दारिद्र्य 
तू विसरू नको, व्यापक दृष्टिकोन 
तो विसरु नको आधुनिकतेची जाणीव 
तू विसरू नको अंधारातला दहशतवाद 
तू विसरु नको सहनशीलता न जपणारी 
तरीही सहनशील असण्याची 
तू विसरू नको माणसातला
तेजाची नवदिशाची भाषा 
तू विसरू नको बदलत्या दुःखाची भाषा 
तू विसरू नको उगवलेला सूर्य पहाटेचा 
तू विसरू नको अंधाराची भाषा 
तू विसरु नको विचारांचा संघर्ष  
तू विसरू नको पिंजऱ्यातला पोपट  
भाकरीची किंमत सोसलेल्या वेदना 
अश्रूंच्या संवेदना 

संघर्षाची धकधकत असलेल्या क्रांतीची भाषा स्वाभिमानाची देणगी 
माणसातल्या माणसा तुला कोणी शिकविले अरे ले का रे म्हणण्याची भाषा 
तू विसरू नको त्या महामानवाला 
नव आरंभ देणाऱ्या त्या महाज्योतीला...!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

दहशत#

*** दहशत ***

शेवटी मरणारा तर माणूसच होता 
 मारणारही माणूसच होता
मग इथे जिंकलेल कोण आहे 
मरणारा वापस येणार नाही  
मारणार जिवंत राहणार नाही 
इतक सर्व माहीत असताना सुद्धा 
मारणारा मात्र आनंदाने जगत असतो 
तो असुरी आनंदच 
अशा हमलांना पाठबळ देत असते 
शून्य करणारी ही घटना न घडावी
हीच इच्छा 
कालपरवा आजूबाजूंनी घडली 
आज सीमेवर घडली 
उद्या परत कुठेतरी घडेल 
परवा परत कुठेतरी घडेल
 हे चक्र हेच हे वर्तुळ चालू राहील 
याला पूर्णविराम म्हणजे मानवता 
शांतीचा संदेश देणारे बुद्ध 
बुद्धाची शिकवण या भूमीत आहे 
त्या  भूमीत वर्तुळ थांबत नाही 
म्हणून आता आपल्याला 
युद्ध नको बुद्ध हवे...❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================





मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...