savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

** नाटकाचा शेवट  एक एकटा **

तुझा प्रश्न समजला मला पण ज्या नाटकाची सुरुवातच झाली नाही ते नाटक शेवटापर्यंत येणार कसे..? बेमुक्त बेधुंद मनाच्या शावर मध्ये आपल्या मनाला ओले करायचे आणि सांगायचं स्वतः स्वतःला हेही खूप छान आहे. ही भावना खूप सुंदर आहे...!💕 निसर्गाच्या हिरवळीसारखे वाहणाऱ्या झरासारखे ... ..एव्हरेस्ट चढणाऱ्या भावनेसारखे .......समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून पाणी बघताना होणारा आनंद लाटांचा पायाला स्पर्श होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक असतो .......बागेतला मोगरा तितका आपल्याला हवा असे वाटत असताना निशिगंधाही हळूच डोकावून जाते फुलाच्या टोपलीत आणि तीही माळली जाते .....तसेच माझे- तुझे. नकळत बेमतलब का प्यार इसका कोई अंत नाही होता. शेवट तर होणारच तेच प्रत्येक नाटकाचा पण ते नाटक प्रत्येक अंकामध्ये यायला हवा पण तसे होत नाही. तुझ्या माझ्या नात्यात!! तसे होणारही नाही! माझ्या -तुझ्या नात्यात !!!डोळ्याची भाषा डोळ्यांसमोर आत्मविश्वास हा विश्वासावर असतो. तो विश्वास आपला स्वतःवर असावा लागतो म्हणून नाटक चालू झालेच नाही तर त्याचा शेवटचा भाग तू लिहिला की मी  काहीच फरक पडत नाही.  भावनेला हळुवार मनात जपून ठेवायचे हळुवार भावलेला❤😀 त्याचा शेवट नको आणि सुरवातही नको 🌹मध्यंतरा आपलाच आहे💕 आपल्या मनाचा आपल्या भावनेचा आपल्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या प्रेमाचा 🌹❤पण  एक एकटा...!!❤😀..!
प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल अशी आशा पण नाही मिळाले तर त्याहीपेक्षा चांगले पण प्रेमाने बोलते आहे हे सर्व माझ्या- तुझ्या...!😂

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

गंधाळलेल्या जाणीवने

***गंधाळलेल्या जाणिवेने ***

क्षणोक्षणी तुझाच भास होत आहे 
पदर मायेचा ओलावा वाहते आहे 
मुक्त बरसले  नयन माझे आहे 
ढगांचा काय गुन्हा होत आहे 

खोल गुंतलेल्या भावनांना घुसमटत असलेल्या  
जाणिवेला आसवांचा समुद्रकिनारा मिळाला 
वेळ संपली खेळ संपला हुरहुर संपली 
गोष्टही संपली हृदयाची हाक ही संपली  

वाहतेच दाटते आहे नदीचा किनारा क्षणोक्षणी  
मनाचे खेळ जाणिवेचे खेळ चालले क्षणोक्षणी 
मुक्त पाखरांचे खेळ चालले मन हलक्या जाणीवेचे 
मुक्त बरसले मन माझे गोष्ट संपली जाणीवची

संपली गोष्ट  वास्तवतेच्या जाणीवेने 
प्रेम ही संपले क्षणात वाहत्या नयन ढगांनी जाणिवेने


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================


बुधवार, २३ एप्रिल, २०२५

महामानवता

     बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आणि अध्यात्मिक चळवळ बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेमध्ये रुजली ही चळवळ पहिला पाऊल म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणे. नव  आरंभ नवयुगाचा हा काव्यसंग्रह याच पहिल्या आरंभबिंदूला समर्पित आहे.
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चुका आढळलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!!❤

**** महामानवता****

शून्यातून झालेला प्रवास आता 
इतिहासाचे सोनेरी पान आहे 
अस्पृश्यतेच्या नावाखाली 
व्यवस्थेच्या बाजाराला विचाराची 
सोबत दिली 
त्यांचे नाव बाबासाहेब आहे 

विकासाचा मानबिंदू बघता बघता 
महास्फोटात परिवर्तित झाला 
देशाला समानतेचे वादळात नेणारे 
बाबासाहेबांचे विचार आता पायवाट झाली  नवीन आरंभ झाला 
घराघरात संविधानाचा 

दीक्षांत समारंभानंतर 
वर्गाच्या बाहेर बसलेला महामानव 
संविधान निर्माता झाला 
आणि तडाच गेला 
सामाजिक बांधिलकीचा वर्णव्यवस्थेला वर्गाबाहेर बसलेले देव माणसामुळे
नवीन आरंभ करणाऱ्या 
नवीन समाजव्यवस्था रुजविणाऱ्या 
महामानवाने युगंधराने शिल्पकाराने 
नवाआरंभ नवी शक्ती जगाला दाखवून दिली अंधारातल्या प्रकाशाचा तेज 
नव आरंभ नवयुगाचा 
बोधिसत्व महामानवतेचा ❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================





मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...