savitalote2021@bolgger.com

रविवार, १८ मे, २०२५

वजा

***वजा ***

मैफिलीतून तू माझ्या  
आज वजा झाला 
खरंच सांग 
त्या शून्याला किंमत आहे का?
तुझ्या त्या बेरजेला किंमत आहे का?  
आज तुझ्या मैफिलीत 
कुणीतरी बेरजेत आले आहे 

कळत नाही खरंच 
मी वजा झाले 
खरंच तू बेरजेत आणले 
या वाक्यांमध्ये 
जमीन - आकाशाचा फरक आहे 
पण मनाच्या आतल्या 
हृदयात मात्र दोघेही शून्य 
झाले हे मात्र
तितके सत्य आहे 

मला काय उमगले 
तुला काय मिळाले 
त्यापेक्षा रितेपणाची संख्या 
थोडी जास्त आहे 
जे मी पाहिलेला आहे 
जे मला दिसत होते 
जे तुम्ही दाखवले नाही 
ते दिसून आले 
ते दिसून गेले 

म्हणून  दोघांच्याही मैत्रीतून 
दोघे वजा झालो 
तितकीच काय गोष्ट 
आज सकाळी सकाळी घडली
एक सांगू या गोष्टीमुळे 
दोघेही वजाच झालो
दोघेही वजा झाले...!❤🌴

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

शुक्रवार, १६ मे, २०२५

शून्य

**शून्य **

शून्यापासून चालू झालेला प्रवास 
अजून शून्यावर येऊन थांबला आहे 
हा एक संघर्ष 
संघर्षाची भाषा ससंघर्षाने करावे 
प्रवास अजून थांबला नाही 
प्रवास अजून संपणार नाही 
प्रवास अजून कोणी थांबविणार नाही 
कारण शून्यापासून चालू झालेला प्रवास 
शून्य पर्यंत आला आहे
हा प्रवास कधीही चालू होऊल
त्याच अनुभवानी त्याचा आपुलकीने
त्याच विश्वासाने 
पण आता स्वतःच्या मर्जीने
फक्त स्वतःसाठी...!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...