savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २० मे, २०२१

मनफुलपाखरु

---------मनफुलपाखरु------- 

मला संचार करून 
आले आपल्याच घरट्यात 
माहित नाही कुणाला 
शोधत गेले होते ते 

जगातील व्यवहार समजून 
फुलपाखरू झाले क्षणाक्षणाला 
गुंतून पडले गंधविना 
मोहाने मनपाखरू 

अचानक तोडली बंधने 
गंधहिन झालेली 
रोज - रोज मुक्तीची स्वप्ने 
फेकून दिली... 
व्यवहारवादी गंधात 

फुलले मी ....फुलपाखरासारखी 
फुलराणी होऊन
मनस्वी ठेवा
मनफुलपाखरू करून

               ----सविता तुकाराम लोटे----

/////////////////////////////////////////////

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...