savitalote2021@bolgger.com

सोमवार, ३१ मे, २०२१

आपलीच आपल्यासोबत असलेली!!!


     आपलीच आपल्यासोबत असलेली

जिंकू आपण आपल्याच विचारांना 
मोहात पाडणार्‍या स्वार्थी बनविणाऱ्या विचारांसोबत....

जिंकू आपण आपलाच भावनांना 
ज्या अहंकाराच्या मार्गावरून जाताना 
अपमानित करतात आपल्याच ध्येयांना 

आपलेच युद्ध आपल्यासोबत 
भीतीच्या पलीकडे पायाखाली चिरडून
जिंकू, लढाई अशाच विचारांसोबत... 

कारण ती जिंकता येते 
आपलीच आपल्यांसोबत असलेली
आपलीच आपल्यासोबत असलेली!!!

    ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 



-------------@--@@@-----------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...