आयुष्याची वाट चालत राहावी अशीच क्षितिजा परी क्षितीजापर्यंत जाण्याची मनात इच्छा आणि दुरवर दिसणारा काळाभोरआकाश कातरवेळी चाललेल्या पक्षांची धडपड घराकडे जाण्याची जिद्द त्यातून नवे बनविते सूर्य आकाशात प्रफुल्लित होऊन जातो. जरी ते अस्ताला जात असला तरी सूर्य बळ देत असते, जिद्द देत असते, तो पुन्हा आयुष्याच्या चुकला वळणावर सावरण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी.
भूतकाळ मनातील हळव्या क्षणांना बऱ्याच गोष्टीं ची व्यथा डोळ्यात दाटून येते या आणि पापण्या बाहेर पडायचं नाही मनाच्या कुंद कोंदणात तसेच राहायचे कायमचे पण या हळुवारपणे येत असतात भूतकाळापासून बाहेर वर्तमानामध्ये!
पाऊस पडून गेल्यावर म्हणायची नवचैतन्य झाले असते. झाडांच्या प्रत्येक पानावर थेंबांचे अस्तित्व असते. थंडागार वारांनी मनाची दारे ओलेचिंब झाले असते. भिजलेल्या मनाला शांत करण्यासाठी पुन्हा त्याला यावे...
तरी मनातील गोड कडू आठवणी तशाच राहतात त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणी सुद्धा मनातील कोपरा ओला चिंब करून ठेवतात. मनावर भल्यामोठ्या ढोकळा सारख्या आठवणी असे वाटते त्यांना संपून टाकावे पण अशावेळी त्यांना अधिक उफाळा येत असते.
हळव्या क्षणा बरोबर आपले बरोबर वाटत असते. आज तक धरलेला अबोला मनाला ओलाचिंब करून जाते. मनामध्ये विचारांचे वादळ निर्माण होते. अपयश अपयश आपले असते कि त्या क्षणाचे हेसुद्धा कळत नाही तरी अबोला सर्व मनातील भाव भावना क्षणात प्रगट करीत असतात; आपल्याही नकळत !
आठवणींना संदर्भ देतांना मनात विचार येतो. मनसोक्त गुलाब फुलतो गुलमोहर फुलतो वाटसरूंना विसावा देत. अंगावर पावसाच्या सरी झेलत एकमेकांशी कुजबुजते पाने दवबिंदूचे मंजुळ गाणे अधिक जवळची का वाटत असते.
मनातील असाह्य होणाऱ्या वेदना अबोल सोडून सांगावस असे वाटते असले तरी कशी खुले करावे. मनात नकळत विचार आला की त्याची हातात हात घेउन त्याला समजावे त्याचा अबोला कमी करण्याचा प्रयत्न करावा असे वाटत असताना, मनसोक्त हसावे त्यावेळी... त्याचे मनसोक्त हसणे त्याने दिलेल्या गवत फुलांवर हात फिरवीत आठवणी त्या आठवणी मनात दाटून येतात.
माझ्या खुळ्या कल्पनावर हसणे हळूच रागवणं आणि अबोला धरला की त्या स्वप्नातील कल्पना समोर उभा करणे त्याच्या कल्पनेमध्ये फक्त माझे अस्तित्व त्याच्या विचारात त्याच्या आयुष्यात फक्त माझे अस्तित्व मी मी आणि मी फक्त मी असायचे. कवितेमध्ये लिखाणामध्ये पण !!आमच्या साध्या संवादाला सुद्धा कवितेचे रूप यायचे कळत सुद्धा नव्हते.... त्यांनी प्रत्येक क्षण जपून ठेवला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात;पण...
आशावाद आणि निराशावाद हेच एक कारण असावे त्याचे आशावादी असणे आणि माझी निराशावादी असणे हेच कारण त्याच्या माझ्यामध्ये आले असेल दोन विरोधी टोके एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याला दुसऱ्या टोकाची नजर लागली म्हणजे माझी आणि तो तिथेच थांबला क्षण पुन्हा एकत्र न येण्यासाठी.
चुकलेच माझे त्यावेळी पण तुला सावरता आले असते सावरले का नाहीस त्या क्षणाला कवितेचे रूप का दिले नाहीस माझ्या अबोला माझ्यापासून दूर घेऊन जाईल असे वाटत सुद्धा नव्हते तुला कारण तुला भेटल्यानंतर तुझ्याविना आयुष्य असेल असे वाटत सुद्धा नव्हते भविष्यात फक्त तूच असावा तूच होता कल्पनेत आणि विचारात.
तुझं माझं नातं जगावेगळा. आजही तसाच दिसलास; माझ्या अबोलशब्दांना सामोर गेलास. तुझ्या भावना कळल्या तुझे पाणावलेले डोळे दिसले परत आशावाद दिसला याच कातरवेळी मावळतीच्या क्षणाला घट्ट मिठी मारली अबोला धरून .
...... रोज येणाऱ्या कातरवेळेला कोण घट्ट मिठी मारेल .....माझ्या विचारांमध्ये तू असला तरी आज परिस्थिती वेगळी आहे तुझ्या त्या हळव्या क्षणांमध्ये भागीदार मात्र नाही मी त्यात शिरू पाहते आहे दुसरी कोणीतरी आणि तुही हळुवारपणे साद देता आहे तुझ्याही नकळत. पण सांगून गेले तुझ्या हातातील गवतफुलांची फुले सर्व काही त्याच कातरवेळी!!
सविता तुकाराम लोटे
---------_------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा