savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावर
       आयुष्याच्या वळणावर खूप माणसे भेटतात. कोणी चांगले तर कोणी वाईट कोणी स्वतःच्या मस्तीत गात राहतात. कुणी शांत कुणी अबोल !!!प्रत्येकाला जगण्याचा रंग निराळा असतो. तरी प्रत्येक ऋतूमध्ये मन फुलवीत असते. तसे रोज काहीतरी वेगळे जीवनात घडत असते. प्रत्येक वाटेवर एक नवे आव्हान असते. जीवन जगण्याची सुख-दुःखाच्या श्रृंखलामध्ये गुंफलेले
         आयुष्य एक चूक आयुष्याला वळण देऊन जाते. झालेले ते संभाषण कसे मदतीला येतात. न विसरण्यासाठी !! मदतीचा हात देऊनही, अलगदपणे बोलून निघून जाते. त्या वळणावरून परत न भेटण्यासाठी. जसे प्राजक्ताच्या फुलांनी फांदी पासून अलग व्हावे तसे हिरव्यागार पानांतून पिवळी पाने गळून पडावे. 
       नवीन आयुष्यासाठी मनात नसूनही आपण जात असतो. त्याच वाटेवर त्याला शोधण्यासाठी पापणी ओली चिंब होऊन नजर शोधते..... मनाच्या हळव्या वाटेवरून चालताना मग कुणाच्या तरी अंतरंगात शिरू पहाते वेध घेत कुणाच्या तरी दिसण्याचे. त्यांच्या कडे मन आकर्षित ; कुणीही नसताना. का असे विचार येत असतील मनात. प्रवास करताना मनात पुन्हा त्याच वाटेवर का फिरावे असे विचार मनात येताच दिसावा आणि त्याच्या नजरे मध्ये मैत्रिपूर्ण भाव पहिला भेटी प्रमाणे का नसावे निस्वार्थ. उदासवाणी स्वतःची आणि माझ्याशी अबोला,  शब्दाविना चालणारा संवाद आणि थोड्यावेळाने निघून जाणे ;त्याच वाटेवर एकटे  ठेवून, विरहाच्या वेदनेचे काटे देऊन!
 
पानगळ झाली उगवत्या सूर्याच्या साक्षीने
रणरणत्या तप्त दर्पण सत्याने
निशब्द अबोल धारदार शब्दविना 

        ज्या नाजूक वळणावर मदतीचा हात दिला निस्वार्थपणे तो व्यक्ती असा का बदलावा?  अशा कितीतरी प्रश्नांची गर्दी मनात आणि विचारांमध्ये येते. तो आता त्या वळणावर कधी दिसतच नाही; तरी मन माणसाच्या अफाट गर्दीत नेमके कोणाला शोधत असते त्याला की स्वतःच्या अस्तित्वाला... त्या वेळी  न बोलता येणाऱ्या थँक्यू साठी की एक चांगला मित्र म्हणून. एकटीच प्रश्नांचे उत्तरे देत राहते संपूर्ण प्रवासात. आणि वेळ गेली की पुन्हा होते आपले आयुष्य जगण्यासाठी तयार; भीतीला मनात ठेवून तो प्रसंग परत न येण्यासाठी!!
          पाण्याच्या लाटेप्रमाणे मीही पुढे चालते आहे वादळी वाऱ्याप्रमाणे पक्षाप्रमाणे निळ्या आभाळाच्या दिशेने एखाद्या मुळातून तोडलेल्या झाडाच्या खोडाला पुन्हा फांद्या फुटतात तसंच संघर्षाला अडचणींवर मात करीत.
           जगात तुझ्यासारखे दयाळू व्यक्ती खूप असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच आले मदतीचा हात देणारे.  काही बिनधास्तपणे मैत्री नात्या गुंफणारे कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी हिम्मत देणारे , शक्ती देणारे शब्द देणारे नवीन वाटा देणारे नवीन मैत्रीपूर्ण भावविश्व निर्माण करणारे नवीन नाते त्याला कुठलीही अपेक्षेची झालर नसलेली फक्त प्रवासात सोबतीची वाट निर्माण करणारे, 'प्रवास माझा प्रवास माझ्या जाणिवेचा' माझ्या प्रवासाने शिकविले मला जग खूप सुंदर आहे. आजूबाजूने खूप सुंदर जग आहे तिथे जगावं लागतं जगू द्यावं लागत. 
            प्रत्येकांचे सुखदुःखाची वाटा वेगळ्या आहे विचार वेगळे आहे स्वप्न वेगळे आहे पायातली पाय वाट वेगळी... विचारांचे शब्द वेगळे आहे... शारीरिक हावभाव वेगळे आहे. सर्वकाही वेगवेगळे आहे विचारांच्या सावलीमध्ये कुणीही उन्हाचे चटके शब्द पावलांनी देत नाही. माझ्या प्रवासात मला ते मिळाले नाही कारण तुझ्यासारखे विचारांचे आपल्या आजूबाजूला माणसाच्या गर्दीत आपल्या प्रवासात एक सुरक्षित साखळी निर्माण केली. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच तुझ्यासारखे मदतीचा हात देणारे आले .
            या प्रवासात कुणाबरोबरही एक वेगळं नातं निर्माण होऊ शकला नाही. तुझ्यासाठी असलेल्या भावना नव्हत्याच मुळी. माझा तुझा प्रवास असाच शब्दांच्या खेळ नसलेला, टाळत असलेला आपण आपल्याच आयुष्याच्या नवीन वाटेवर चालण्यासाठी चालू केलेला प्रवास एका अनोळखी व्यक्तीसाठी एका नवीन अनोळखी प्रवासासाठी थांबू शकत नव्हता. कळत आपल्याला ...वळत आपल्याला...पण आपली इच्छाशक्ती इतकी दांडगी असते की आपण ठरवलेल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाच्या वाटेवर कुणाही अनोळखी व्यक्तीबरोबर अनोळखी प्रवास करणार नसतो. ते आपल्यासाठी आणि समोरच्या व्यक्ती साठी सुद्धा फायद्याचं नसतो म्हणून आपण आपला प्रवास वेगवेगळ्या... वेगवेगळ्या वाटेने... वेगवेगळ्या वेळाने आणि वेगवेगळ्या माणसाच्या गर्दीमध्ये केला. फक्त मनात काहीतरी आल्यामुळे दूर पळणारे आपण .पण तसं नसतं ! आयुष्य प्रत्येकासोबत जीवनात एक रेशीम बंध नसते कुणीतरी एखादीच व्यक्ती त्या रेशीमबंधनामध्ये  बांधले जातात. ते ही विश्वासाचा निर्मळ आणि स्वच्छ मनातील भावनांच्या आधाराने.

        कागदाची घडी चौपट करता-करता
        तुझ्या अबोलपणाची घडी चौपट करीत
        डोळ्यागत करपून टाकले रेशीम बंध
                           ..... नवभावनेचे

     तू कुठे भेटू नकोस कोणत्याही वळणावर तुझी माझी अनोळखी ओळख एखादा संभाषण करण्यासाठी परत आयुष्यातल्या एखाद्या वळणावर मदत करण्यासाठी जपुन ठेव अनोळखी ओळख!!!
       त्यावेळी विसरून जा ...कधीकाळी मनातील आतल्या आत करपून टाकलेले रेशीमबंध ....त्यावेळी विसरून जा माझ्या तुझ्यातील अबोलशब्द ...पण त्यावेळी सुद्धा विसरून जा माझं तुझं नातं. फक्त लक्षात ठेव आपल्यातील अनोळखी ओळख शब्दांची.

          गरज फक्त पाऊल उचलण्याची 
         आणि आयुष्याच्या वळणावर पुढे 
                          जाण्याची!
                                  10.10.2003
           सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...