savitalote2021@bolgger.com

सोमवार, १७ मे, २०२१

तो ....ती...

------तो - ती-----

तो -हसत 
ती -हसतच, पण प्रश्नचिन्ह? 
तो -काय? 
ती -घड्याळ्यात बघत 
तो -वाऱ्याने सळसळ 
     करीत आलो बेधुंद
     इंद्रधनुष्याच्या 
     सोबत!
ती-थकले मी 
तो - का ?
ती- निवांत तू ...निवांत तू ...हसतच!
तो - झुंजणारी तू... झुंजणारी तू ...
ती -निखारा तू ...
तो- माझी भरली
     ओंजळ तू 
ती - जोगवा प्रेमाचा 
तो - मातीचा सुवास जसा 
      पहिला पाऊस 
ती -डिमांड 
तो- हसू, सॉरी 
ती -पराभव तुझा 
तो -हसतच गालात 
     खिशातील मोरपीस 
      हातात 
ती - ओठांवरील शब्द थांबवत 
       हसत..मातीत उगवलेला 
       नवअंकुरासारखे हसत 
तो-   हळूच वळत 
        अनोळखी हसूबरोबर 
        भिजलेल्या वाऱ्या सारखे 
        नयनात फक्त तुझ्यासाठी 
ती -काय 
तो -जगणे 
ती -पुरे आता  
तो- बघत घड्याळाकडे 
ती- हो ना 
तो -माझे प्रेम 
     भातुकलीच्या खेळातले 
     घड्याळ्याच्या काट्यावरील 
     वेळेचे आणि माझ्या 
     वेळ न पाळण्याचे 
ती- हसतच ढगासारखी 
     भरलेले नयन 
     खचलेले... मोरपिसावर 
     अलगद हात फिरवीत 
     आपले प्रेम वेळेच्या 
     तुफानासारखे 
तो- नाही, 
     फुललेल्या कळीसारखे 
ती- हसत 
तो -हसत 
ती- मुक्या ओंजळीत    
      माझे शब्द तुझे 
     अवघड हसराफुलासारखी 
तो -निवांत मी... आता !
ती -हसून 
तो - ये सकाळी 
      अशीच 
      स्वप्नात उठविण्यासाठी 
      गजर होऊन!
तो-ती - दोघेही हसत
           
          
                   सविता तुकाराम लोटे 
  
------------------------------------------------------------------








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...